ट्विटरचे मालक झाले अॅलन मस्क, CEO पराग अग्रवाल आणि CFOची हकालपट्टी

Elon Musk completes take over of Twitter, fires CEO Parag Agrawal and other top executives : टेस्ला या इलेक्ट्रिक कारची निर्मिती करणारे उद्योगपती अॅलन मस्क आता ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मचेही मालक झाले.

Elon Musk completes take over of Twitter, fires CEO Parag Agrawal and other top executives
ट्विटरचे मालक झाले अॅलन मस्क  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • ट्विटरचे मालक झाले अॅलन मस्क
  • CEO पराग अग्रवाल आणि CFOची हकालपट्टी
  • नोकरी गेली तरी अब्जाधीश होणार पराग अग्रवाल

Elon Musk completes take over of Twitter, fires CEO Parag Agrawal and other top executives : टेस्ला या इलेक्ट्रिक कारची निर्मिती करणारे उद्योगपती अॅलन मस्क आता ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मचेही मालक झाले. ट्विटरचा ताबा घेताच अॅलन मस्क यांनी सीईओ पराग अग्रवाल, सीएफओ तसेच आणखी काही उच्चपदावरील सदस्यांची हकालपट्टी केली. ट्विटरच्या वित्त विभागाचे प्रमुख नेड सहगल यांनीही राजीनामा दिला आहे. 

मस्क यांनी 44 अब्ज डॉलर (साडेतीन लाख कोटी रुपये) मोजून ट्विटर ही कंपनी विकत घेतली. येणाऱ्या काळात ट्विटरचे स्वरुप बदलण्याची मस्कची इच्छा आहे. या प्रक्रियेची सुरुवात करण्यासाठीच मस्कने ट्विटरच्या व्यवस्थापनात मोठा बदल सुरू केला आहे. 

ट्विटरचा ताबा घेतल्यानंतर अॅलन मस्कने एक ट्वीट करून बदलाची माहिती जगजाहीर केली. 'द बर्ड इज फ्री' या शब्दांत ट्वीट करून मस्कने ट्विटर ताब्यात घेतल्याचे जाहीर केले. 

मस्क आणि पराग अग्रवालचे संबंध का बिघडले...पाहा नेमके काय झाले

पोलीस महाभरतीची जाहिरात निघाली, जाणून घ्या अर्ज करण्याची तारीख, पगार, शैक्षणिक पात्रता आणि इतर तपशील

नोकरी गेली तरी अब्जाधीश होणार पराग अग्रवाल

ट्विटरमधील सीईओ हे पद गमावले तरी पराग अग्रवाल अब्जाधीश होणार आहे. सीईओ असताना पगाराच्या स्वरुपात कंपनीने अग्रवाल यांना ट्विटरचे मर्यादीत शेअर दिले होते. हे शेअर परत घेऊन त्या बदल्यात कंपनी अग्रवाल यांना 42 दशलक्ष अमेरिकन डॉलर म्हणजे सुमारे 345 कोटी 70 लाख 20 हजार रुपये देणार आहे. यात पराग अग्रवाल यांच्या वार्षिक मूळ वेतनाचे मूल्य पण सामावले आहे. 

अग्रवाल यांचे वार्षिक पॅकेज

पराग अग्रवाल सीईओ झाले त्यावेळी कंपनीने त्यांना 1 दशलक्ष अमेरिकन डॉलर (8 कोटी 24 लाख रुपये) एवढे वार्षिक पॅकेज दिले. ट्विटरच्या नियमांनुसार या पॅकेजमधील मूळ वार्षिक वेतनाचे मूल्य अग्रवाल यांना दिले जाईल. अग्रवाल आधी ट्विटरचे चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर होते. पण कंपनीचे सहसंस्थापक जॅक डोर्सी यांनी राजीनामा दिला. यानंतर अग्रवाल यांना सीईओ पदावर बढती देण्यात आली. पण अग्रवाल आणि मस्क यांच्यात काही मुद्यांवर मतभेद झाले होते. यामुळे ट्विटरच्या खरेदीचा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर अग्रवाल यांना राजीनामा देण्यास सांगितले जाईल किंवा ते स्वतःच राजीनामा देतील अशी चर्चा होती. अखेर हा अंदाज खरा ठरला आणि अग्रवाल ट्विटरमधून बाहेर पडत आहेत. 

मतभेदांमुळे अग्रवाल ट्विटरमधून बाहेर

आयआयटी मुंबई आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठ येथे शिकलेले अग्रवाल एक दशकापेक्षा जास्त काळ ट्विटरमध्ये कार्यरत होते. ते 2021 मध्ये कंपनीचे सीईओ झाले. अग्रवाल सीईओ असतानाच्या काळात अॅलन मस्कने पहिल्यांदा ट्विटरसमोर एक प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावावर काम सुरू असताना मस्क यांनी ट्विटरकडून काही माहिती मागवली होती. या माहितीच्या मुद्यावरून अग्रवाल आणि मस्क यांच्यात पहिल्यांदा मतभेद झाले होते. या मतभेदांमुळेच अग्रवाल मस्क यांच्यासोबत काम करणार नाही अशी चर्चा सुरू झाली होती. अखेर हा अंदाज खरा ठरला. अॅलन मस्क यांनी ट्विटर खरेदी करताच अग्रवाल यांना राजीनामा देण्यास सांगितले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी