Elon Musk | Tesla मधील आपले १० टक्के शेअर विकू इच्छितात इलॉन मस्क, लोकांवर सोपवला निर्णय, ट्विटरवर मागितले मत

Elon Musk Holding in Tesla | काही डेमोक्रेट्सचे असे मत आहे की अब्जाधीशांच्या मालकीच्या कंपन्यांच्या शेअरच्या किंमतीत वाढ झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या हिश्याच्या शेअर्सवर अतिरिक्त कर दिला पाहिजे. याचा दबाव टेस्लाचे (Tesla) मालक असलेल्या इलॉन मस्क यांच्यावर आहे. त्यामुळे त्यांनी टेस्लामधील आपले १० टक्के शेअर विकण्याचा विचार ट्विटरवर (Twitter) मांडला आहे.

Elon Musk wants to sale 10 % shares of Tesla
इलॉन मस्क टेस्लामधील १० टक्के शेअर विकू इच्छितात 
थोडं पण कामाचं
  • इलॉन मस्क यांची संपत्ती ३०० अब्ज डॉलरच्याही वर
  • अमेरिकन सरकारचा अमेरिकेतील (American Government) अब्जाधीशांवर एक खास कर लावण्याचा विचार
  • इलॉन मस्क यांनी टेस्लामधील आपले १० टक्के शेअर विकण्याचा विचार ट्विटरवर (Twitter) मांडला

Elon Musk Holding in Tesla | न्यूयॉर्क : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती (World's Richest) असलेले इलॉन मस्क (Elon Musk) सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. या वर्षभरात संपत्तीत जबरदस्त वाढ नोंदवत इलॉन मस्क यांची संपत्ती ३०० अब्ज डॉलरच्याही वर गेली आहे. मात्र आता अमेरिकन सरकारने अमेरिकेतील (American Government) अब्जाधीशांवर एक खास कर लावण्याचे मत मांडले आहे. त्या दिशेने हालचाली होत आहेत. काही डेमोक्रेट्सचे असे मत आहे की अब्जाधीशांच्या मालकीच्या कंपन्यांच्या शेअरच्या किंमतीत वाढ झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या हिश्याच्या शेअर्सवर अतिरिक्त कर दिला पाहिजे. याचा दबाव टेस्लाचे (Tesla) मालक असलेल्या इलॉन मस्क यांच्यावर आहे. त्यामुळे त्यांनी टेस्लामधील आपले १० टक्के शेअर विकण्याचा विचार ट्विटरवर (Twitter) मांडला आहे. याआधीही इलॉन मस्क यांनी टेस्लाचे काही शेअर विकण्याबाबत सूतोवाच केले होते. आता मस्क यांनी ट्विटरवर यासंदर्भात लोकांचे मत मागवले आहे. (Elon Musk Holding in Tesla | Elon Musk ask for poll on twitter regarding selling his 10 % shares of Tesla)

मस्क यांच्या संपत्तीत टेस्लामुळे वाढ

मागील वर्षभरात टेस्लाच्या शेअर्सच्या किंमतीत तुफान तेजी आली आहे. मस्ककडे टेस्लाची मालकी असल्यामुळे टेस्लाच्या शेअर्सचा मोठा हिस्सा आहे. त्यामुळे टेस्लाच्या शेअरमधील तेजीचा मोठा लाभ इलॉन मस्क यांना झाला आहे. इलॉन मस्क यांची संपत्ती ३०० अब्ज डॉलरवर पोचण्यात टेस्लाच्या शेअरमधील तेजी हे एक महत्त्वाचे कारण आहे. त्यातच आता अमेरिकेतील अब्जाधीशांकडून खास कर वसूल करण्याचा विषय समोर आल्याने मस्क यांनी टेस्लामधील आपल्या शेअरचा १० टक्के हिस्सा विकण्याचा प्रस्ताव समोर ठेवला आहे. मात्र यासाठी मस्क यांनी एक अनोखी कल्पना लढवली आहे. त्यांनी ट्विटरवर सर्वसामान्य लोकांना हा प्रश्न विचारला आहे की त्यांनी आपले शेअर्स विकावेत की नाही. या पोलनुसार इलॉन मस्क निर्णय घेणार आहेत. लोक जो निर्णय देतील तो मस्क मान्य करणार आहेत. मस्क यांच्या संपत्तीत मोठा हिस्सा टेस्लाच्या शेअर्सच्या रुपाने आहे.

याआधी मस्क आणि संयुक्त राष्ट्रसंघाचे एक अधिकारी यांच्यातील वाद रंगला होता. या अधिकाऱ्याने असे मत व्यक्त केले होते की मस्क यांनी ६ अब्ज डॉलरचे दान केल्यास जगातील उपासमार संपवता येईल.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या अधिकाऱ्याचे मत

संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न कार्यक्रमाचे संचालक डेव्हिड बेस्ली यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे की टेस्लाच्या चीफने एकूण संपत्तीपैकी फक्त २ टक्के संपत्ती जगातील उपासमार संपवू शकते. त्यांनी म्हटले होते की इलॉन मस्क यांची संपत्ती ३०० अब्ज डॉलरपेक्षा जास्त आहे. तर दुसऱ्या स्थानावर जेफ बेझॉस आहेत. बेझॉस यांच्याकडे १९५ अब्ज डॉलरची संपत्ती आहे. हे दोघे जगातील उपासमार संपवू शकतात. त्यांनी म्हटले की इलॉन मस्क यांच्याकडे ही एक चांगली संधी आहे की ते फक्त दोन टक्के म्हणजे सहा अब्ज डॉलरने जगाची उपासमार संपवू शकतात.

मस्क यांचे ट्विट

जगातील उपासमारी संपवण्यासाठी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले इलॉन मस्क पुढे आले आहेत. टेस्लाचे सीईओ असलेले मस्क यांचे म्हणणे आहे की जर संयुक्त राष्ट्रसंघाच्या अधिकाऱ्यांनी हे सिद्ध केले की सहा अब्ज डॉलरने जगातील उपासमारी संपू शकेल तर ते आपले शेअर विकण्यास तयार आहेत. यासंदर्भात मस्क यांनी ट्विटदेखील केले आहे. त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघाचे जागतिक अन्न कार्यक्रमाचे संचालक डेव्हिड बेस्ली यांच्या ट्विटला रिट्विट करत म्हटले आहे की डब्ल्यूएफपी यांनी यासंदर्भात सांगावे की सहा अब्ज डॉलरने जगातील उपासमारी कशी संपेल. त्यांनी हे सांगितल्यास मी लगेचच टेस्लाचे माझे शेअर विकून उपासमारीवर काम करण्यासाठी दान करेन.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी