Future plans of Elon Musk | जगभरातील उद्योगपती पैसे कमावण्यात व्यस्त असताना, इलॉन मस्कचे आहेत जबरदस्त प्लॅन

Elon Musk Plans | टेस्ला (Tesla) आणि स्पेसएक्स (SpaceX) सारख्या कंपन्यांचे मालक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती (Worlds richest person) असलेल्या इलॉन मस्क यांच्याबद्दल जगभर कमालीचे आकर्षण आणि कुतुहल आहे. त्यांच्या वेगवेगळ्या योजना काय आहेत आणि ते भविष्यात काय करू इच्छितात याबद्दल सर्वानाच उत्सुकता असते. इलॉन मस्क यांनी आता अनेक ट्विट केले आहेत.

Future plans of Elon Musk
इलॉन मस्कच्या भविष्यातील जबरदस्त योजना 
थोडं पण कामाचं
  • इलॉन मस्क यांनी केले आपल्या योजनांविषयी सूतोवाच करणारे ट्विट
  • इलॉन मस्कचे मानवी इतिहास बदलून टाकणारे जबरदस्त प्लॅनिंग
  • इलॉन मस्क यांना बनवायची आहे मंगळ ग्रहावर आणि इतर ग्रहांवर मानवी वस्ती

Elon Musk  | न्यूयॉर्क : कायम चर्चेत असणाऱ्या आणि नवनवीन तंत्रज्ञानाविषयी बोलणाऱ्या इलॉन मस्क (Elon Musk) यांचे ट्विट नेहमीच चर्चिले जात असतात. टेस्ला (Tesla) आणि स्पेसएक्स (SpaceX) सारख्या कंपन्यांचे मालक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती (Worlds richest person) असलेल्या इलॉन मस्क यांच्याबद्दल जगभर कमालीचे आकर्षण आणि कुतुहल आहे. त्यांच्या वेगवेगळ्या योजना काय आहेत आणि ते भविष्यात काय करू इच्छितात याबद्दल सर्वानाच उत्सुकता असते. इलॉन मस्क यांनी आता अनेक ट्विट केले आहेत. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की त्यांनी आपली नोकरी सोडून पूर्णवेळ इन्फ्लुएन्सर बनावे का. आणखी एका ट्विटमध्ये मस्क यांनी आपल्या मंगळ ग्रहावर जाण्याच्या स्वप्नाबद्दल भाष्य केले आहे. (Elon Musk new twits, wants to go to Mars, what are his new plans?)

एका ट्विटमध्ये इलॉन मस्क यांनी आपल्या भविष्यातील योजना, आपली स्वप्ने याकडे निर्देश केला आहे. त्यांनी म्हटले आहे की '२०२२ सुरू होण्यास फक्त तीनच आठवडे शिल्लक राहिले आहेत. २०३२ कसा असेल ? ही गोष्ट फारच भविष्यातील वाटते. पण आपण मंगळ ग्रहावर असू का.' याप्रकारचे ट्विट करत इलॉन मस्क यांनी भविष्यातील आपल्या योजनांकडेच जणू लक्ष वेधले आहे.

मस्कच्या ट्विटवर आल्या कॉमेंट्स

ट्विटर इलॉन मस्क यांच्या ट्विटवर अनेक लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही लोकांनी मंगळ ग्रहावर जाण्यासाठीच्या तिकिटाबद्दल विचारले. कर काही युजर्सने मंगल ग्रहावर डॉजकॉइन असेल का असे विचारले. एका युट्युबरने ज्याचे नाव मॅट वॉलेस आहे, त्याने म्हटले आहे की २०३२ पर्यत डॉजकॉइन पृथ्वीचे चलन झालेले असेल. तर आणखी एका युजरने म्हटले की आमचे मंगळ ग्रहावर जाणे तुमच्यावर अवलंबून आहे. काही युजर्सनी मस्क यांच्या ट्विट करण्याबद्दल, मस्क यांच्या अमर होण्याबद्दल प्रतिक्रिया दिल्या आहेत.

इलॉन मस्कची इच्छा मंगळ ग्रहावर शहर वसवण्याची

स्पेसएक्सचे संस्थापक इलॉन मस्क नेहमीच मंगळ ग्रहावर एक शहर वसवण्याच्या आपल्या स्वप्नाबद्दल बोलत असतात. स्पेक्सएक्स या कंपनीची स्थापना करताना कंपनीच्या उद्दिष्टामध्ये अनेक ग्रहांवर जीवसृष्टी वसवण्याची बाब शक्य करणे हेदेखील होते. इलॉन मस्क यांचे म्हणणे आहे की मंगळासारख्या इतर ग्रहांवर मानवाची वस्ती केल्याने मानवी संस्कृती वाचवता येऊ शकेल, असे इलॉन मस्कचे मत आहे. त्यांना वाटते की मंगळासारख्या इतर ग्रहांवर मानवी वस्ती तयार केल्याने मानवी संस्कृती वाचवता येऊ शकेल. पृथ्वीवर जर काही मोठी आपत्ती निर्माण झाली तर या इतर ग्रहांवरील मानवी वस्त्यांमुळे मानवी जीवन सुरक्षित राहील. २०१६ मध्ये इलॉन मस्क यांनी म्हटले होते की इतिहास दोन दिशांना विभागला जाणार आहे. एक मार्ग आहे की आपण पृथ्वीवरच कायमचे राहायचे. मग सर्व काही नष्ट होण्याची घटना एखाद्या दिवशी घडेल. तर दुसऱ्या ग्रहावर वस्ती केल्याने मानवी संस्कृती सुरक्षित ठेवता येईल. दुसऱ्या ग्रहांवर मानवी वस्ती करण्यासाठी जास्त माणसांची गरजदेखील भासणार नाही.

स्पेसएक्सचे अंतराळयान

स्पेसएक्स ही अंतराळ क्षेत्रात काम करणारी कंपनी आहे. स्पेसएक्सने जगातील सर्वोत्तम रॉकेट तयार केले आहे. स्पेसएक्स नव्या अंतराळयानाची म्हणजे स्टारशिपची चाचणी करणार आहे. इलॉन मस्क आणि स्पेसएक्सच्या भविष्यातील अंतराळ प्रवासाच्या योजनांचाच हा एक भाग आहे. हे इलॉन मस्कचे स्वप्न आहे. स्पेसएक्सला वाटते की मानवाला मंगळ ग्रहावर घेऊन जाण्यासाठी एक दिवसाचा कालावधी लागणार आहे. स्टारशिपला अंतराळ कक्षेत नेण्यासाठी फ्लोरिडा येथे एक नवे लॉंचपॅड तयार करण्यात येते आहे.


ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी