PF Interest Update: ईपीएफओने जमा केली पीएफवरील व्याजाची रक्कम...पाहा तुमच्या खात्यात आली की नाही, लगेच अशी करा चेक

EPF Account : पीएफवर दरवर्षी मिळणाऱ्या व्याजावर (PF Interest amount) सर्वांचे लक्ष असते. आता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे ईपीएफओने (EPFO) आपल्या ग्राहकांना पीएफवर व्याज देणे सुरू केले आहे. यामुळे लाखो नोकरदारांना दिलासा मिळणार आहे. ईपीएफओने व्याजाची रक्कम जमा केल्यामुळे कर्मचारी लवकरच 2021-22 या आर्थिक वर्षातील व्याजाची जमा झालेली रक्कम त्यांच्या पीएफ पासबुकमध्ये पाहू शकतील.

PF Balance
पीएफवरील व्याजाची रक्कम 
थोडं पण कामाचं
  • ईपीएफओने जमा केले पीएफचे व्याज
  • दिवाळीपूर्वीपासून कर्मचारी पाहत होते वाट
  • पीेएफ बॅलन्स चेक करण्याची पद्धत

EPFO Latest News : नवी दिल्ली : नोकरदारांसाठी पीएफ खाते (PF Account) फार महत्त्वाचे असते. निवृत्तीनंतरच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी पीएफची रक्कम खूप उपयोगी ठरते. त्यामुळे पीएफवर दरवर्षी मिळणाऱ्या व्याजावर (PF Interest amount) सर्वांचे लक्ष असते. आता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे ईपीएफओने (EPFO) आपल्या ग्राहकांना पीएफवर व्याज देणे सुरू केले आहे. यामुळे लाखो नोकरदारांना दिलासा मिळणार आहे. पीएफ खातेधारकांच्या खात्यात दिवाळीपूर्वीच ईपीएफओ आपल्या ग्राहकांच्या खात्यात व्याजाचे पैसे भरण्यास सुरुवात करेल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र बहुतांश लोकांना त्यांच्या खात्यात व्याजाचे पैसे मिळाले नाहीत. आता मात्र विलंबाने का होईना कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी (EPF) खात्यात पैसे येऊ लागले आहेत. (EPFO releases interest on PF, see how to check PF balance)

अधिक वाचा - Math Teacher Dance Video: बाईंचा डान्स पाहून गुरुजींना घालता येईना आवर, ठुमके पाहून फुटेल हसू

ईपीएफओने व्याजाची रक्कम जमा केल्यामुळे कर्मचारी लवकरच  2021-22 या आर्थिक वर्षातील व्याजाची जमा झालेली रक्कम त्यांच्या पीएफ पासबुकमध्ये पाहू शकतील. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने पासबुक अपडेट करण्यास सुरुवात केली आहे.

ईपीएफओचा व्याजदर 

अर्थ मंत्रालयाने मार्चमध्ये पीएफवर 8.1 टक्के व्याजदर जाहीर केला होता. हा व्याजदर चार दशकांतील सर्वात कमी व्याजदर आहे. पीएफवरील व्याजदर दरवर्षी केंद्र सरकारकडून जाहीर केला जातो. आता अर्थ मंत्रालयानेदेखील पीएफवरील व्याज जमा केली जात असल्याची खातरजमा केली आहे. कामगार मंत्रालय आणि ईपीएफओ​​ने कर्मचाऱ्यांच्या  पीएफ खात्यात व्याज जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे.

अधिक वाचा - Police saved life: चालत्या ट्रेनमधून पडला मुलगा, पोलिसाने वाचवलं मृत्यूच्या दाढेतून, पाहा VIDEO

पीएफवरील व्याजास उशीर का?

मागील काही दिवसांपासून पीएफवरील व्याजाची वाट पाहिली जात होती. दिवाळीपूर्वीच ही व्याजाची रक्कम पीएफ खात्यात जमा केली जाईल अशी अपेक्षा होती. मात्र व्याज जमा करण्यास विलंब होत होता. या विलंबाने पीएफ खातेधारकदेखील चिंतेत होते. सोशल मीडियामधूनदेखील याच्यावर चिंता व्यक्त केली जात होती. यंदा व्याजदर जमा होईल की नाही, याबाबत शंका उपस्थित केली जात होती. अर्थात अर्थ मंत्रालयाने 5 ऑक्टोबर रोजी स्पष्ट केले होते की कोणत्याही ग्राहकाला व्याजाचे नुकसान होणार नाही आणि प्रत्येकाला पैसे दिले जातील. यासंदर्भात स्पष्टीकरण देताना अर्थ मंत्रालयाने सांगितले की, सॉफ्टवेअर अपग्रेडमुळे ईपीएफ पासबुकमध्ये व्याजाचे पैसे दिसत नाहीत. 

अधिक वाचा - Diabetes Control : ही 5 हिरवी पाने मधुमेहाच्या रुग्णांसाठी आहेत वरदान...पाहा जबरदस्त फायदे

पीएफ खात्यातील रक्कम कशी तपासाल? 

ईपीएफओ सदस्य अधिकृत पोर्टलवर तुम्ही ऑनलाइन स्वरुपात पीएफ खात्यातील रक्कम तपासू शकता. या खात्यात शिल्लक रकमेव्यतिरिक्त तुम्ही 2021-22 या आर्थिक वर्षाच्या व्याज ठेवी देखील पाहू शकता.

https://passbook.epfindia.gov.in/MemberPassBook/Login पोर्टलवर लॉग इन करा.
पोर्टलवर लॉग इन करण्यासाठी तुमचा UAN (तुमच्या खात्याला दिलेला युनिव्हर्सल अकाउंट नंबर) आणि पासवर्ड वापरा.
जर तुम्ही पोर्टलवर तुमचा UAN नोंदणीकृत किंवा सक्रिय केला नसेल, तर आधी तो सक्रिय करा.
EPFO तुम्हाला एसएमएसद्वारे तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर दरमहा जमा करावयाचे योगदान क्रेडिट सांगते. त्यात यूएन क्रमांकाचा उल्लेख आहे. तुमच्या सॅलरी स्लिपवर UN नंबर देखील नमूद केलेला असतो.
तुम्ही तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून 'EPFOHO (your) UAN' टाइप करून 7738299899 वर टेक्स्ट मेसेज पाठवून तुमची PF शिल्लक तपासू शकता. या मेसेजमध्ये एकूण रक्कम नमूद असली तरी नेमके किती व्याज जमा झाले हे कळणार नाही. 
तुमची शिल्लक जाणून घेण्यासाठी तुम्ही 011-22901406 किंवा 9966044425 वर मिस्ड कॉल देखील देऊ शकता. मात्र यातूनही तुम्हाला व्याज जमा झाले की नाही याची माहिती मिळू शकणार नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी