Elon Musk Twitter deal: नवी दिल्ली : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले इलॉन मस्क नेहमी चर्चेत असतात. ट्विटरचे अधिग्रहण इलॉन मस्क (Elon Musk) करणार आहेत. या सौद्यावर जगभरात उत्सुकता चर्चा सुरू होती. आता पुन्हा एका इलॉन मस्क आणि ट्विटरचा (Twitter Acquisition) सौदा चर्चेत आला आहे. मस्क यांना उद्या, शुक्रवार, ऑक्टोबर 28 पर्यंत ट्विटर (Twitter) अधिग्रहण करार पूर्ण करावा लागेल. या मुद्द्यांची चर्चा सुरू असतानाच इलॉन मस्क हातात बाथरूम सिंक घेऊन फ्रान्सिस्कोस्थित ट्विटर इंक.च्या मुख्यालयात पोचले. या घटनेचा व्हिडिओ इलॉन मस्कने त्यांच्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडिओमध्ये मस्कच्या हातात सिंक दिसत आहे. मस्कने त्याला कॅप्शन दिले 'ट्विटर मुख्यालयात प्रवेश करत आहे - त्यामध्ये बुडू द्या! मस्कची ही कृती चर्चेचा विषय झाली आहे. (Elon Musk goes to twitter HQ with bathroom sink, video goes viral)
अधिक वाचा : Diwali 2022: या बँकांमध्ये मिळतायेत स्वस्त व्याजदरात कर्जे...पाहा जबरदस्त ऑफर्स
त्याचवेळेस इलॉन मस्क यांनी त्यांच्या ट्विटर खात्याच्या प्रोफाइलचा बायो बदलला आहे. तेथे त्यांनी स्वत:ला चीफ ट्विट लिहिले आहे. यातून मस्क ट्विटर विकत घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. तुमच्या माहितीसाठी इलॉन मस्कने ट्विटरची खरेदी 44 अब्ज डॉलरमध्ये करण्याचे आश्वासन दिले आहे.
ब्लूमबर्गने सांगितले आहे की इलॉन मस्कने शुक्रवारपर्यंत त्याचे 44 अब्ज डॉलरमध्ये ट्विटर अधिग्रहण करण्याचे वचन दिले आहे. समोर आलेल्या वृत्तानुसार मस्कला निधी हस्तांतरित करण्याच्या अंतिम टप्प्यात असलेल्या बँकांनी अंतिम क्रेडिट करार पूर्ण केला आहे आणि त्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्याच्या प्रक्रियेत आहेत.
अधिक वाचा : युनिलिव्हरला ग्रहण !, Dove आणि Tresemme Shampoo मुळे कॅन्सरचा धोका
दक्षिण कोरियाचा मिरे अॅसेट फायनान्शियल समूह या डीलमध्ये मस्कची मदत करणार आहे. मस्क आणि ट्विटरमधील सौद्यासाठी इलॉन मस्कला 44 अब्ज डॉलरचा व्यवहार पूर्ण करण्यासाठी वित्तपुरवठा करण्यासाठी सुमारे 300 अब्ज कोरियन वॉन (20.8 कोटी डॉलर)ची योजना आखली आहे.
गेले कित्येक महिने मस्क आणि ट्विटरचा हा सौदा चर्चेत असून या दरम्यान ट्विटर आणि मस्क यांच्यात शीतयुद्ध सुरू होते. हा सौदा पूर्ण होणार की फिस्कटणार याबद्दल बऱ्याच उलट सुलट बातम्या समोर येत होत्या. ट्विटरच्या भवितव्याबद्दलदेखील मोठी चर्चा होत होती.
अधिक वाचा - Relationship Tips : कोणत्याही पत्नीला पतीच्या या गोष्टी आवडत नाहीत
याआधी मस्क यांनी ट्विटरला पत्र लिहून माहिती लपवत असल्याचा आरोपदेखील केला होता. ट्विटरला पाठवलेल्या नव्या पत्रात, इलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटरवर (Twitter)आरोप केला होता की त्यांनी यापूर्वी उपस्थित केलेल्या ट्विटरमधील बनावट खात्यांबाबत माहितीच्या अधिकाराला ट्विटरने विरोध आणि अडवणूक केली आहे. ट्विटरकडून माहिती न देण्याच्या धोरणाला अधिग्रहरण कराराच्या अटींचे उल्लंघन केल्याचे मस्कने म्हटले होते. त्यामुळे हा सौदा धोक्यात आला होता.