Twitter News | नवी दिल्ली : टेस्ला कंपनीचे सीईओ इलॉन मस्क (Elon musk twitter) यांनी सुमारे ४४ अब्ज डॉलर्समध्ये ट्विटर विकत घेण्यासाठी करार केला आहे. ट्विटरने याबाबत माहिती दिली की ते सोशल मीडिया प्लॅटफॉर्म अब्जाधीश उद्योजक इलॉन मस्क हे ४४ अब्ज डॉलरच्या करारामध्ये विकत आहेत. मस्क यांनी या कराराची घोषणा करताना संयुक्त प्रकाशनात म्हटले की, मोकळ्यापणाने बोलणे हा एक कार्यक्षम लोकशाहीचा पाया आहे आणि ट्विटर हे डिजिटल टाउन स्क्वेअर आहे जिथे मानवतेच्या भविष्यासाठी महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा केली जाते. (Elon Musk buys Twitter for 44 billion).
अधिक वाचा : जामिनासाठी राणा दाम्पत्याची धावाधाव
ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांनी एका ट्विटमध्ये म्हटले की, ट्विवटरचा एक उद्देश आणि प्रासंगिकता आहे जे संपूर्ण जगाला प्रभावित करत असते. आम्हाला आमच्या टीमचा अभिमान आहे आणि यापेक्षा जास्त महत्त्वाचे नसलेल्या कार्याने प्रेरित आहे.
ट्विटर विकत घेण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून इलॉन मस्क यांनी सोमवारी पहाटे ट्विटरच्या बोर्डाशी चर्चा केली होती. मस्क यांनी मागील आठवड्यात सांगितले की त्यांनी ट्विटरला ४६.५ बिलियन डॉलर्समध्ये विकत घेण्याची ऑफर दिली होती, त्यानंतर ते कंपनीवर करार करण्यासाठी दबाव टाकत आहे. लक्षणीय बाब म्हणजे १४ एप्रिल रोजी मस्क यांनी ट्विटर विकत घेण्याची ऑफर दिली होती. मस्क यांनी म्हटले आहे की त्यांना ट्विटर विकत घ्यायचे आहे कारण त्यांना असे वाटत नाही की ते मुक्त अभिव्यक्तीचे व्यासपीठ म्हणून त्याच्या क्षमतेनुसार जगत आहेत.
अलीकडेच इलॉन मस्क यांनी ट्विटरमध्ये ९.२ टक्के हिस्सा घेतला आहे. यानंतर ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांनी सांगितले होते की इलॉन मस्क यांनी मायक्रोब्लॉगिंग साइटच्या बोर्डात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे.