Bank Account | जरी तुमच्या बॅंक खात्यात नसतील पैसे, तरी मिळतील १०,००० रुपये, पाहा कसे

Jan Dhan Yojana | जन धन योजनेअंतर्गत तुमच्या खात्यात बॅलन्स नसल्यावरदेखील तुम्हाला १०,००० रुपयांपर्यतची ओव्हरड्राफ्टची सुविधा मिळेल. ही सुविधा अल्पकालावधीच्या कर्जाप्रमाणेच आहे. आधी ही रक्कम ५,००० रुपये होती. सरकारने आता यात वाढ करून ती १०,००० रुपये केली आहे. या खात्यामध्ये ओव्हरड्राफ्टच्या सुविधेसाठी कमाल वय ६५ वर्षे आहे.

Pradhan Mantri Jan Dhan Yojana
प्रधानमंत्री जनधन योजना 
थोडं पण कामाचं
  • तुमचे बॅंक खाते जन धन खाते असल्यास तुम्हाला १०,००० रुपयांचा ओव्हरड्राफ्ट मिळतो
  • या खात्यामध्ये ओव्हरड्राफ्टच्या सुविधेसाठी कमाल वय ६५ वर्षे
  • ओव्हरड्राफ्टच्या सुविधेचा फायदा घेण्यासाठी तुमचे जन धन खाते किमान ६ महिने जुने असले पाहिजे

Jan Dhan Yojana | नवी दिल्ली : तुमचे बॅंकेत खाते आहे आणि त्यात पैसे नसतील तरी तुम्हाला १०,००० रुपये मिळू शकतात. यासाठी तुमचे बॅंक खाते जनधन खाते असले पाहिजे. जर तुम्ही प्रधानमंत्री जन धन योजनेअंतर्गत (Pradhan Mantri Jan Dhan Yojana) खाते सुरू केलेले नसेल तर आताच सुरू करा. जन धन योजनेअंतर्गत झीरो बॅलन्सवर खाते (Zero Balance Account) सुरू केले जाते. केंद्र सरकारच्या या योजनेला ७ वर्षे पूर्ण झाली आहे आणि याद्वारे आतापर्यत ४१ कोटीपेक्षा जास्त खाते सुरू करण्यात आली आहेत. या योजनेत विम्यासह अनेक प्रकारच्या सुविधा मिळतात. यामधीलच एक सुविधा ओव्हरड्राफ्टची आहे. ही सुविधा काय आहे ते पाहूया. (Even if you don't have money in bank account, you will get Rs 10,000, see details)

असे मिळतील १०,००० रुपये

जन धन योजनेअंतर्गत तुमच्या खात्यात बॅलन्स नसल्यावरदेखील तुम्हाला १०,००० रुपयांपर्यतची ओव्हरड्राफ्टची सुविधा मिळेल. ही सुविधा अल्पकालावधीच्या कर्जाप्रमाणेच आहे. आधी ही रक्कम ५,००० रुपये होती. सरकारने आता यात वाढ करून ती १०,००० रुपये केली आहे. या खात्यामध्ये ओव्हरड्राफ्टच्या सुविधेसाठी कमाल वय ६५ वर्षे आहे. ओव्हरड्राफ्टच्या सुविधेचा फायदा घेण्यासाठी तुमचे जन धन खाते किमान ६ महिने जुने असले पाहिजे. असे नसल्यास फक्त २,००० रुपयांपर्यतचा ओव्हरड्राफ्ट मिळतो.

२०१४ मध्ये सुरू झाली होती योजना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये स्वातंत्र्यदिनाला भाषण करताना जनधन योजना सुरू करण्याची घोषणा केली होती. याचवर्षी २८ ऑगस्टला या योजनेची सुरूवातदेखील झाली होती. या योजनेअंतर्गत ६ जानेवारी २०२१ पर्यत जनधन खात्यांची एकूण संख्या ४१.६ कोटी झाली आहे. सरकारने २०१८ मध्ये आणखी सुविधा आणि लाभांसह याची दुसरी आवृत्ती सुरू केली होती.

जन धन योजनेअंतर्गत मिळणाऱ्या सुविधा-

  1. जन धन योजनेअंतर्गत १० वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलाचे/मुलीचे खाते सुरू करता येते
  2. या योजनेअंतर्गत खाते सुरू केल्यावर तुम्हाला रुपे एटीएम कार्ड, २ लाख रुपयांचा अपघात विमा संरक्षण, ३०,००० रुपयांचे लाइफ कव्हर आणि जमा केलेल्या रकमेवर व्याज मिळते.
  3. या योजनेत १०,००० रुपयांच्या ओव्हरड्राफ्टची सुविधा मिळते.
  4. या योजनेत कोणत्याही बॅंकेत खाते सुरू करता येते.
  5. या खात्यात तुम्हाला मिनिमम बॅलन्स ठेवण्याची आवश्यकता नसते.
     

दरम्यान सरकारने एलपीजी सब्सिडी पुन्हा सुरू केली आहे. एलपीजी गॅसचे अनुदान आता ग्राहकांच्या थेट खात्यात जमा होणार आहे. यापूर्वीही सबसिडी (LPG Gas Sabsidy) येत असले तरी अनेक ग्राहकांच्या खात्यात अनुदान जमा होत नसल्याच्या अनेक तक्रारी सातत्याने येत होत्या. आता पुन्हा अनुदान सुरू झाल्यानंतर या तक्रारी येणे बंद झाल्या आहेत. LPG गॅस ग्राहकांना प्रति सिलिंडर 79.26 रुपये अनुदान म्हणून दिले जात आहेत. परंतु ग्राहकांना वेगवेगळी अनुदान मिळत असल्याची खात्री कंपन्यांनी केली आहे. अशा स्थितीत किती पटींनी अनुदान मिळते, असा संभ्रम लोकांमध्ये आहे. अनेकांना 79.26 रुपये अनुदान मिळत आहे, तर अनेकांना 158.52 रुपये किंवा 237.78 रुपये अनुदान मिळत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी