जर तुम्ही पीएफचा UAN नंबर विसरला तरी नो टेन्शन, या तीन पद्धतीने कळेल हा नंबर

काम-धंदा
Updated May 02, 2021 | 22:17 IST | टाइम्स नाऊ मराठी

तुम्ही तुमच्या पीएफ खात्याशी संबंधित अनेक कामे ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करू शकता. यासाठी एका युनिव्हर्सल अकाउंट नंबरची (UAN)आवश्यकता असते.

Know your UAN number by these easy ways
तुमचा पीएफचा युएएन नंबर कसा मिळवाल 

थोडं पण कामाचं

  • पीएफचा युएएन नंबर
  • ईपीएफओ कार्यालयाकडून मिळते माहिती
  • घरबसल्या युएएन नंबर जाणून घ्यायचे पर्याय

नवी दिल्ली : नोकरदार लोकांसाठी ईपीएफ खात्यातील गुंतवणूक किंवा प्रॉव्हिडंट फंड ही खूप महत्त्वाची बाब असते. तुमचा पगार तुमच्या हाती येण्याआधीच तुमच्या पीएफचा हिस्सा कापला जातो. तुमच्या रिटायरमेंटनंतरच्या आयुष्यासाठी हा फंड तयार होत असतो. अर्थात रिटायरमेंटआधीदेखील काही कारणांसाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता. याची प्रक्रिया आता ऑनलाईन करण्यात आली आहे. याशिवाय तुम्ही तुमच्या पीएफ खात्याशी संबंधित अनेक कामे ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करू शकता. यासाठी एका युनिव्हर्सल अकाउंट नंबरची (UAN)आवश्यकता असते.

घरबसल्या काही मिनिटांतच युएएन नंबर

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने कर्मचाऱ्यांसाठी हा युएएन नंबर इश्यू केला आहे. या नंबरद्वारे तुम्ही तुमचे पीएफ खात्यातील व्यवहार करू शकता. मात्र बऱ्याच वेळा अनेक कर्मचारी आपला युएएन नंबर विसरून जातात. त्यामुळे त्यांना अडचण होते. जर तुम्ही तुमचा युएएन नंबर विसरला असाल तर टेंशन घेण्याची आवश्यकता नाही. सहजपणे तुम्ही युएएन नंबर माहित करून घेऊ शकता. ऑनलाईन पद्धतीने तुम्ही घरबसल्या काही मिनिटांतच युएएन नंबर माहित करून घेऊ शकता.

युएएन नंबर माहित करून घेण्यासाठीचे तीन पर्याय पाहूया. या तीन पद्धतीने तुम्ही सहजपणे युएएन नंबर माहित करून घेऊ शकता. युएएन नंबर माहित करून घेण्यासाठी मोबाईल नंबर ईपीएफओसोबत रजिस्टर झालेला हवा आणि युएएन नंबरची केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली हवी.

मिस्ड कॉल देऊन होऊ शकते माहित


मिस कॉलद्वारे युएएन नंबर माहित करून घेण्यासाठी तुम्ही आपल्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून 01122901406 या नंबरवर मिस्ड कॉल द्या. काही सेंकदातच तुम्हाला ईपीएफओकडून एक मेसेज येतो. त्यात युएएन, ईपीएफ खातेधारकाच्या नावासह इतर माहिती ईपीएफओकडून तुम्हाला पाठवली जाते. या माहितीतच ईपीएफचा बॅलन्सदेखील माहित होईल.

एसएमएसद्वारे मिळू शकते माहिती


मोबाईल नंबर ईपीएफओमध्ये नोंदणी झालेला असल्यास तुम्ही एसएमएसद्वारे युएएन नंबर माहित करून घेऊ शकता. यासाठी नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून EPFOHO UAN ENG लिहून 7738299899 या नंबरवर पाठवा. या मेसेजमध्ये लिहिलेले शेवटचे तीन अक्षर भाषेसाठी आहेत. जर इतर भाषेत माहिती हवी असल्यास त्याचे पहिले तीन अक्षर लिहून हा मेसेज पाठवावा. तुम्हाला युएएन नंबरसह इतर माहिती मेसेजद्वारे पाठवली जाईल.

ऑनलाईन पद्धतीने कशी मिळवावी माहिती


यासाठी सर्वात आधी ईपीएफओच्या अधिकृत वेबसाईटवर जा. त्यानंतर वेबसाईटवर तुम्हाला नो युअर युएएन चा ऑप्शन दिसेल. यावर रिक्वेस्ट टाकून तुम्ही ओटीपीद्वारे याची माहिती मिळवू शकता. यामध्ये तुम्हाला विचारण्यात आलेली माहिती भरा आणि प्रक्रिया पूर्ण करून तुम्ही आपला युएएन नंबर माहित करून घेऊ शकता.

भविष्यातील आर्थिक गरजांसाठी आणि विशेषत: रिटायरमेंटनंतरच्या आयुष्यातील आर्थिक गरजांसाठी प्रॉव्हिडंट फंड खूप महत्त्वाचा असतो. यातून तुम्ही उतारवयातील तुमचा दैनंदिन खर्च भागवू शकता. रिटायरमेंट फंडाची तरतूद तरुण वयापासूनच करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी