Healthwise Employees | कर्मचारी धडाधड देत होते राजीनामा...कंपनीने लागू केले आठवड्यातून फक्त 4 दिवस काम,झाली कमाल, तुम्हाला हवी का अशी कंपनी?

Healthwise company's Working culture : कोणतीही कंपनी मोठी करण्यासाठी तिचे कर्मचारी रात्रंदिवस मेहनत करतात. मात्र, त्याच कर्मचाऱ्यांनी अचानक राजीनामे देण्यास सुरुवात केली, तर कंपनीसमोर मोठी अडचण निर्माण होते. 2021 मध्ये हेल्थवाइस (Healthwise) या इंग्लंडमधील एका आरोग्य कंपनीत (UK health company)असेच काहीसे घडले होते. कंपनीतील अनेक कर्मचाऱ्यांनी एकाच वेळी राजीनामा दिला. यानंतर कंपनीने अशी काही पद्धत वापरून पाहिली की त्यामुळे कंपनीला खूप फायदा झाला

Healthwise company's 4 day working Policy
हेल्थवाइस कंपनीने लागू केली 4 दिवस काम करण्याची कार्यसंस्कृती 
थोडं पण कामाचं
  • कोणतीही कंपनी मोठी करण्यासाठी तिचे कर्मचारी रात्रंदिवस मेहनत करतात
  • कर्मचाऱ्यांनी अचानक राजीनामे देण्यास सुरुवात केली, तर कंपनी अडचणीत सापडते
  • इंग्लंडमधील कंपनीत असेच सुरू झाल्यावर कंपनीने जे धोरण अवलंबले त्यामुळे जादू झाली

Healthwise company's 4 day working Policy : नवी दिल्ली : कोणतीही कंपनी मोठी करण्यासाठी तिचे कर्मचारी रात्रंदिवस मेहनत करतात. मात्र, त्याच कर्मचाऱ्यांनी अचानक राजीनामे देण्यास सुरुवात केली, तर कंपनीसमोर मोठी अडचण निर्माण होते. 2021 मध्ये हेल्थवाइस (Healthwise) या इंग्लंडमधील एका आरोग्य कंपनीत (UK health company)असेच काहीसे घडले होते. कंपनीतील अनेक कर्मचाऱ्यांनी एकाच वेळी राजीनामा दिला. यानंतर कंपनीने अशी काही पद्धत वापरून पाहिली की त्यामुळे कंपनीला खूप फायदा झाला आणि कर्मचारीही कंपनी सोडून गेले नाहीत. (Employees were resigning, Healthwise company started 4 days working culture, miracle happened)

अधिक वाचा : Portable AC | उकाड्याने बेहाल झाले आहात...मग हा झकास पोर्टेबल एसी तुमच्या इच्छेप्रमाणे फिरवा घरभर...व्हा एकदम कूल

आठवड्यातून फक्त 4 दिवस काम

प्रसार माध्यमांमधून समोर आलेल्या माहितीनुसार हेल्थवाइजमधून (Healthwise) राजीनामा देणार्‍या लोकांची संख्या मोठी होती. तिथे सारखे राजीनामा सत्र सुरू होते. कंपनी सोडून जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या पाहता कंपनीला घाम फुटला. कर्मचाऱ्यांना थांबवायचे कसे यावर कंपनीने चांगलीच शक्कल लढवली. हेल्थवाइस कंपनीने आपल्या कामकाजाच्या धोरणात बदल करत कर्मचाऱ्यांसाठी चार दिवसांचा कामाचा आठवडा लागू केला. यानंतर कंपनीच्या या धोरणाने अशी काही कमाल केली की ज्याची कंपनीच्या व्यवस्थापनालादेखील अपेक्षाही नव्हती. कंपनीचे या पावलाने जादूच्या कांडीसारखे काम केले.

अधिक वाचा : ED action on Amway India | अॅम्वे इंडियावर एमएलएम घोटाळ्याचा आरोप...ईडीने जप्त केली कंपनीची तब्बल 757 कोटी रुपयांची मालमत्ता

कर्मचारी खूश, कंपनी फायद्यात 

हेल्थवाइस कंपनीने 4 दिवसांचा कामाचा आठवडा लागू केल्यानंतर तेथील कर्मचारी खूपच खूश आहेत. कंपनी सोडून गेलेले कर्मचारी पुन्हा कंपनीत आले. ज्यांनी राजीनामा दिला होता त्यांनी तो मागे घेतला. यासोबतच कंपनीचे ग्राहकही खूप समाधानी असून कंपनीच्या महसुलातही वाढ झाली आहे. अशा प्रकारे कंपनीला नवीन पॉलिसीचा तिप्पट फायदा झाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, इडाहोस्थित हेल्थवाइस कंपनीने अडचणीत आल्यावर श्रमिक अर्थशास्त्रज्ञ ज्युलिएट शोरशी (Juliet Schor) संपर्क साधला. त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये कंपनीने 4 दिवसांचा कामाचा आठवडा लागू केला. सुरुवातीला चाचणी तत्त्वावर त्याची अंमलबजावणी करण्यात आली होती. ती चांगलीच यशस्वी झाली.

अधिक वाचा : SBI update | महत्त्वाची बातमी! स्टेट बॅंकेचे होम लोन, कार लोन महागले...ईएमआय वाढणार

कर्मचाऱ्यांचा तणाव कमी करा

एका कॉन्फरन्सदरम्यान ज्युलिएट शोरने सांगितले की, या धोरणाचे चांगले परिणाम दिसून आले. कंपनीचे कर्मचारी खूप खुश झाले. कंपनीने कामकाजाचे धोरण बदलल्याने कर्मचाऱ्यांचे आयुष्य चांगले झाल्याचे त्यांनी सांगितले. फक्त चारच दिवस काम करावे लागत असल्याने कर्मचाऱ्यांचा ताण बऱ्याच अंशी कमी झाला. त्यांना आपल्या कंपनीबद्दल आणि नोकरीबद्दल वाटत असणारा आदर खूप वाढला. याचा सकारात्मक परिणाम होत कर्मचारी इतरही कामात उत्साहाने भाग घेऊ लागले. 

कर्मचाऱ्यांवरील ताण, त्याचे व्यवस्थापन, कंपनीतील कार्यसंस्कृती या सर्वांचा एकूणच कंपनीच्या कामगिरीवर मोठा परिणाम होत असतो. त्यामुळेच अलीकडे कंपन्या कर्मचाऱ्यांच्या अडचणींची, कार्यसंस्कृतीची दखल घेत त्यावर उपाययोजना करत आहेत. मात्र अजूनही अनेक कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांना सतत तणावाखाली काम करावे लागते. आनंदी कर्मचारी कंपनीला जबरदस्त नफा कमावून देतात हेच हेल्थवाइसच्या उदाहरणातून स्पष्ट होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी