New Provident Fund rule | ईपीएफओने वाढवली ई-नॉमिनेशनसाठीची मुदत, अशी आहे प्रक्रिया...

EPFO rule for e-nomination | ईपीएफओने ई-नॉमिनेशनसाठीची (e-nomination) अंतिम मुदत आता वाढवली आहे. पीफखातेधारक (EPF account holder) आता ३१ डिसेंबरनंतरदेखील ई-नॉमिनेशनची प्रक्रिया पूर्ण करू शकणार आहेत. ईपीएफओने यासंदर्भात ट्विट करत म्हटले आहे की पीएफखातेधारक त्यांच्या पीएफ खात्यात नॉमिनीचे नाव ३१ डिसेंबरदेखील ई-नॉमिनेशन सुविधेद्वारे देऊ शकतात. याआधी ईपीएफ खातेधारकांना ३१ डिसेंबरपर्यत त्यांच्या नॉमिनीचे (Nominee)नाव देण्याची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक होते.

EPF e-nomination
ईपीएफ खातेधारकांसाठीचे ई-नॉमिनेशन 
थोडं पण कामाचं
 • ईपीएफओने ई-नॉमिनेशनसाठीची मुदत वाढवली
 • याआधी पीएफधारकांना ३१ डिसेंबरपर्यत दाखल करायचे होते ई-नॉमिनेशन
 • नॉमिनीचे नाव जोडल्यामुळे पीएफ धारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनीला सहजपणे क्लेम करता येणार

EPFO rule | नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने म्हणजे ईपीएफओने (EPFO)आपल्या खातेधारकांसाठी सूचना केली आहे. ईपीएफओने ई-नॉमिनेशनसाठीची (e-nomination) अंतिम मुदत आता वाढवली आहे. पीफखातेधारक (EPF account holder) आता ३१ डिसेंबरनंतरदेखील ई-नॉमिनेशनची प्रक्रिया पूर्ण करू शकणार आहेत. ईपीएफओने यासंदर्भात ट्विट करत म्हटले आहे की पीएफखातेधारक त्यांच्या पीएफ खात्यात नॉमिनीचे नाव ३१ डिसेंबरदेखील ई-नॉमिनेशन सुविधेद्वारे देऊ शकतात. याआधी ईपीएफ खातेधारकांना ३१ डिसेंबरपर्यत त्यांच्या नॉमिनीचे (Nominee)नाव देण्याची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक होते. (EPFO extends last date for e-nomination, see how to do it)

ई-नॉमिनेशनचे महत्त्व

याआधी असंख्य पीएफ खातेधारकांनी ईपीएफओचे पोर्टल कार्यरत नसल्याची किंवा पोर्टल डाउन असल्याची तक्रार केली होती. पीएफखातेधारकांनी त्यांच्या ईपीएफ खात्यात त्यांच्या नॉमिनीची माहिती ईपीएफओच्या पोर्टलवर जाऊन अपडेट करण्याचा प्रयत्न केल्यावर अडचणी आल्या होत्या. ईपीएफओने दिलेल्या माहितीनुसार कोणत्याही ईपीएफ खातेधारकाने आपले ई-नॉमिनेशन दाखल करणे आवश्यक आहे. यामुळे पेन्शन (एम्प्लॉयीज डिपॉझिट लिंक्ड इन्श्युरन्स स्कीम), प्रॉव्हिडंट फंड आणि विमा या सुविधांचा लाभ पीएफ खातेधारकांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांना सहजपणे मिळू शकणार आहे. पीएफखातेधारकाच्या नॉमिनीला यामुळे ऑनलाइन क्लेम दाखल करणे सोपे होणार आहे.

ईपीएफओची ऑनलाइन नॉमिनेशन सेवा वापरण्यासाठी पीएफखातेधारकांना त्यांचा युएएन म्हणजे युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN)आणि त्यांच्या ईपीएफ खात्याशी जोडलेला त्यांचा आधार क्रमांक या बाबी आवश्यक आहेत.

ऑनलाइन पद्धतीने पीएफखातेधारक नॉमिनीचे नाव पुढील प्रकारे दाखल करू शकतात.

 1. - ईपीएफओच्या वेबसाइटवर जा.
 2. - सर्व्हिसेसवर क्लिक करा-त्यानंतर एम्प्लॉयीजवर क्लिक करा- त्यानंतर मेंबर युएन/ऑनलाइन सर्विसेसवर क्लिक करा.
 3. - त्यानंतर युएएन आणि पासवर्डचा वापर करून लॉगिन करा.
 4. - मॅनेज टॅबवर ई-नॉमिनेशनवर क्लिक करा
 5. - त्यानंतर स्क्रीनवर येणाऱ्या प्रोव्हाइड डिटेल्सवर किल्क करा.
 6. - सेव्हवर क्लिक करा, त्यानंतर येस टॅबवर क्लिक करा आणि फॅमिली डिक्लेरेशन अपडेट करा.
 7. - अॅड फॅमिली डिटेल्सवर क्लिक करा, त्यानंतर तुम्ही एकापेक्षा जास्त नॉमिनीला अॅड करू शकता.
 8. - ई-साइन वर क्लिक करा आणि त्यानंतर ओटीपी येईल.
 9. -तुमच्या आधारशी लिंक असलेल्या मोबाइल नंबरवर आलेला ओटीपी सब्मिट करा.

पीएफ खाते अपडेट कसे कराल

कर्मचारी किंवा नोकरदारांचे आधार कार्ड पीएफ खात्याशी किंवा युएएनशी लिंक करण्याची जबाबदारी तो नोकरी करत असलेल्या कंपनी किंवा आस्थापनाची असते. ईपीएफओने यासंदर्भात अनेक सूचना दिल्या आहेत. आधार लिंक नसल्यास कर्मचाऱ्याला पीएफ खात्यात तीच रक्कम दिसेल जी त्याच्या वेतन आणि महागाई भत्त्याद्वारे येते.

आधार लिकिंग-

 1. पीएफ खाते किंवा युएएन आधार कार्डशी जोडण्यासाठी epfindia.gov.in या वेबसाईटवर जा.
 2. त्यानंतर ऑनलाईन सर्व्हिसेसमध्ये ई-केवायसी पोर्टलवर क्लिक करा
 3. आता आधार नंबर नोंदवा. त्यानंतर मोबाईल नंबर द्या. तुमच्या मोबाईलवर ओटीपी येईल.
 4. पुन्हा एकदा आधार नंबर भरावा लागेल. आता ओटीपी व्हेरिफिकेशन दिसेल, त्यावर क्लिक करा.
 5. तीन वेळा ओटीपी, आधार नंबर आणि मोबाईल नंबर नोंदवल्यानंतंर तुमच्या पीएफ खात्याशी तुमचा आधार नंबर लिंक होईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी