EPFO Update : पीएफ खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी! ईपीएफओचा अलर्ट पाहा...नाहीतर होईल मोठे नुकसान

EPFO Latest : ईपीएफओने नुकताच आपल्या खातेधारकांसाठी एक अलर्ट जारी केला आहे. ईपीएफओने आपल्या सर्व सदस्यांना सावध करताना म्हटले आहे की, कोणत्याही खातेधारकाने चुकूनही ईपीएफ खात्याशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करू नये. ईपीएफओ कधीही आपल्या सदस्यांकडून म्हणजे ईपीएफ खातेधारकांकडून आधार, पॅन, यूएएन, बँक तपशीलांची माहिती विचारत नाही.

EPFO update
ईपीएफओ ताजी बातमी 
थोडं पण कामाचं
  • पीफ खातेधारकांसाठी महत्त्वाचे अलर्ट
  • ईपीएफओने केले सावध
  • तुमचे ईपीएफ खाते होऊ शकते रिकामे

EPFO Alert : नवी दिल्ली : नोकरदारांसाठी ईपीएफ खाते (EPF Account) खूप महत्त्वाचे असते. त्यामुळेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे ईपीएफओने (EPFO)आपल्या सर्व खातेधारकांसाठी जारी केलेली सर्व माहिती नोकरदारांसाठी महत्त्वाची असते. ईपीएफओने नुकताच आपल्या खातेधारकांसाठी एक अलर्ट जारी केला आहे. ईपीएफओने आपल्या सर्व सदस्यांना सावध करताना म्हटले आहे की, कोणत्याही खातेधारकाने चुकूनही ईपीएफ खात्याशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करू नये. यामुळे पीएफ खातेदार मोठ्या फसवणुकीला (Online Fraud) बळी पडू शकतात. तुमच्या ईपीएफ खात्याची माहिती जर फसवणूक करणाऱ्यांच्या हाती लागली तर ते तुमच्या ईपीएफ खात्यातून पैसे उडवू शकतात. त्यामुळे तुमच्या ईपीएफ खात्यासंदर्भात तुम्ही सतर्क राहणे आवश्यक आहे. (EPFO issues alert to EPF account holders  regarding online fraud)

अधिक वाचा : या कारणांमुळे Love मॅरेज यशस्वी होतात

ईपीएफओचा इशारा

आपल्या खातेधारकांना सावध करताना ईपीएफओने म्हटले आहे की, ईपीएफओ कधीही आपल्या सदस्यांकडून म्हणजे ईपीएफ खातेधारकांकडून आधार, पॅन, यूएएन, बँक तपशीलांची माहिती विचारत नाही. त्यामुळेच जर कोणी फोन किंवा सोशल मीडियावर अशी माहिती तुमच्याकडे मागितली तर काळजी घ्या आणि ही माहिती अजिबात देऊ नका. अशा फसव्या फोन कॉलला प्रतिसाद देऊ नका किंवा अशा कोणत्याही संदेशांना उत्तर देऊ नका.

अधिक वाचा : दारू प्यायल्यावर कोणत्या राशीची व्यक्ती कशी वागते?

ईपीएफओने दिली माहिती 

ईपीएफओने सर्व खातेधारकांना एक अलर्ट जारी करताना एक ट्विट केले आहे. त्यात ईपीएफओने म्हटले आहे की , 'आपल्या सदस्यांना कधीही फोन किंवा सोशल मीडियावर आधार, पॅन, युएएन, बँक खाते किंवा ओटीपी सारखी वैयक्तिक माहिती देऊ नका. ईपीएफओने पुढे सांगितले आहे की, ईपीएफओ कधीही कोणत्याही सेवेसाठी व्हॉट्सअॅप, सोशल मीडिया इत्यादीद्वारे कोणतीही रक्कम जमा करण्यास सांगत नाही.

ऑनलाइन फसवणूक

अलीकडच्या काळात ऑनलाइन फसवणूक किंवा फिशिंगच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. ईपीएफ खाते नोकरदारांसाठी निवृत्तीनंतरचे आयुष्य जगण्यासाठी खूप महत्त्वाचे असते. पीएफ खात्यात दर महिन्याला जी रक्कम जमा होते ती लोक सेवानिवृत्तीच्या खर्चासाठी जमा करतात. फसवणूक करणाऱ्यांना हे चांगलेच ठाऊक आहे की येथे त्यांना एका झटक्यात मोठी रक्कम मिळेल. त्यामुळेच ते ईपीएफ खात्यांना टार्गेट करतात. फिशिंग हा ऑनलाइन फसवणुकीचा एक भाग आहे ज्यामध्ये ठेवीदारांना फसवले जाते. असे करताना खातेधारकांकडून त्यांच्या खात्याशी संबंधित आवश्यक माहिती मिळवली जाते आणि नंतर खाते साफ केले जाते.

अधिक वाचा : Shocking CCTV: हॉर्न वाजवल्याचा राग; कार चालकांकडून बाईकस्वाराला बेदम मारहाण, घटनेचा VIDEO आला समोर

माहिती कोणालाही देऊ नका

तुमच्या पीएफ खात्याशी निगडीत पॅन क्रमांक, आधार क्रमांक, यूएएन आणि तुमचा पीएफ खाते क्रमांक कोणालाही शेअर करू नका. ईपीएफओदेखील ही माहिती मागत नाही. नाहीत. असे केल्याने तुमचे पीएफ खाते रिकामे होऊ शकते. एखादे काम सोडून इतरत्र जॉइन झालेल्या लोकांमध्ये अशी फसवणूक अनेकदा दिसून येते. अशा परिस्थितीत, या लोकांनी कोणत्याही फिशिंग कॉल किंवा संदेशाविरुद्ध पोलिसांकडे तक्रार नोंदवणे आवश्यक आहे, ज्यामध्ये तुमचे वैयक्तिक तपशील मागवले जात आहेत. तुमच्या पीएफ खात्याबाबत सावध राहा कारण ही रक्कम तुमच्या निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी खूप महत्त्वाची असते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी