EPFO Pension : नवी दिल्ली : ईपीएफओच्या पेन्शनधारकांना (EPFO pensioners)मोठा दिलासा मिळणार आहे. याआधी पेन्शनधारक पेन्शनची (Pension)तारीख निश्चित नसल्यामुळे पेन्शन कधी मिळणार याबद्दल वाट पाहायचे. मात्र आता पेन्शनधारकांना एका निश्चित तारखेला पेन्शन मिळणार आहे. दर महिन्याच्या कामकाजाच्या शेवटच्या दिवशी पेन्शन जमा केली जाणार आहे. जानेवारी महिन्यापासूनच हा लाभ पेन्शनधारकांना मिळणार आहे. ईपीएफओने (EPFO)नोटिफिकेशन काढून यासंदर्भातील माहिती दिली आहे. (EPFO pensioners will get pension on a fixed date of every month)
ईपीएफओने दिलेल्या माहितीत म्हटले आहे की आरबीआयच्या सूचनांनुसार सर्व क्षेत्रीय अधिकारी बॅंकांना दरमहा बीआरएस पाठवू शकतात, असा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर पेन्शनधारकांच्या खात्यात पैसे वेळेवर जमा झाले की नाही याचीही अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे. पेन्शनर्सना दरमहिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी किंवा त्याआधीच पेन्शन दिले जावे अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
नोकरी करणाऱ्यांचा दरमहा पीएफ कापला जात असतो. त्याचबरोबर त्यातील काही ठराविक रक्कम ही पेन्शनकडेही वळती केली जात असते. कर्मचाऱ्याला पेन्शनचा लाभ मिळण्यासाठी त्याचे पीएफ खाते १० वर्षे सुरू असले पाहिजे. यानंतर जेव्हा तो कर्मचारी निवृत्त होतो म्हणजे जेव्हा त्याच्या वयाची ५८ वर्षे पूर्ण होतात, तेव्हा त्याला जमा झालेल्या रकमेनुसार पेन्शन लागू होते. शिवाय त्याच्या मृत्यू पश्चात त्याच्या कुटुंबियांना पेन्शनचा लाभ मिळतो.
जर तुमच्यावर एखादी वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती किंवा मेडिकल इमर्जन्सी (Medical emergency)आली असेल आणि तुमचे पीएफ खाते (PF Account holder) असेल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. पीएफ खातेधारकांसाठी एका नवीन सुविधेला लागू करण्यात आले आहे. या सुविधेनुसार मेडिकल इमर्जन्सी असेल तर पीएफ खात्यातून म्हणजे प्रॉव्हिडंट फंडातून (Provident Fund) १ लाख रुपये काढता येऊ (Withdrawal of Rs 1 Lkh in Medical emergency from EPFO) शकतात. कोरोनासारख्या महामारीला (Corona Pandemic) लक्षात घेऊन ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शिवाय पीएफ खातेधारकाला यासाठी वैद्यकीय खर्चाची सर्व माहिती देण्याची आवश्यकता नाही. ही ईपीएफओमध्ये (EPFO) खाते असणाऱ्यांसाठीची सामाजिक सुरक्षा योजना आहे.
यासंदर्भातील सर्क्युलर १ जून २०२१ला कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनेकडून म्हणजेच ईपीएफओकडून जाहीर करण्यात आले होते. याशिवाय यात म्हटले आहे की कोरोना महामारीसोबत इतर कोणत्याही घातक आजारामुळे अचानक हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यास १ लाख रुपयांची मदत घेतली जाऊ शकते, किवा १ लाख रुपये तात्काळ पीएफ खात्यातून काढता येऊ शकतात. याआधीदेखील वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीसाठी पैसे काढण्याची सुविधा ईपीएफओने उपलब्ध करून दिली होती. मात्र यासाठी पीएफ खातेधारकाला वैद्यकीय खर्चाचा अंदाज आणि माहिती देणे गरजेचे होते किंवा मेडिकल बिलाच्या रकमेएवढीच रक्कम काढता येत होती.