EPFO News: नवी दिल्ली : खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कोट्यवधी कर्मचाऱ्यांना लवकरच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून (EPFO) भेट मिळणार आहे. प्रसार माध्यमांमधून आलेल्या माहितीनुसार, पीएफवरील कमी झालेल्या व्याजदरामुळे (PF interest rate)व्याजाचे पैसे डिसेंबरपूर्वी जमा केले जाऊ शकतात. सध्या अर्थ मंत्रालयाची मंजुरी मिळण्यास विलंब होत आहे. सध्या पीएफवर 43 वर्षांतील सर्वात कमी व्याज मिळत असल्याने लवकरच अर्थ मंत्रालयाकडून मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे. अर्थ मंत्रालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर पीएफ खातेधारकांच्या खात्यात कधीही व्याज जमा केले जाऊ शकते. (EPF account holders to get PF interest very soon, check the balance)
अधिक वाचा : CNG Price Update : सीएनजी झाला महाग, पाहा आज पेट्रोल-डिझेल स्वस्त झाले की महाग?
अहवालानुसार, सरकार पीएफ खातेधारकांना पुढील महिना संपण्यापूर्वी म्हणजेच ३० जूनपूर्वी कधीही व्याजाचे पैसे हस्तांतरित करू शकते. अशीही बातमी आहे की EPFO दसऱ्याच्या सणापूर्वी व्याजाचे पैसे जमा करू शकते. तथापि, या संदर्भात EPFO कडून कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही किंवा सरकारने अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही. साधारणपणे पीएफचे व्याज वर्षाच्या शेवटी जमा केले जाते. यावेळी कमी व्याजामुळे EPFO क्रेडिटसाठी डिसेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार नाही अशी अपेक्षा आहे, सरकार व्याजाचे पैसे आगाऊ हस्तांतरित करू शकते. याचा फायदा EPFO च्या
6.5 कोटी ईपीएफ खातेधारकांना होणार आहे.
अधिक वाचा : Gold-Silver Rate Today, 14 May 2022: धुमधडाक्यात करा लग्न, सोने झाले स्वस्त...पाहा ताजा भाव
नोकरदारांसाठी पीएफ खाते खूप महत्त्वाचे असते. दर महिन्याला त्यांच्या बॅंक खात्यातून एक हिस्सा ईपीएफच्या (EPF)रुपाने कापला जातो. निवृत्तीनंतरच्या आर्थिक गरजांसाठी आणि उतारवयातील आर्थिक स्थैर्यासाठी प्रॉव्हिडंट फंड हा खूपच महत्त्वाचा असतो. जसा कर्मचाऱ्यांच्या वेतनातून एक हिस्सा ईपीएफसाठी कापला जातो. तसाच कंपनीदेखील एक हिस्सा कर्मचाऱ्याच्या ईपीएफ खात्यात जमा करत असते. अनेक वेळा असे दिसून आले आहे की नोकरी बदलल्यानंतर दुसरे पीएफ खाते (PF Account)उघडले जाते आणि ईपीएफची रक्कम त्या नव्या खात्यात कंपनीद्वारे जमा केली जाते. अशावेळी ईपीएफ ट्रान्सफर करण्यासाठी त्रास होतो. मात्र ही बाब सोपी झाली आहे. जर तुम्ही वेगवेगळ्या पीएफ खात्यातील जमा झालेल्या रकमेला एकाच पीएफ खात्यात ट्रान्सफर करू इच्छित असाल तर ही प्रक्रिया तुम्ही घरबसल्याच ऑनलाईन पद्धतीने सहजपणे करू शकता.