Elon Musk Update : इलॉन मस्कने आधी दिला जागतिक मंदीचा इशारा, नंतर यूटर्न घेत म्हटले कर्मचारी कपात नाही तर नवी भरती करणार...

Elon Musk on Tesla Employees : जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी असलेल्या टेस्लाचे (Tesla)सीईओ इलॉन मस्क सध्या आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. दोन दिवसांपूर्वी, इलॉन मस्कने (Elon Musk)टेस्लामधील 10% कर्मचार्‍यांना कामावरून काढण्याबद्दल बोलले होते. आता त्यांनी आपल्या वक्तव्यावरून यू-टर्न घेत टेस्लामध्ये नवी नोकरभरती करण्याबाबत वक्तव्य (Elon Musk new tweet)केले आहे.

Elon Musk latest Tweet
इलॉन मस्कची कर्मचाऱ्यांसंदर्भातील ताजी भूमिका 
थोडं पण कामाचं
  • इलॉन मस्कने आधी दिला होता ऑटोमोबाइल क्षेत्रातील मंदीचा इशारा
  • टेस्लामधील कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्याची सक्ती करत कर्मचारी कपातीची होती धमकी
  • आता नव्या ट्विटमध्ये मस्क म्हणतात करणार नवी नोकरभरती

Elon Musk on Tesla Employees : न्यूयॉर्क : जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी असलेल्या टेस्लाचे (Tesla)सीईओ इलॉन मस्क सध्या आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. दोन दिवसांपूर्वी, इलॉन मस्कने (Elon Musk)टेस्लामधील 10% कर्मचार्‍यांना कामावरून काढण्याबद्दल बोलले होते. आता त्यांनी आपल्या वक्तव्यावरून यू-टर्न घेत टेस्लामध्ये नवी नोकरभरती करण्याबाबत वक्तव्य (Elon Musk new tweet) केले आहे. आपल्या आधीच्या भूमिकेवरून पलटी मारत इलॉन मस्क म्हणाले की ते पुढील 12 महिन्यांत टेस्लामधील कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याचा विचार करीत आहेत. इलॉन मस्क यांनी शनिवारी आपल्या ट्विटर खात्यावर ट्विट करत म्हटले होते की, टेस्लामधील एकूण कर्मचाऱ्यांची संख्या वाढेल. मात्र, पगारदार कर्मचाऱ्यांची संख्या जैसे थे इतकीच असेल. (Elon Musk takes U-turn on job cuts in Tesla, now says will start new recruitment)

अधिक वाचा : EPFO Update: मोठी बातमी! या तारखेला तुमच्या पीएफ खात्यात जमा होणार पैसे, जाणून घ्या कसे तपासायचे

टेस्लाच्या अधिकाऱ्यांना पाठवण्यात आला ईमेल

तुमच्या माहितीसाठी गुरुवारी टेस्लाच्या अधिकाऱ्यांना अंतर्गत ईमेल पाठवण्यात आला होता. हा ईमेल "जगभरातील सर्व नोकरभरती थांबवा" या शीर्षकासह पाठवण्यात आला होता. यामध्ये मस्क यांनी जागतिक अर्थव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली होती आणि जागतिक अर्थव्यवस्थेची सध्याची परिस्थिती पाहून खूप वाईट वाटत असल्याचे म्हटले होते. यासोबतच कर्मचाऱ्यांची संख्या १० टक्के कमी करण्याचाही मुद्दा मांडण्यात आला होता.

टेस्लाच्या अधिकाऱ्यांना पाठवलेल्या ईमेल मस्क म्हणाले होते की टेस्लाचे सुमारे 10% कर्मचारी कमी करणे आवश्यक आहे. नंतर त्यांनी कर्मचाऱ्यांना सांगितले की व्हाईट कॉलर रँक फुगल्या आहेत आणि ते कार आणि बॅटरी बनवण्यासाठी कामगारांना कामावर ठेवतील.

अधिक वाचा : Ration Card Update: रेशन घेण्याच्या नियमात बदल, जाणून घ्या रेशन कार्डशी संबंधित नवीन तरतुदी

कर्मचाऱ्यांना दिली होती तंबी

या आठवड्याच्या सुरुवातीला, मस्कने टेस्ला कर्मचार्‍यांना कार्यालयात येऊन काम करा किंवा कंपनी सोडण्यास सांगितले. कर्मचाऱ्याला किमान ४० तास (दर आठवड्याला) कार्यालयात यावे लागेल अन्यथा नोकरी सोडावी लागेल, असा इशारा मस्क यांनी दिला होता. "टेस्ला येथील प्रत्येकाने दर आठवड्याला किमान 40 तास कार्यालयात घालवले पाहिजेत," असे मस्क यांनी मंगळवारी रात्री कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या दुसर्‍या ईमेलमध्ये लिहिले होते. तुम्ही न आल्यास, तुम्ही राजीनामा दिला आहे असे आम्ही समजू." असेही मस्कने कर्मचाऱ्यांना ठणकावले होते. मात्र त्यानंतर टेस्लाबद्दल नकारात्मक प्रतिक्रिया उमटल्या होत्या. टेस्लाच्या शेअर्समध्येही घसरण झाली होती.

अधिक वाचा : IRCTC Destination Alert Service : आता प्रवाशांना स्टेशन सुटण्याची चिंता न करता झोपता येणार, रेल्वेने सुरू केली वेकअप अलर्ट सुविधा...

टेस्लासमोरील आव्हाने

"जगातील सर्वात मोठ्या ईव्ही कंपनीने नोकऱ्या आणि अर्थव्यवस्थेबाबत चेतावणी दिल्यास, गुंतवणूकदारांनी त्यांच्या मार्जिन आणि टॉप-लाइन वाढीच्या अंदाजांवर पुनर्विचार करावा," असेही मस्क म्हणाले होते. त्यानंतर टेस्लाचा शेअर तब्बल 9% घसरला होता.

कंपनीच्या वार्षिक अहवालानुसार 2019 च्या अखेरीपासून टेस्लाचा कर्मचाऱ्यांवरील खर्च दुप्पट झाला आहे आणि मॉर्गन स्टॅन्लेच्या जोनास यांनी नमूद केले आहे की टेस्लाचा प्रति कर्मचारी महसूल 853,000 डॉलर इतका आहे.  तो टेस्लापेक्षा आकाराने कितीतरी मोठ्या असणाऱ्या फोर्डपेक्षा खूप जास्त नाही. सध्या फोर्ड मोटर्सचा प्रति कर्मचारी 757,000 डॉलर इतका आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी