Elon Musk Tweet to Saudi Prince : न्यूयॉर्क : जेव्हा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्कने (Elon Musk) प्रति शेअर 54.20 डॉलर या दराने ट्विटर (Twitter) विकत घेण्यासाठी आपल्या बोली जगासमोर मांडली तेव्हा ट्विटरमधील गुंतवणुकदार सौदी अरेबियाचे प्रिन्स अलवालीद बिन तलाल अल सौद (Saudi Arabian Prince Alwaleed bin Talal al Saud)यांनी ही ऑफर नाकारली होती. ट्विटरच्या वाढीच्या शक्यता लक्षात घेता त्याच्या आंतरिक मूल्यापेक्षा ही किंमत कमी असल्याचे त्यांनी म्हटले होते. “ मला नाही वाटत की इलॉन मस्कने दिलेली ऑफर ही ट्विटरच्या खऱ्या मूल्याच्या जवळपास फिरकणारी आहे. ट्विटरच्या सर्वात मोठ्या आणि दीर्घकालीन भागधारकांपैकी एक असल्याने, मी ही ऑफर नाकारतो,” असे सौदी अरेबियाच्या प्रिन्सने ट्विट केले होते. (Elon Musk Asked two questions to Saudi Prince, see what Prince replied)
प्रत्युत्तरादाखल, मस्कने सौदी राजकुमाराला दोन प्रश्न विचारले: प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे किंगडमच्या (राजकुमाराच्या) मालकीचा किती हिस्सा Twitter आहे? पत्रकारितेच्या भाषण स्वातंत्र्याबद्दल राज्याचे मत काय आहे?
काही दिवसांतच सौदी राजपुत्राने केवळ रणनीतीच बदलली नाही तर मस्कवर विश्वासाचे मतही मांडले आहे. एका दृष्टीने सौदी प्रिन्सने युटर्न घेतला आहे. सौदी प्रिन्सने म्हटले की इलॉन मस्कमध्ये उत्कृष्ट नेतृत्त्वगुण आहेत. ते ट्विटरची क्षमता वाढवतील आणि कंपनीला चालना देतील.
अधिक वाचा : LPG Price: घरगुती सिलेंडरच्या दरात पुन्हा विक्रमी वाढ; सर्वसामान्यांना बसला मोठा झटका
' माझा "नवीन" मित्र इलॉन मस्क यांच्याशी कनेक्ट करून मला खूप आनंद झाला, मला विश्वास आहे की तुम्ही Twitter साठी सौदी अरेबियाच्या महान संभाव्य साम्राज्याला चालना देण्यासाठी आणि जास्तीत जास्त वाढवण्यासाठी एक उत्कृष्ट नेता व्हाल आणि मी "नवीन" Twitter मध्ये आमचे 1.9 अब्ज डॉलरची गुंतवणूक पाहण्यास उत्सुक आहे. या रोमांचक प्रवासात आम्ही तुमच्यासोबत आहोत”असे अलवलीद बिन तलाल यांनी गुरुवारी ट्विट केले.
ट्विटरने मस्कच्या ऑफरला होकार देत पुढे जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर सौदी प्रिन्सचे हृदय बदलले आहे. मस्कने 44 अब्ज डॉलरच्या संपादनासह प्रत्यक्षात पुढे जाण्यासाठी निधी सुरक्षित करू केल्यानंतर हे सौदी प्रिन्सचे मतपरिवर्तन झाले आहे. इलॉन मस्कने ट्विटर विकत घेतल्यानंतर प्रिन्स अलवालीद यांचा निर्णय कशामुळे बदलला हे अस्पष्ट आहे. इलॉन मस्क कंपनीला अधिक फायदेशीर बनवण्यासाठी त्याच्या नव्या योजनेच्या तपशीलांसह भागधारकांशी संवाद साधत आहे.
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी ट्विटर काल रात्री विकत घेतल्यावर जगभर खळबळ उडाली आहे. इलॉन मस्कने ट्विटरचा ताबा तब्बल 44 अब्ज डॉलरना घेतला आहे. आता इलॉन मस्कने ट्विटर ताब्यात घेतल्यामुळे टेस्ला, ट्विटर यांच्यावर काय परिणाम होणार यावर जगभरातून चर्चा होते आहे. इलॉन मस्कचा याच काय आणि किती फायदा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.