Elon Musk Story | रिकाम्या हाती अमेरिकेत आला होता तो...दोन नोकऱ्या...जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

Elon Musk | इलॉन मस्कच्या (Elon Musk) यशाची कहाणी एखाद्या चित्रपटातील कथेला साजेशी आहे. अमेरिकेत इलॉन मस्क पहिल्यांदा आले तेव्हा त्यांच्याकडे पैसे नव्हते, शिवाय त्यांच्यावर एक लाख डॉलरपेक्षा जास्त कर्ज होते. या आठवड्याच्या सुरूवातीला टाइम मासिकाने इलॉन मस्क यांना पर्सन ऑफ द इयर (Person of the Year) या किताबाने सन्मानित केले आहे. यावर्षी त्यांनी अंतराळ क्षेत्रातील आपले प्रतिस्पर्धी आणि अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझॉस (Jeff Bezos)यांना मागे टाकले आहे आणि ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.

Elon Musk Success Story
इलॉन मस्क यांच्या यशाची कहाणी 
थोडं पण कामाचं
  • इलॉन मस्क अमेरिकेत आले होते रिकाम्या हाताने
  • अमेरिकेत आल्यावर घेतल्या दोन पदव्या
  • आज टेस्ला, स्पेसएक्सचे मालक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

Elon Musk | न्यूयॉर्क : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती (world's richest man)असलेल्या इलॉन मस्कच्या (Elon Musk) यशाची कहाणी एखाद्या चित्रपटातील कथेला साजेशी आहे. अमेरिकेत इलॉन मस्क पहिल्यांदा आले तेव्हा त्यांच्याकडे पैसे नव्हते, शिवाय त्यांच्यावर एक लाख डॉलरपेक्षा जास्त कर्ज होते. या आठवड्याच्या सुरूवातीला टाइम मासिकाने इलॉन मस्क यांना पर्सन ऑफ द इयर (Person of the Year) या किताबाने सन्मानित केले आहे. यावर्षी त्यांनी अंतराळ क्षेत्रातील आपले प्रतिस्पर्धी आणि अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझॉस (Jeff Bezos)यांना मागे टाकले आहे आणि ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. (Elon Musk come in America with zero money, today world's richest man)

इलॉन मस्क यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की अमेरिकेत ते आले तेव्हा त्यांच्याकडे पैसे नव्हते. ते पदवीधर झाले तेव्हा त्यांच्यावर एक लाख डॉलरपेक्षा जास्त कर्ज होते. मस्क यांनी पुढे सांगितले की स्कॉलरशिप असताना आणि विद्यार्थी दशेत शिकत असताना दोन नोकऱ्या केल्यानंतरदेखील त्यांच्यावर हे कर्ज होते. अमेरिकेतील एका नोकरीसाठी त्यांनी अर्ज केला होता तेव्हा त्यांचे वय १७ वर्षे होते.

१७ वर्षी अमेरिकेत पोचले मस्क

इलॉन मस्क अमेरिकेत आले होते तेव्हा त्यांचे वय फक्त १७ वर्षे होते. त्यांनी स्वत:साठी आणि अमेरिकेसाठी संपत्तीची निर्मिती केली आहे. अमेरिकन सरकारसाठी त्यांनी उद्योगाची निर्मिती केली आहे. याचा फायदा अमेरिकेला झाला आहे. यातून अमेरिकेच्या निर्यातीलादेखील फायदा झाला आहे. इलॉन मस्क दक्षिण आफ्रिकेत वाढले आहेत. जेव्हा ते शाळेत होते तेव्हा त्यांना खूप त्रास दिला जायचा. त्यांना दिला जाणारा त्रास हिंसक स्वरुपाचादेखील असायचा. इलॉन मस्क १२ वर्षे वयाचे असताना प्रोग्रॅमिंग शिकले आणि त्यांनी ५०० डॉलरमध्ये एक गेम विकला. त्या गेमचे नाव ब्लास्टर ठेवण्यात आले होते.

इलॉन मस्क यांची आई कॅनडाची रहिवासी होती. त्यांचे वडील दक्षिण आफ्रिकेचे रहिवासी होते. इलॉन मस्क दक्षिण आफ्रिकेत वाढले आहेत, त्यांचे बालपण तिथेच गेले आहे आणि शिक्षणदेखील द. आफ्रिकेतच झाले आहे. 

स्टॅनफोर्डमध्ये पीएचसाठी प्रवेश, मात्र पीएचडी अपूर्ण

इलॉन मस्क यांना द. आफ्रिकेत असतानाच त्यांच्या लक्षात आले की आपल्या पूर्ण क्षमतेचे आकलन करण्यासाठी अमेरिकेत जावे लागेल. त्यामुळे ते द. आफ्रिकेतून अमेरिकेत गेले. त्यानंतर त्यांनी दोन पदव्या घेतल्या. यानंतर त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठात पीएचडीसाठी प्रवेश घेतला. मात्र फक्त दोनच दिवसानंतर त्यांनी आपला पीएचडीचा कोर्स सोडला. त्यावेळेस सिलिकॉन व्हॅलीमध्ये इंटरनेट क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना खूप संधी उपलब्ध होत्या. मस्क आणि त्यांचे भाऊ किंबल यांनी एक कंपनी सुरू केली होती. त्या कंपनीचे नाव त्यांनी Zip2 ठेवले होते.

टेस्लाची घोडदौड

यावर्षी ऑक्टोबरमध्ये मस्क यांच्या टेस्ला या इलेक्ट्रिक कारचे उत्पादन करणाऱ्या कंपनीचे बाजारमू्य वाढून १ ट्रिलियन डॉलरवर पोचले आहे. याशिवाय मस्क यांच्या स्पेसएक्स या कंपनीने अमेरिकेच्या नासाबरोबरदेखील एक करार केला आहे. या कराराअंतर्गत त्यांनी अनेक मिशन लॉंच केले आहेत. यामध्ये एका मिशनअंतर्गत अॅस्टेरॉइडवर म्हणजे एका छोट्या लघुग्रहावर रॉकेट भिडवले होते. भविष्यात पृथ्वीवर उल्का, अशनी, लघुग्रह येऊन आदळू नयेत यासाठी ही चाचणी घेण्यात आली होती.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी