Tesla Market Cap Rise update : नवी दिल्ली : इलॉन मस्क (Elon Musk) यांची टेस्ला (Tesla) ही ऑटोमोबाइल क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे. मागील दोन वर्षात टेस्लाच्या शेअर्सच्या किंमतीत जबरदस्त वाढ झाली आहे. यामुळे इलॉन मस्क यांच्या एकूण संपत्तीत मोठी वाढ तर झालीच आहे परंतु त्याचबरोबर टेस्लाचे बाजारमूल्यदेखील (Tesla Market Cap) प्रचंड वाढले आहे. इलॉन मस्क यांच्या टेस्ला कंपनीने अलीकडेच एक कमाल केली आहे. टेस्लाचे बाजार मूल्य सोमवारी सुमारे 84 अब्ज डॉलरने वाढले. टेस्लाच्या शेअरमधील एका दिवसातील वाढ ही फोर्ड मोटर (Ford Motor) कंपनीच्या संपूर्ण बाजार भांडवलापेक्षा म्हणजे बाजारमूल्यापेक्षा जास्त आहे. म्हणजेच मस्कच्या टेस्ला कंपनीने एकाच दिवसात फोर्ड मोटरच्या मार्केट कॅपपेक्षा जास्त बाजार मूल्याची वाढ नोंदवली आहे. (Elon Musk's Tesla market cap rises more than that of entire market cap of Ford Motor in a one day)
इलेक्ट्रिक कार निर्मात्या कार कंपनी असलेल्या टेस्लाच्या बाजार मूल्यातील ही प्रचंड वाढ एका विधानानंतर आली आहे. या विधानात कंपनीने म्हटले आहे की ते जवळपास दोन वर्षांत दुसऱ्या शेअर स्प्लिटची योजना आखत आहेत.
टेस्लाने फाइलिंगमध्ये म्हटले आहे की ते आगामी वार्षिक भागधारकांच्या बैठकीत अधिकृत समभागांची संख्या वाढवण्यासाठी मतदान करणार आहेत. टेस्लाने ट्विटद्वारे ही घोषणा केली आहे. या घोषणेनंतर टेस्लाच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली. या वर्षी NYSE FANG+ निर्देशांकात टेस्लाचा शेअर सर्वात जास्त वाढला आहे. सोमवारी, टेस्लाचे समभाग 8 टक्क्यांनी वाढून 1,091.84 डॉलरवर (Share Price of Tesla) बंद झाले. 12 जानेवारीनंतर कंपनीच्या शेअरची ही सर्वोच्च पातळी आहे.
अधिक वाचा : Richest Indian | गौतम अदानी बनले सर्वात श्रीमंत भारतीय...संपत्ती पोचली 100 अब्ज डॉलरवर
याआधी टेस्लाने त्याचा शेअर ऑगस्ट 2020 मध्ये विभाजित म्हणजे स्प्लिट केला होता. 2020 मध्ये टेस्लाचे शेअर्स 743 टक्क्यांनी वाढले. कंपन्या सहसा त्यांचे शेअर्स कमी महागडे दिसण्यासाठी आणि जास्तीत जास्त गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी शेअर्स विभाजित करतात. तथापि, स्टॉक स्प्लिटमुळे कंपनीच्या मूलभूत गोष्टी बदलत नाही. अॅपल (Apple) आणि एव्हिडिया (Nvidia) ने गेल्या दोन वर्षात त्यांचे शेअर्स विभाजित केले आहेत. अॅमेझॉन (Amazon) आणि गुगल (Google) च्या मूळ कंपनी म्हणजे अल्फाबेटने अलीकडेच त्यांच्या आगामी शेअर विभाजनाची घोषणा केली आहे.
अधिक वाचा : PAN Card Fraud | बॉलीवूड अभिनेता राजकुमार रावला धक्का! अभिनेत्याचे पॅन कार्ड तपशील वापरून झाला फ्रॉड
टेस्ला (Tesla) आणि स्पेसएक्सचे (SpaceX)सीईओ असलेले इलॉन मस्क (Elon Musk)यांची ओळख जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अशी आहे. निदान रेकॉर्डवर किंवा अधिकृतपणे तरी इलॉन मस्कच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती (World's Richest Man) आहेत. पण खुद्द इलॉन मस्क यांच्या मते मात्र हा किताब दुसऱ्या कोणाचा तरी आहे. म्हणजेच इलॉन मस्क दुसऱ्या एका व्यक्तीला स्वतःहून श्रीमंत व्यक्ती मानतो. मस्कच्या मते, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Russian President Vladimir Putin) हेच आहेत. बिझनेस इनसाइडरला दिलेल्या मुलाखतीत मस्क यांनी ही माहिती दिली.