Elon Musk Investment | इलॉन मस्कचा मास्टर स्ट्रोक, गुपचूप विकत घेतली या कंपनीची मोठी हिस्सेदारी, बातमी येताच शेअरमध्ये तुफान तेजी...

Elon Musk bought Twitter shares : टेस्लाचे सीईओ (Tesla CEO) आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क (Elon Musk)नेहमी काहीतरी वेगळे करून जगाला थक्क करत असतात. आता मस्कच्या एका कंपनीमधील गुंतवणुकीने (Investment of Musk) जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. इलॉन मस्क यांनी ट्विटरमध्ये 9.2% हिस्सा (Elon Musk stake in Twitter) विकत घेतला आहे. या बातमीनंतर प्री-मार्केट ट्रेडिंगमध्ये ट्विटरच्या शेअर्समध्ये तुफान तेजी येत कंपनीच्या शेअर्सची किंमत 28 टक्क्यांपर्यंत वाढली आहे.

Elon Musk investment in Twitter
इलॉन मस्कची ट्विटरमध्ये मोठी गुंतवणूक 
थोडं पण कामाचं
  • जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क (Elon Musk)नेहमी काहीतरी वेगळे करून जगाला थक्क करतात
  • मस्कच्या एका कंपनीमधील गुंतवणुकीने (Investment of Musk) जगाचे लक्ष वेधून घेतले
  • इलॉन मस्क यांनी ट्विटरमध्ये 9.2% हिस्सा (Elon Musk stake in Twitter) विकत घेतला आहे

Elon Musk stake in Twitter : नवी दिल्ली : टेस्लाचे सीईओ (Tesla CEO) आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क (Elon Musk)नेहमी काहीतरी वेगळे करून जगाला थक्क करत असतात. आता मस्कच्या एका कंपनीमधील गुंतवणुकीने (Investment of Musk) जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. इलॉन मस्क यांनी ट्विटरमध्ये 9.2% हिस्सा (Elon Musk stake in Twitter) विकत घेतला आहे. या बातमीनंतर प्री-मार्केट ट्रेडिंगमध्ये ट्विटरच्या शेअर्समध्ये तुफान तेजी येत कंपनीच्या शेअर्सची किंमत 28 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. (Elon Musk bought 9.2% stake in Twitter, shares sky rocketed after the news)

अधिक वाचा : Petrol, Diesel Price Today : दोन आठवड्यात 12वी दरवाढ; आज 40 पैशांनी कमी वाढले पेट्रोल-डिझेलचे दर

Twitter चे 9.2% शेअर मस्कच्या मालकीचे

अमेरिकेतील शेअर बाजाराच्या नियामक संस्थेला फाइलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, इलॉन मस्कने ट्विटरमध्ये 9.2% निष्क्रिय भागीदारी घेतली आहे. ट्विटर ही जगातील आघाडीच्या सोशल मीडिया कंपन्यांपैकी एक आहे. इलॉन मस्क यांनी सुरुवातीपासूनच ट्विटरच्या धोरणांवर टीका केली आहे. याबाबत ते रोज ट्विट करत असतात. अगदी अलीकडे, अशीही बातमी आली होती की मस्क ट्विटरशी स्पर्धा करण्यासाठी एक नवीन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सुरू करणार आहे.

अधिक वाचा : Government Scheme | आता सरकार विवाहितांना देणार मोठा लाभ, दरमहा मिळणार 44,793 रुपये

मस्कसंदर्भातील बातमीचा परिणाम

ब्लूमबर्गमध्ये प्रकाशित झालेल्या बातमीनुसार, मस्कने ट्विटरमध्ये हिस्सेदारी विकत घेतल्यानंतर प्री-मार्केट ट्रेडिंगमध्ये ट्विटरचे शेअर्स 28.49% वाढून 50.51 डॉलरवर पोचले होते. नुकतेच मस्क यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, ते सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तयार करण्याचा गंभीरपणे विचार करत आहेत. कारण ट्विटर अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या तत्त्वाच्या बाबतीत अपयशी ठरले आहे.

अधिक वाचा : Gold Price Today | सोने-चांदी झाले स्वस्त...ग्राहकांमध्ये खरेदीचा जोरदार उत्साह, पाहा आजचा सोन्याचा भाव, करा संधीचे सोने!

ट्विटरवर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर विचारला होता प्रश्न

25 मार्च रोजी केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी 'कार्यरत लोकशाहीसाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्य आवश्यक आहे' असे म्हटले होते. ट्विटर या तत्त्वाचे काटेकोरपणे पालन करते का, असा सवाल इलॉन मस्क यांनी ट्विटरवर केला होता.

टेस्लाच्या बाजारमूल्यात जबरदस्त वाढ

इलॉन मस्क (Elon Musk) यांची टेस्ला (Tesla) ही ऑटोमोबाइल क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे. मागील दोन वर्षात टेस्लाच्या शेअर्सच्या किंमतीत जबरदस्त वाढ झाली आहे. यामुळे इलॉन मस्क यांच्या एकूण संपत्तीत मोठी वाढ तर झालीच आहे परंतु त्याचबरोबर टेस्लाचे बाजारमूल्यदेखील (Tesla Market Cap) प्रचंड वाढले आहे. इलॉन मस्क यांच्या टेस्ला कंपनीने अलीकडेच एक कमाल केली आहे. टेस्लाचे बाजार मूल्य सोमवारी सुमारे 84 अब्ज डॉलरने वाढले. टेस्लाच्या शेअरमधील एका दिवसातील वाढ ही फोर्ड मोटर (Ford Motor) कंपनीच्या संपूर्ण बाजार भांडवलापेक्षा म्हणजे बाजारमूल्यापेक्षा जास्त आहे. म्हणजेच मस्कच्या टेस्ला कंपनीने एकाच दिवसात फोर्ड मोटरच्या मार्केट कॅपपेक्षा जास्त बाजार मूल्याची वाढ नोंदवली आहे. इलेक्ट्रिक कार निर्मात्या कार कंपनी असलेल्या टेस्लाच्या बाजार मूल्यातील ही प्रचंड वाढ एका विधानानंतर आली आहे. या विधानात कंपनीने म्हटले आहे की ते जवळपास दोन वर्षांत दुसऱ्या शेअर स्प्लिटची योजना आखत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी