Elon Musk Twitter Deal | तुम्ही इलॉन मस्कच्या बातम्या वाचत राहिलात....ही क्रिप्टोकरन्सी घेणाऱ्यांचे पैसे 24 तासात झाले 105 पट...लाखाचे करोड!

Investment in Crypto Token : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी ट्विटर काल रात्री विकत घेतल्यावर जगभर खळबळ उडाली आहे. इलॉन मस्कने ट्विटर ताब्यात घेतल्यामुळे टेस्ला, ट्विटर यांच्यावर काय परिणाम होणार यावर जगभरातून चर्चा होते आहे. इलॉन मस्कचा याच काय आणि किती फायदा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, मात्र या सौद्याचा मोठा फायदा एका क्रिप्टोकरन्सीला झाला आहे.

Elon Musk Effect on Cryptocurrency
इलॉन मस्कने ट्विटर विकत घेतल्याचा क्रिप्टोकरन्सींवरील परिणाम 
थोडं पण कामाचं
  • इलॉन मस्कने ट्विटर विकत घेतल्याचा एका क्रिप्टो टोकनला तुफान फायदा
  • या क्रिप्टो टोकनमध्ये फक्त 24 तासात 105 पट झाली वाढ
  • या क्रिप्टो टोकनच्या गुंतवणुकदारांनी एकाच दिवसात केली आयुष्यभराची कमाई

ELON BUYS TWITTER : न्यूयॉर्क : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी ट्विटर काल रात्री विकत घेतल्यावर जगभर खळबळ उडाली आहे. इलॉन मस्कने ट्विटरचा ताबा तब्बल 44 अब्ज डॉलरना घेतला आहे. आता इलॉन मस्कने ट्विटर ताब्यात घेतल्यामुळे टेस्ला, ट्विटर यांच्यावर काय परिणाम होणार यावर जगभरातून चर्चा होते आहे. इलॉन मस्कचा याच काय आणि किती फायदा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, मात्र या सौद्याचा मोठा फायदा एका क्रिप्टोकरन्सीला झाला आहे. नाही मित्रांनो तुमचा अंदाज चुकला ही क्रिप्टोकरन्सी म्हणजे मस्कचे लाडके डॉजकॉइन नाही. तर इलॉन बाइज ट्विटर (ELON BYS TWITTER) असे या क्रिप्टोकरन्सी टोकनचे नाव आहे. ( Elon Musk now owns the Twitter, by this deal one Cryptocurrency benefitted hugely & zoomed over 10,500%)

अधिक वाचा : Jeff Bezos on Musk | इलॉन मस्कने ट्विटर विकत घेतल्यावर, जेफ बेझॉस यांना चीनबद्दल आहे मोठी शंका...पाहा काय आहे प्रकरण

ELON BYS TWITTER मधील तुफान तेजी

टेक अब्जाधीश इलॉन मस्क यांनी ट्विटरवर कब्जा मिळवल्यानंतर या बातमीचा सर्वाधिक फायदा 'ELON BYS TWITTER' या क्रिप्टोकरन्सी टोकनला झाला आहे. या क्रिप्टोकरन्सी टोकनचे व्यवहार विकेंद्रीकृत एक्सचेंजेसवर केले जात आहेत. ट्विटर मस्क महाशयांच्या ताब्यात गेल्यानंतर गेल्या 24 तासांमध्ये इलॉन बाइज ट्विटर (ELON BYS TWITTER) या क्रिप्टोकरन्सी टोकनच्या किंमतीत थोडथोडकी नव्हे तर छप्परफाड 10,500 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

CoinMarketCap च्या माहितीनुसार, ELON BUYS TWITTER हे क्रिप्टोकरन्सी टोकन  0.000009443 डॉलरवर पोचले आहे. या क्रिप्टोकरन्सी टोकनच्या किंमतीत मागील फक्त 24 तासांमध्ये 10,524 टक्क्यांची अभूतपूर्व वाढ झाली आहे. CoinMarketCap च्या डेटानुसार, हे क्रिप्टोकरन्सी टोकन 21 एप्रिलला तयार केले गेले होते आणि PancakeSwap आणि OpenOcean सारख्या विकेंद्रित क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजेसवर त्याचे व्यवहार केले जात आहेत. CoinMarketCap च्या डेटानुसार मंगळवारी सकाळी 9:35 वाजता ELON BUYS TWITTER हे टोकन 4589.35 टक्क्यांची वाढ नोंदवून 0.000004094 डॉलरवर ट्रेडिंग करत होते.

अधिक वाचा : LIC IPO Date | इंतजार खत्म ! 4 मे ला येणार एलआयसीचा आयपीओ... सोडू नका सरकारच्या दुभत्या गाईकडून कमाईची मोठी संधी...7 महत्त्वाच्या गोष्टी

मीम्स बनवणाऱ्यांना कमाईची संधी

या क्रिप्टो टोकनचे निर्माते असा दावा करतात की ELON BUYS TWITTER चे उद्दिष्ट "मीम्स बनवणाऱ्यांना कमाईची संधी देणे आणि त्यांना त्यांच्या कामासाठी घसघशीत परतावा मिळवून देणे हा आहे. मीम्स निर्मात्यांना आर्थिक स्वातंत्य मिळवून देण्यासाठी हे टोकन कार्यरत आहे.  "ELON BYS TWITTER'' हे टोकन महत्वाकांक्षी मीम्स निर्मात्यांना त्यांची प्रतिभा जगासमोर दाखवण्यात आणि त्याबदल्यात त्यांना काही आर्थिक लाभ मिळवण्यास मदत करेल." 

परंतु हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की "ELON BYS TWITTER'' हे क्रिप्टोकरन्सी बनवणारे ही सर्व प्रक्रिया नेमकी कशी होणार ते मात्र स्पष्ट करत नाहीत. 

अधिक वाचा : Gold price today | घसरणीनंतर सोन्याच्या भावात झाली वाढ तर चांदीची चमकदेखील वाढली, पाहा ताजा भाव

तज्ज्ञ म्हणतात जपून राहा

याबद्दल तज्ञांना मात्र असे वाटते की हे नवे क्रिप्टोकरन्सी टोकन म्हणजे पैसा ओतण्याचे आणि काढण्याचे किंवा वळवण्याची एक पद्धतशीर योजना आहे. त्यामुळे गुंतवणुकदारांनी अशा मीम्स कॉइनमध्ये विकेंद्रीकृत क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजद्वारे गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगली पाहिजे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी