प्रॉव्हिडंट फंड ऑनलाइन कसा ट्रान्सफर कराल, पाहा सोपी पद्धत

आता अगदी पीएफ खाते (EPF account) ट्रान्सफर करणेदेखील सोपे झाले आहे. फक्त ६ सहा सोप्या स्टेप्समध्ये ऑनलाइन स्वरुपात तुमचे पीएफ खाते ट्रान्सफर होऊ शकते.

Provident Fund (EPF) transfer online
पीएफ ऑनलाइन ट्रान्सफर करण्याची पद्धत 
थोडं पण कामाचं
  • ईपीएफओने देखील आपल्या बहुतांश सेवा डिजिटल स्वरुपात उपलब्ध करून दिल्या आहेत
  • ईपीएफओच्या पोर्टलवर लॉग इन करून अनेक सेवा सहजपणे उपलब्ध
  • ईपीएफओच्या पोर्टलवर लॉग इन करून सहजपणे सहा सोप्या स्टेप्समध्ये पीएफ ट्रान्सफर करता येतो

नवी दिल्ली: ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) आपल्या विविध सेवा सोप्या करण्यासाठी विविध पावले उचलली आहेत. डिजिटल सेवांना प्राधान्य देण्यात येत असल्यामुळे ईपीएफओने देखील आपल्या बहुतांश सेवा डिजिटल स्वरुपात उपलब्ध करून दिल्या आहेत. ईपीएफओच्या पोर्टलवर लॉग इन करून अनेक सेवा सहजपणे घेता येतात. आता अगदी पीएफ खाते (EPF account) ट्रान्सफर करणेदेखील सोपे झाले आहे. फक्त ६ सहा सोप्या स्टेप्समध्ये ऑनलाइन स्वरुपात तुमचे पीएफ खाते ट्रान्सफर होऊ शकते. (Transfer your Provident Fund (EPF) online, by simple 6 easy steps)

जर एखाद्या व्यक्तीने त्याची किंवा तिची नोकरी बदलली तर आपले पीएफ खाते ऑनलाइन पद्धतीने ईपीएफओच्या unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ या पोर्टलवर लॉग इन करून सहजपणे सहा सोप्या स्टेप्समध्ये ट्रान्सफर करता येणार आहे. ईपीएफओने यासंदर्भात अलीकडेच ट्विट करत ही माहिती दिली आहे. या सुविधेमुळे आता कर्मचाऱ्यांना आपले पीएफ खाते ऑनलाइन ट्रान्सफर करत सुरू ठेवता येणार आहे. 

ऑनलाइन पद्धतीने ईपीएफ खाते ट्रान्सफर करण्याची पद्धत-

ईपीएफओने ऑनलाइन पद्धतीने पीएफ खाते ट्रान्सफर करण्यासंदर्भात ट्विट करत सहा सोप्या स्टेप्स दिल्या आहेत.

  1. ईपीएफओच्या unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ या वेबसाईटवर जाऊन युएएन आणि पासवर्डद्वारे लॉग इन करा.
  2. त्यानंतर ऑनलाइन सर्व्हिस जा आणि वन मेंबर वन अकाउंटवर क्लिक करा.
  3. त्यानंतर आपल्या सध्याच्या कंपनीसाठी पर्सनल इन्फॉर्मेशन आणि पीएफ खाते व्हेरिफाय करा
  4. गेट डिटेल्सवर क्लिक करा. आधीच्या कंपनीच्या पीएफ खात्याची माहिती येईल.
  5. फॉर्म पूर्ण करण्यासाठी आधीची किंवा सध्याची कंपनी निवडा
  6. गेट ओटीपीवर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर ओटीपी येईल. ओटीपी भरून सबमिट बटणावर क्लिक करा.

जी कंपनी तुम्ही निवडली आहे तिच्याकडून अटेस्टेशन झाल्यानंतर ईपीएफओ तुमचे ईपीएफ खाते ऑनलाइन ट्रान्सफर करेल आणि तुमच्या नवीन कंपनीला तुमच्या पीएफ खात्यात पैसे जमा करता येतील.

युएएन आधारशी लिंक 

सामाजिक सुरक्षा संहितेच्या कलम १४२ अंतर्गत पीएफ खाते आधारशी लिंक करणे बंधनकारक आहे. जर तुम्ही युएएन आधारशी लिंक केले नाही तर तुमची कंपनी तुमच्या पीएफ खात्यात दरमहा पीएफचे योगदान जमा करू शकणार नाही. याशिवाय जोपर्यत आधार युएएनशी लिंक केले जात नाही तोपर्यत ईपीएफ फंडातून कर्जदेखील घेता येणार नाही. पीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी आधारशी युएएन लिंक असणेदेखील आवश्यक आहे. ऑनलाईन क्लेम करताना ई-नामांकन फाईल करताना याचा उपयोग होतो. 

पीएफ खाते अपडेट कसे कराल

कर्मचारी किंवा नोकरदारांचे आधार कार्ड पीएफ खात्याशी किंवा युएएनशी लिंक करण्याची जबाबदारी तो नोकरी करत असलेल्या कंपनी किंवा आस्थापनाची असते. ईपीएफओने यासंदर्भात अनेक सूचना दिल्या आहेत. आधार लिंक नसल्यास कर्मचाऱ्याला पीएफ खात्यात तीच रक्कम दिसेल जी त्याच्या वेतन आणि महागाई भत्त्याद्वारे येते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी