EPFO Update: पीएफ खातेधारकांना मिळणार अधिक रक्कम! ईपीएफओ घेणार आहे मोठा निर्णय

EPFO equity investment : पीएफ खातेधारकांना (EPF account holder) आनंदाची मोठी बातमी मिळू शकते. ईपीएफओ बोर्डाने (EPFO) अलीकडेच 2021-22 या आर्थिक वर्षासाठी पीएफवरील व्याजदर (EPF interest rate) 8.5 टक्क्यांवरून 8.1 टक्क्यांवर आणला आहे. ज्यावर जोरदार टीका होत आहे. ईपीएफओ आता आपल्या खातेधारकांना जास्त परतावा देण्याची योजना आखते आहे. यानुसार ईपीएफओ ​​बोर्ड शेअर बाजारातील गुंतवणूक मर्यादा वाढवण्याबाबत निर्णय घेऊ शकते.

EPFO To Increase Investment In Equity
ईपीएफओ शेअर बाजारातील गुंतवणूक वाढवण्याच्या तयारीत 
थोडं पण कामाचं
  • ईपीएफओ आता आपल्या खातेधारकांना जास्त परतावा देण्याची योजना आखते आहे
  • ईपीएफओकडून शेअर बाजारात, सरकारी बॉंडमध्ये गुंतवणूक केली जाते
  • इक्विटी प्रकारातील गुंतवणुकीची ईपीएफओची सध्याची मर्यादा 15 टक्क्यांवरून 20 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव

EPFO To Increase Investment In Equity : नवी दिल्ली : पीएफ खातेधारकांना (EPF account holder) आनंदाची मोठी बातमी मिळू शकते. ईपीएफओ बोर्डाने (EPFO) अलीकडेच 2021-22 या आर्थिक वर्षासाठी पीएफवरील व्याजदर (EPF interest rate) 8.5 टक्क्यांवरून 8.1 टक्क्यांवर आणला आहे. ज्यावर जोरदार टीका होत आहे. ईपीएफओ आता आपल्या खातेधारकांना जास्त परतावा देण्याची योजना आखते आहे. यानुसार ईपीएफओ ​​बोर्ड शेअर बाजारातील गुंतवणूक मर्यादा वाढवण्याबाबत निर्णय घेऊ शकते. म्हणजेच ईपीएफओचा जो फंड शेअर बाजारात गुंतवला जातो, त्याचे प्रमाण वाढवले जाऊ शकते. त्यातून अधिक परतावा मिळत पीएफ खातेधारकांना अधिक फायदा मिळेल अशी अपेक्षा आहे. (EPFO to increase investment in share market to give more benefits to EPF account holders)

अधिक वाचा : Cryptocurrency Price : क्रिप्टोकरन्सीची चमक परतली, बिटकॉइन आणि इथेरियमच्या किंमतीत झाली वाढ

ईपीएफओ हा निर्णय घेऊ शकते

हे लक्षात घेण्यासारखे आहे की 29 आणि 30 जुलै 2022 रोजी ईपीएफओ ​​बोर्डाची बैठक होणार आहे. या बैठकीत शेअर बाजार आणि संबंधित गुंतवणूक प्रकारांमध्ये  म्हणजे इक्विटी प्रकारातील गुंतवणुकीची सध्याची मर्यादा 15 टक्क्यांवरून 20 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव मंजूर केला जाऊ शकतो. ईपीएफओ बोर्डाने हा निर्णय घेतल्यास गुंतवणुकदारांना शेअर बाजारातील गुंतवणुकीतून अधिक परतावा मिळेल.

अधिक वाचा : जगणं महागलं! दही, दूध लोणी आणू कसं घरी? गृहिणींना पडला प्रश्न, 'या' वस्तू महागणार

सरकार घोषणा करू शकते

लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात, कामगार आणि रोजगार राज्यमंत्री रामेश्वर तेली म्हणाले, "एफआयएसी, सीबीटीच्या उप-समितीने इक्विटी आणि इक्विटी संबंधित गुंतवणूक मर्यादा 5-15 टक्क्यांवरून वाढवण्याची शिफारस केली आहे. ही मर्यादा वाढवून 5-20 टक्के करण्याची शिफारस आहे." तुमच्या माहितीसाठी शेअर बाजारातील EPFO ​​च्या गुंतवणुकीची मर्यादा वाढवण्यास कामगार संघटना विरोध करत आहेत. या गुंतवणुकीवर कोणतीही सरकारी हमी नाही, त्यामुळे गुंतवणुकदारांना नुकसान सहन करावे लागू शकते, असे सरकारचे मत आहे.

अधिक वाचा : Edible Oil Price : आनंदाची बातमी! खाद्यतेलाच्या किंमतीत मोठी घसरण, 'या' कंपनीने एका झटक्यात कमी केले 30 रुपये...

इक्विटीमध्ये 20 टक्क्यांपर्यंत गुंतवणूक शक्य 

विशेष म्हणजे EPFO ​​च्या वित्त गुंतवणूक आणि लेखापरीक्षण समितीने शेअर बाजारातील गुंतवणुकीची मर्यादा 20 टक्क्यांपर्यंत वाढवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. सध्या, EPFO ​​आपल्या निधीपैकी फक्त 5 ते 15 टक्के रक्कम एक्सचेंज ट्रेडेड फंड (ETFs) द्वारे गुंतवते. वास्तविक, यावेळी EPFO ​​ला 2021-22 मध्ये इक्विटीमधील गुंतवणुकीतून 16.27 टक्के परतावा मिळाला आहे. हाच परतावा 2020-21 मध्ये 14.67 टक्के होता. EPFO ने 15 वर्षांसाठी न्यूक्लियर पॉवर बाँड्समध्ये गुंतवणूक केली आहे, ज्यावर वार्षिक 6.89 टक्के व्याज दिले जाईल. सध्या केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या रोख्यांवर 7.27 टक्के ते 7.57 टक्के व्याज उपलब्ध आहे. अर्थात, सरकारी बाँड्स ते कॉर्पोरेट बाँड्समधील गुंतवणुकीवर ईपीएफओला मिळणारा परतावा तुलनेने कमी आहे. 

ईपीएफओने पीएफ खात्यावरील व्याजदरात कपात केल्यामुळे नोकरदारांची निराशा झाली आहे. त्यामुळे पीएफ खातेधारकांना मिळणाऱ्या परताव्यात घट होणार आहे. या पार्श्वभूमीवर ईपीएफओ इक्विटीमधील गुंतवणुकीचा विचार करते आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी