EPFO | चुकूनही देऊ नका आपली महत्त्वाची माहिती...PF Account मधून गायब होतील सर्व पैसे

EPFO Alert | ईपीएफओने ट्विट करत पीएफ खातेधारकांना सावध केले आहे. ईपीएफओने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की 'ते कधीही आपल्या पीएफ खातेधारकांकडे त्यांची वैयक्तिक माहिती, आधार नंबर, पॅन नंबर, युएएन नंबर, बॅंक अकाउंट आणि ओटीपी इत्यादी माहिती कोणालाही शेअर करू नका

EPFO Alert
ईपीएफओचे अलर्ट 
थोडं पण कामाचं
  • तुमचे पीएफ खाते असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची गोष्ट आहे
  • ईपीएफओकडून आपल्या कोट्यवधी खातेधारकांना अलर्ट
  • आपली वैयक्तिक माहिती, आधार नंबर, पॅन नंबर, युएएन नंबर, बॅंक अकाउंट आणि ओटीपी कोणालाही देऊ नका

EPFO | नवी दिल्ली: जर तुम्ही नोकरदार आहात आणि तुमचे पीएफ खाते असेल तर तुम्ही ही महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. ईपीएफओने आपल्या कोट्यवधी खातेधारकांना अलर्ट दिला आहे की आपली महत्त्वाची माहिती किंवा महत्त्वाचे नंबर कोणालाही देऊ नका किंवा शेअर करू नका. जर तुम्ही चुकूनदेखील हे नंबर कोणाला दिले तर तुमच्या पीएफ खात्यातून सर्व पैसे गायब होऊ शकतात. ईपीएफओने ट्विट करत यासंदर्भातील पीएफ खातेधारकांना सजग केले आहे. (EPFO : EPFO alerts to the EPF account holders to not to share important numbers to anyone)

ईपीएफओचे ट्विट

ईपीएफओने ट्विट करत पीएफ खातेधारकांना सावध केले आहे. ईपीएफओने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की 'ते कधीही आपल्या पीएफ खातेधारकांकडे त्यांची वैयक्तिक माहिती, आधार नंबर, पॅन नंबर, युएएन नंबर, बॅंक अकाउंट आणि ओटीपी इत्यादी माहिती मागत नाहीत. जर कोणीही अशी माहिती कॉल करत किंवा सोशल मीडियावर मागितली तर तुम्ही लगेच सावध झाले पाहिजे आणि या प्रकारची कोणतीही माहिती शेअर करू नका.'

सोशल मीडिया आणि बनवाट कॉलद्वारे फ्रॉड

ईपीएफओने म्हटले आहे की अलीकडे सोशल मीडियाद्वारे ऑनलाईन फ्रॉड होण्याच्या प्रकारात मोठी वाढ झाली आहे. त्याचबरोबर फेक कॉल्सचा वापर करत अनेकांना फसवण्यात येते आहे. सोशल मीडियावर तुमचा आधार नंबर, युएएन नंबर आणि बॅंक खाते याच्याशी निगडीत कोणतीही माहिती कधीही शेअर करू नका. याशिवाय जर तुम्हाला एखादा कॉल जरी यासंदर्भात आला आणि तुमची माहिती मागितली तर अशी माहिती कधीही देऊ नका.

रिटायरमेंटची तजवीज

प्रॉव्हिडंट फंड ही निवृत्तीनंतरच्या आयुष्याची आर्थिक तजवीज असते. नोकरदार व्यक्तीला निवृत्त झाल्यानंतर आर्थिक संकटाला सामोरे जावे लागू नये यासाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. याशिवाय भविष्यातील आर्थिक गरजांसाठी हे पैसे उपयोगी पडतात. सरकार दरवर्षी ईपीएफवर निश्चित व्याज देत असते. सध्या ईपीएफओशी देशभरातून कोट्यवधी लोक जोडले गेलेले आङेत. सध्या ६ कोटींपेक्षा अधिक पीएफ खातेधारक आहेत. हे खातेधारक दरमहा आपल्या वेतनातून निश्चित रक्कम किंवा हिस्सा आपल्या पीएफ खात्यात टाकतात. यामुळे ते भविष्यात याचा आर्थिक लाभ घेऊ शकतात.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने म्हणजे ईपीएफओने (EPFO)ईपीएफ खातेधारकांना (EPF Account Holders)मोठाच दिलासा दिला आहे. ईपीएफओने नॉर्थ ईस्टमधील कंपन्या, संस्था आणि काही विशेष वर्गांच्या कंपन्या किंवा संस्थांसाठी युएएन आधारला जोडण्याची मुदत ३१ डिसेंबर २०२१ पर्यत वाढवली आहे. ईपीएफओने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. याआधी युनिव्हर्सल अकाउंट नंबरशी आधार लिंक करण्याची अंतिम मुदत १ सप्टेंबर २०२१ ही होती. जर तुम्ही युएएन आधारशी लिंक केले नाही तर तुमची कंपनी तुमच्या पीएफ खात्यात दरमहा पीएफचे योगदान जमा करू शकणार नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी