रॉकेटपेक्षा वेगाने वाढतेय Elon Muskची संपत्ती, बिल गेट्स आणि वॉरेन बफे यांच्या एकत्रित संपत्तीपेक्षा जास्त

बिल गेट्स आणि वॉरेन बफे या दोघांची संपत्ती एकत्र केली तर ती २३३ अब्ज डॉलर इतकी आहे. तर एकट्या इलॉन मस्कची संपत्ती २३६ अब्ज डॉलर आहे. मुकेश अंबानी यांची संपत्ती पहिल्यांदाच १०० अब्ज डॉलरच्या पुढे गेली आहे.

Net worth of Elon Musk
इलॉन मस्क यांची एकूण संपत्ती 
थोडं पण कामाचं
  • लॉन मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
  • मस्क यांच्याकडे २३६ अब्ज डॉलरची संपत्ती
  • त्यांच्या संपत्तीत यावर्षी आतापर्यत ६६.५ अब्ज डॉलरची वाढ

नवी दिल्ली: स्पेसएक्स, टेस्ला, बोरिंग कंपनीसारख्या कंपन्यांचे मालक असलेले इलॉन मस्क (Elon Musk)यांची संपत्ती रॉकेटपेक्षाही अधिक वेगाने वाढते आहे. ब्लूमबर्ग बिलियनेर इंडेक्सनुसार इलॉन मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची एकूण संपत्ती (Net worth of Elon Musk) २३६ अब्ज डॉलरवर पोचली आहे. हा आतापर्यतचा एक विक्रम आहे. मागील २४ तासात त्यांच्या संपत्तीत जवळपास ६ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. बिल गेट्स आणि वॉरेन बफे या दोन जगप्रसिद्ध धनाढ्यांची जेवढी एकत्रित संपत्ती आहे म्हणजे या दोघांच्या संपत्तीची बेरीज केल्यावर जितकी संपत्ती होईल त्यापेक्षा जास्त संपत्ती एकट्या इलॉन मस्कची आहे. (Net worth of Elon Musk is rising at the speed of rocket)

जेफ बेझॉस दुसऱ्या स्थानावर

बिल गेट्स जगातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची एकूण सपत्ती १३० अब्ज डॉलर आहे. तर वॉरेन बफे जगातील दहाव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. बफेंची एकूण संपत्ती १०३ अब्ज डॉलर आहे. या दोघांची संपत्ती एकत्र केली तर ती २३३ अब्ज डॉलर इतकी आहे. तर एकट्या इलॉन मस्कची संपत्ती २३६ अब्ज डॉलर आहे. मस्क यांच्या संपत्तीत यावर्षी आतापर्यत ६६.५ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. अॅमेझॉनचे जेफ बेझॉस यांच्याकडे १९७ अब्ज डॉलरची संपत्ती असून ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत. २४ तासात बेझॉसच्या संपत्ती ५.६३ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. तर वर्षभरात त्यांच्या संपत्तीत आतापर्यत ६.८१ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. फ्रेंच धनाढ्य बर्नार्ड अर्नाल्ट यांची संपत्ती १६४ अब्ज डॉलर इतकी आहे.

मुकेश अंबानींनी पहिल्यांदा पार केला १०० अब्ज डॉलरचा टप्पा

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्याकडे १०२ अब्ज डॉलरची संपत्ती आहे. ते जगातील ११व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. मुकेश अंबानी यांची संपत्ती पहिल्यांदाच १०० अब्ज डॉलरच्या पुढे गेली आहे. यावर्षी आतापर्यत अंबानींच्या संपत्तीत २५.२० अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. तर ७७.७ अब्ज डॉलरसह गौतम अदानी १३ व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. यावर्षी आतापर्यत अदानींच्या संपत्तीत ४४ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे.

मस्क यांच्या संपत्तीत ६६ अब्ज डॉलरची वाढ

यावर्षी सर्वाधिक संपत्ती वाढणाऱ्यांमध्ये ईलॉन मस्क नंबर वन आहेत. त्यांच्या संपत्तीत यावर्षी आतापर्यत ६६.५ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. त्यानंतर बर्नार्ड अर्नाल्ड यांच्या संपत्तीत ४९.७ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे आणि तिसर्या क्रमांकावर गौतम अदानी यांच्या संपत्ती वाढ झाली आहे. अदानींची संपत्ती आतापर्यत ४४ अब्ज डॉलरने वाढली आहे. गौतम अदांनीच्या संपत्तीतदेखील यावर्षी जोरदार वाढ झाली आहे. मुकेश अंबानींच्या संपत्ती यावर्षी आतापर्यत २५.२० अब्ज डॉलरची वाढ झाली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी