Elon Musk | ट्विटरवर लोकांचा इलॉन मस्कला होकार, टेस्लाचे १० टक्के शेअर विकण्याचा प्रस्ताव, आता मस्क काय करणार?

Elon Musk & Tesla Shares | इलॉन मस्क यांनी ट्विटरवर घेतलेल्या पोलमध्ये ३५ लाख लोकांनी मतदान केले. आपण कोणतेही वेतन किंवा बोनस घेत नसून आपल्याकडे शेअर्स हेच भांडवल आहे. त्यामुळे १० टक्के शेअर्स विकण्याचा माझा प्रस्ताव आहे, असे मस्क यांनी म्हटले आहे.

Elon Musk & Tesla Shares
इलॉन मस्क टेस्लाचे १० टक्के शेअर विकणार 
थोडं पण कामाचं
  • ट्विटर पोलवर इलॉन मस्कला लोकांकडून होकार
  • आपण टेस्लाचे १० टक्के शेअर विकावेत की नाही, असा इलॉन मस्ककडून पोल
  • अमेरिकेत अब्जाधीशांकडून स्वतंत्र कर वसूल करण्याचा प्रस्ताव

Elon Musk & Tesla Shares | न्यूयॉर्क : टेस्लाचा (Tesla) सीईओ आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या इलॉन मस्कला (Elon Musk) ट्विटर लोकांनी होकार दिला आहे. आपण टेस्लाचे १० टक्के शेअर विकावेत की नाही, असा प्रस्ताव किंवा पोल इलॉन मस्कने ट्विटरवर (Twitter)ठेवला होता. ट्विटरवर लोक जे मत देतील ते आपल्याला मान्य असेल असेदेखील मस्कने म्हटले होते. आता ट्विटरवर झालेल्या पोलनुसार (Twitter Poll) ५७.९ टक्के लोकांनी इलॉन मस्क यांनी टेस्लामधील स्वत:च्या मालकीचे १० टक्के (Selling 10% of Musk Tesla stock)शेअर विकावेत असा कौल दिला आहे. कोणत्याही प्रकारच्या मतासाठी मी तयार होतो, असे मत यावर इलॉन मस्क यांनी व्यक्त केले आहे.  (Elon Musk : Twitter users say 'Yes' to Musk's proposal of selling 10% of his Tesla stock)

मस्क यांनी आधीदेखील शेअर विकायचा विचार केला होता व्यक्त

इलॉन मस्क यांनी याआधीदेखील म्हटले होते की त्यांना पुढील तीन महिन्यात शेअर विक्रीवर विचार करावा लागेल. शेअर विकल्यामुळे कर भरण्यासाठी निधी उपलब्ध होणार आहे. ३० जूनअखेर इलॉन मस्क यांच्याकडे टेस्लाचे १७.०५ कोटी शेअर्स आहेत. यापैकी १० टक्के शेअर विकले म्हणजे मस्क यांना जवळपास २१ अब्ज डॉलर इतकी जबरदस्त रक्कम मिळणार आहे.

श्रीमंतावर कर आकारण्याचा प्रस्ताव

इलॉन मस्क यांनी ट्विटरवर घेतलेल्या पोलमध्ये ३५ लाख लोकांनी मतदान केले. आपण कोणतेही वेतन किंवा बोनस घेत नसून आपल्याकडे शेअर्स हेच भांडवल आहे. त्यामुळे १० टक्के शेअर्स विकण्याचा माझा प्रस्ताव आहे, असे मस्क यांनी म्हटले आहे. अमेरिकेच्या सिनेट डेमोक्रॅट्सने बिलियनेर टॅक्सची मागणी केली आहे. जो बायडेन सरकारच्या सामाजिक बाबींसाठी मोठा खर्च करण्याच्या धोरणासाठी पैसा उभा करण्यासाठी अमेरिकेतील अब्जाधीशांवर कर लावण्यात यावा अशी मागणी होते आहे. मस्क यांनी घेतलेल्या ट्विटर पोलवर टीका करताना वित्तीय समितीचे चेअरमन रॉन वायडेन यांनी म्हटले आहे की जगातील श्रीमंतांनी कर भरायचा की नाही हे ट्विटरवरील एखाद्या पोलच्या निकालावर अवलंबून असता कामा नये. अब्जाधीशांनी प्राप्तिकर भरण्याची वेळ आली आहे.

इलॉन मस्कच्या भावाने विकले शेअर

इलॉन मस्क यांच्याकडे टेस्लाचे २३ टक्के शेअर्स आहेत. टेस्ला सध्या जगातील सर्वाधिक बाजारमूल्य असलेल्या कंपन्यांपैकी आहे. कंपनीचे समभाग भांडवल १ ट्रिलियन डॉलरच्या वर पोचले आहे. मस्क यांच्याकडे स्पेसएक्ससारखी आणखी एक प्रचंड बाजारमूल्य असलेली कंपनी आहे. इलॉन मस्क यांचे बंधू किंबल मस्क यांनी शुक्रवारी त्यांच्याकडे असलेले टेस्लाचे ८८,५०० कोटी शेअर्स विकले आहेत. 

मस्क यांच्या संपत्तीत वाढ

मागील वर्षभरात टेस्लाच्या शेअर्सच्या किंमतीत तुफान तेजी आली आहे. मस्ककडे टेस्लाची मालकी असल्यामुळे टेस्लाच्या शेअर्सचा मोठा हिस्सा आहे. त्यामुळे टेस्लाच्या शेअरमधील तेजीचा मोठा लाभ इलॉन मस्क यांना झाला आहे. इलॉन मस्क यांची संपत्ती ३०० अब्ज डॉलरवर पोचण्यात टेस्लाच्या शेअरमधील तेजी हे एक महत्त्वाचे कारण आहे. त्यातच आता अमेरिकेतील अब्जाधीशांकडून खास कर वसूल करण्याचा विषय समोर आल्याने मस्क यांनी टेस्लामधील आपल्या शेअरचा १० टक्के हिस्सा विकण्याचा प्रस्ताव समोर ठेवला आहे. मात्र यासाठी मस्क यांनी एक अनोखी कल्पना लढवली आहे. त्यांनी ट्विटरवर सर्वसामान्य लोकांना हा प्रश्न विचारला आहे की त्यांनी आपले शेअर्स विकावेत की नाही. या पोलनुसार इलॉन मस्क निर्णय घेणार आहेत. लोक जो निर्णय देतील तो मस्क मान्य करणार आहेत. मस्क यांच्या संपत्तीत मोठा हिस्सा टेस्लाच्या शेअर्सच्या रुपाने आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी