Twitter fires thousands of contract workers : न्यूयॉर्क : इलॉन मस्क (Elon Musk) आणि ट्विटर (Twitter) यांची चर्चा संपण्याचे चिन्ह दिसत नाही. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या इलॉन मस्कने ट्विटर ताब्यात घेतल्यापासून ट्विटरभोवती वादळ घोंघावते आहे. आता ताज्या घडामोडीत मस्कने ट्विटरमधील हजारो कंत्राटी कर्मचाऱ्यांना (Twitter Layoffs)नोकरीवरून काढून टाकले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार मस्कच्या या निर्णयाचा फटका ट्विटरमधील 5,500 कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी 4,400 कर्मचाऱ्यांवर होणार आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून काढून टाकल्याचा दावा या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी केला आहे. याआधीच ट्विटर ताब्यात आल्याबरोबर मस्कने ट्विटरमधील हजारो कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकले आहे. यात उच्चपदस्थ अधिकारीदेखील आहेत. (Elon Musk removes thousands of contract workers from Twitter)
अधिक वाचा - Skin Dryness: रुक्ष त्वचेवर करा घरगुती उपाय, असं बनवा मॉइश्चुरायझर
समोर आलेल्या वृत्तानुसार ट्विटर कंत्राटी कर्मचाऱ्यांना कोणतीही नोटीस न देता नोकरीवरून काढून टाकले आहे. या कर्मचाऱ्यांचा अधिकृत मेल आणि ऑनलाइन सेवांवरील प्रवेश बंद करण्यात आला आहे. ज्या वेळेस कर्मचाऱ्यांना या गोष्टी वापरण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना परवावगी नाकारण्यात आली त्यानंतर या कर्मचाऱ्यांना आपल्याला काढून टाकल्याचे लक्षात आले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार या नोकर कपातीची घोषणा कंपनीच्या जागतिक कामकाजात करण्यात आली होती. त्यात कंटेंट मॉडरेशन, रिअल इस्टेट, मार्केटिंग, इंजिनिअरिंग आणि इतर विभागांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची छाटणी करण्यात येणार असल्याचे सांगितले होते.
अधिक वाचा - Sitting Job Side Effects: तुमचे काम बैठे आहे का? ऑफिस किंवा घरी तासनतास बसून काम केल्यास लागतील हे आजार...
टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेतल्यानंतर पहिल्या आठवड्यात हजारो कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकले होते. त्या पहिल्या धक्क्यानंतर आता नवा धक्का समोर आला आहे. मस्कने जगभरातील ट्विटर ऑफिसमधून सुमारे 3,700 कर्मचाऱ्यांना काढून टाकले होते. ट्विटर भारतातील एकूण कर्मचाऱ्यांपैकी 90 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकल्याचे सांगण्यात येते आहे.
नोकरकपातीच्या या ताज्या घडामोडीनंतर, ट्विटरने त्याच्या एकूण कर्मचार्यांपैकी अर्ध्याहून अधिक कर्मचारी गमावले आहेत. ट्विटरमधील माहितीचे नियमन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आल्याने आता बनावट खाती, फ्रॉड आणि सायबर गुन्हे यासारख्या घटनांची ट्विटरच्या बाबतीत वाढ होण्याची भीती व्यक्त करण्यात येते आहे.
अधिक वाचा - गँगवॉरमधून 22 वर्षीय तरुणाची हत्या
ट्विटरने महसूल वाढवण्यासाठी नवीन ब्लू सबस्क्रिप्शन लाँच केले आहे. यापुढे युजर्सना 8 डॉलरचे शुल्क भरल्यानंतर ब्ल्यू टिक मिळणार आहे. यामुळे बनावट खात्यांनादेखील ब्ल्यू टिक मिळू लागल्याने गोंधळ निर्माण झाला होता. परिणामी ट्विटरला आपला हा निर्णय मागे घ्यावा लागला होता.
इलॉन मस्कने ऑक्टोबरच्या अखेरीस ट्विटरवर मालकी मिळवण्याचा 44 अब्ज डॉलरचा करार पूर्ण केला. त्यानंतर ट्विटरमध्ये मोठे वादळच आले आहे. मस्कने ट्विटरमधील अर्धे कर्मचारी, बहुतेक उच्च-स्तरीय अधिकारी आणि अगदी संचालक मंडळाला काढून टाकले आहे. यापुढील काळात मस्क ट्विटरमध्ये नेमके कोणते बदल घडवून आणणार याकडेच आता सर्वांचे लक्ष लागले आहे.