EPFO Alert : तुमच्या पीएफ खात्यात लवकरच येणार पैसे...मात्र ई-नॉमिनेशनशिवाय मिळणार नाहीत अनेक फायदे! जाणून घ्या नवीन नियम

EPF Account : तुम्हीही पगारदार वर्गात येत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. खरं तर, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) लवकरच 2021-2022 या आर्थिक वर्षाचे व्याज त्यांच्या 7 कोटी सदस्यांच्या खात्यात जमा करणार आहे. अर्थात यावेळी ईपीएफओ ​​8.1 टक्के दराने व्याज देणार आहे. सूत्रांकडून समोर आलेल्या माहितीनुसार, ईपीएफओ​​ने 2021-2022 या आर्थिक वर्षासाठीच्या पीएफ खात्यावर मिळणाऱ्या व्याजाचे (PF interest amount) कॅल्क्युलेशन केले आहे. मात्र त्याआधी तुम्ही एक गोष्ट करणे आवश्यक आहे.

e-nomination for PF account
पीएफ खात्यासाठी ई-नॉमिनेशन आवश्यक 
थोडं पण कामाचं
  • नोकरदारांच्या पीएफ खात्यात लवकरच व्याज जमा होणार
  • पीएफ खात्यात व्याज जमा होण्यासाठी ई-नॉमिनेशन करणे आवश्यक
  • ईपीएफओचे नियम जाणून घ्या

EPFO Latest News: नवी दिल्ली : तुम्हीही पगारदार वर्गात येत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. खरं तर, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) लवकरच 2021-2022 या आर्थिक वर्षाचे व्याज त्यांच्या 7 कोटी सदस्यांच्या खात्यात जमा करणार आहे. अर्थात यावेळी ईपीएफओ ​​8.1 टक्के दराने व्याज देणार आहे. सूत्रांकडून समोर आलेल्या माहितीनुसार, ईपीएफओ​​ने 2021-2022 या आर्थिक वर्षासाठीच्या पीएफ खात्यावर मिळणाऱ्या व्याजाचे (PF interest amount) कॅल्क्युलेशन केले आहे. मात्र तुमच्या पीएफ खात्यात (EPF Account) व्याज जमा होण्यासाठी तुम्ही एक महत्त्वाची बाब लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. यासंदर्भात तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. (EPFO to credit interest amount in PF accounts but e-nomination is mandatory to get the benefits, check the rule)

अधिक वाचा : Gold-Silver Rate Today, 13 June 2022: सोन्याच्या चकाकीला अमेरिकन वेसण, चांदीदेखील घसरली, पाहा ताजा भाव

ईपीएफओचा नियम

तुम्ही हे लक्षात घेतले पाहिजे की कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने म्हणजे ईपीएफओने (EPFO)आपल्या सदस्यांसाठी ई-नॉमिनेशन (epfo e-nomination)अनिवार्य केले आहे. तुम्ही असे न केल्यास तुमच्या पीएफ खात्यातील शिल्लक तपासता येणार नाही. पीएफ खाते नोकरदारांसाठी अत्यंत महत्त्वाचे असते कारण यामुळे खातेदाराच्या कुटुंबाला सामाजिक सुरक्षा मिळते. याबाबत ईपीएफओ सातत्याने अलर्ट जारी करत आहे.

ई-नामांकन आहे अनिवार्य 

ईपीएफओ आपल्या सदस्यांना नॉमिनीची माहिती देण्यासाठी ई-नॉमिनेशनची सुविधा देते आहे. त्यानंतर नॉमिनीचे नाव, जन्मतारीख यासारखी ऑनलाइन माहिती अपडेट केली जाईल. ईपीएफओने आपल्या सदस्यांना सांगितले आहे की ईपीएफ खातेधारकाने ई-नॉमिनेशन (ईपीएफ/ईपीएस नॉमिनेशन) करावे. असे केल्याने, खातेदाराचा मृत्यू झाल्यास पीएफ, पेन्शन (ईपीएस) आणि विमा (ईडीएलआय) शी संबंधित पैसे काढण्यास नॉमिनी/कुटुंबातील सदस्यांना मदत होते. यासह, नामनिर्देशित व्यक्ती सहजपणे ऑनलाइन दावा करू शकतो.

अधिक वाचा : Post Office Schemes : सुरक्षित आणि तरीही चांगला परतावा देणारा गुंतवणूक पर्याय हवांय? मग या आहेत पोस्ट ऑफिसच्या जबरदस्त योजना...

मिळते 7 लाख रुपयांची सुविधा 

ईपीएफओ सदस्यांना एम्प्लॉई डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स स्कीम (EDLI Insurance Cover)अंतर्गत विमा संरक्षणाची सुविधा देखील मिळते. योजनेतील नॉमिनीला कमाल 7 लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाते. नॉमिनी देण्याची प्रक्रिया पूर्ण न करता सदस्याचा मृत्यू झाल्यास दाव्याची प्रक्रिया करण्यात अडचणी येतात. चला तर मग जाणून घेऊया ऑनलाईन नामांकन कसे भरायचे.

अधिक वाचा : HDFC Bank alerts : तुमचे एचडीएफसी बँकेत खाते आहे का? तुम्हालाही असा ईमेल किंवा एसएमसएस आला आहे काय? व्हा सावध!

अशा प्रकारे तुम्ही करू शकता EPF/EPS मध्ये ई-नामांकन-

1. EPF/EPS नामांकनासाठी, प्रथम EPFO ​​च्या अधिकृत वेबसाइट https://www.epfindia.gov.in/ वर जा.
2. आता येथे सर्व्हिसेस विभागात FOR EMPLOYEES वर क्लिक करा आणि सदस्य UAN/ऑनलाइन सेवा (OCS/OTCP) वर क्लिक करा
3. आता त्या लॉगिनवर UAN आणि पासवर्डसह एक नवीन पेज उघडेल
4. Manage Tab टॅब अंतर्गत ई-नामांकन निवडा. असे केल्याने, स्क्रीनवर तपशील भरा टॅब दिसेल, त्यानंतर सेव्ह वर क्लिक करा.
5. आता फॅमिली डिक्लेरेशनसाठी होय वर क्लिक करा, त्यानंतर Add family details वर क्लिक करा (येथे तुम्ही एकापेक्षा जास्त नॉमिनी जोडू शकता.)
6. एकूण रकक्म शेअर करण्यासाठी येथे, नामांकन तपशीलावर क्लिक करा, त्यानंतर सेव्ह ईपीएफ नामांकनावर क्लिक करा.
7. आता येथे OTP जनरेट करण्यासाठी E-sign वर क्लिक करा, आता आधारशी लिंक केलेल्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर आलेला OTP टाका.
8. असे केल्याने, तुमचे ई-नामांकन EPFO ​​मध्ये नोंदणीकृत होते. यानंतर तुम्हाला कोणतेही हार्ड कॉपी डॉक्युमेंट पाठवण्याची गरज नाही.

एकापेक्षा जास्त नॉमिनी असू शकतात

तुमच्या माहितीसाठी पीएफ खातेधारक एकापेक्षा जास्त नॉमिनी देखील करू शकतात. यामध्ये किती रक्कम द्यावी लागेल त्यानुसार नामनिर्देशन तपशील द्यावा लागेल. याशिवाय, तुम्हाला हे माहित असले पाहिजे की पीएफ खातेदार केवळ त्याच्या कुटुंबातील सदस्यांना नॉमिनी म्हणून करू शकतो. कुटुंब नसेल तर दुसऱ्या व्यक्तीचे नामनिर्देशन करण्याचे स्वातंत्र्य आहे. परंतु कुटुंबातील सदस्य असल्यास आणि तो समोर आल्यास कुटुंबाबाहेरील व्यक्तीचे नामांकन रद्द केले जाते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी