Jeff Bezos's Former Wife : जेफ बेझोसची माजी पत्नी मॅकेन्झी स्कॉट पुन्हा चर्चेत, आता शिक्षक पतीला देतेय घटस्फोट

Mackenzie Scott : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आणि अॅमेझॉन या ई-कॉमर्स कंपनीचे संस्थापक जेफ बेझॉस यांचा घटस्फोट चर्चेचा विषय ठरला होता. मॅकेन्झीने 2019 मध्ये जेफ बेझोसला घटस्फोट दिला होता. त्यानंतर ती तब्बल 2.9 लाख कोटी रुपयांची मालकीण झाली होती. मॅकेन्झी स्कॉटने आता दुसरे लग्न मोडण्यासाठी म्हणजे घटस्फोटासाठीचा अर्ज न्यायालयात दाखल केला आहे. यामुळे तिचे डॅन जेवेटबरोबरचे नाते संपुष्टात येणार आहे.

Mackenzie Scott Divorce
मॅकेन्झी स्कॉटचा घटस्फोट 
थोडं पण कामाचं
  • जेफ बेझॉसशी घटस्फोट झाल्यानंतर मॅकेन्झी तब्बल 2.9 लाख कोटी रुपयांची मालकीण झाली होती
  • मॅकेन्झीने 2019 मध्ये जेफ बेझोसला घटस्फोट दिला
  • मॅकेन्झी आता सध्याचा पती डॅन जेवेट याला घटस्फोट देते आहे.

Mackenzie Scott Divorce : न्यूयॉर्क : अलीकडच्या काळात काही अत्यंत महागडे घटस्फोट चर्चेचा विषय ठरले होते. त्यातीलच एक घटस्फोट होता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आणि अॅमेझॉन या ई-कॉमर्स कंपनीचे संस्थापक जेफ बेझॉस(Jeff Bezos) यांचा. जेफ बेझॉसचा त्यांची पत्नी मॅकेन्झी स्कॉटबरोबर (Mackenzie Scott) घटस्फोट झाल्यानंतर मॅकेन्झी तब्बल 2.9 लाख कोटी रुपयांची मालकीण झाली होती. कारण जेफ बेझॉसच्या संपत्तीतील काही हिस्सा तिला मिळाला होता. आता पुन्हा एकदा जेफ बेझॉस यांची माजी पत्नी मॅकेन्झी स्कॉट चर्चेत आहे. कारण मॅकेन्झीने त्यानंतर लग्न केले होते आणि त्याही पतीला आता ती घटस्फोट (Mackenzie Scott Divorce) देते आहे. मॅकेन्झीने 2019 मध्ये जेफ बेझोसला घटस्फोट दिला आणि आता तिचा सध्याचा पती डॅन जेवेट याला घटस्फोट देते आहे. डॅन जेवेट हे व्यवसायाने विज्ञान शिक्षक आहेत. मॅकेन्झीने गेल्या वर्षीच डॅन ज्युवेटशी (dan jewett)लग्न केल्याची माहिती दिली होती. मॅकेन्झी स्कॉटची गणना जगातील सर्वात श्रीमंत आणि सर्वात प्रभावशाली परोपकारी महिलांमध्ये केली जाते. तिने वॉशिंग्टनमधील किंग काउंटी सुपीरियर कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. यामुळे तिचे डॅन जेवेटबरोबरचे  नाते संपुष्टात येणार आहे. (Ex wife of Jeff Bezos is set give divorce to dan jewett)

अधिक वाचा: Free Data : 50 जीबी डेटा मोफत देणारा जबरदस्त स्वस्त प्लॅन, इतरही सुविधा

मालमत्तेची वाटणी

मॅकेन्झी स्कॉटने (Mackenzie Scott Divroce) लग्न मोडण्यासाठी म्हणजे घटस्फोटासाठीचा अर्ज न्यायालयात दाखल केला आहे. दस्तानुसार या करारामध्ये जोडप्याने रिअल इस्टेट आणि इतर वैयक्तिक मालमत्तेची विभागणी कशी केली जाईल याचा उल्लेख केला आहे. म्हणून, मॅकेन्झीच्या मते यासाठी "जोडीदाराचा पाठिंबा आवश्यक नाही." हे सर्व अर्जाच्या एका ओळीत स्पष्ट करण्यात आलेले आहे. असे म्हटले जाते की तिच्याकडे आधीपासूनच एक करार आहे.

मॅकेन्झीचे सामाजिक कार्य 

ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार मॅकेन्झी स्कॉटची (Mackenzie Scott) एकूण संपत्ती 2.3 लाख कोटी रुपये आहे. तिने सांगितले होते की ती आपली बहुतेक संपत्ती दान करेल. डॅन ज्युवेटसोबतचा फोटो शेअर करून आणि गिव्हिंग प्लेज पेजवर एक पत्र लिहून तिने ही माहिती दिली. मात्र, आता फक्त मॅकेन्झी आणि त्यांचे पत्र तिच्या सोशल मीडियावर अकाउंट दिसत आहेत. तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ज्युवेटचे नाव काढून टाकले आहे.

अधिक वाचा: WhatsApp Video Call : आता व्हिडीओ कॉलिंग आणखी होणार सोपे, WhatsApp ने आणले नवीन फीचर

98 हजार कोटींची देणगी

अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांच्या घटस्फोटाच्या वेळी मॅकेन्झीची मालमत्ता 2.9 लाख कोटी रुपये होती. बेझोसपासून घटस्फोट घेतल्यानंतर मॅकेन्झीची संपत्ती 60 हजार कोटींनी खाली आली आहे. घटस्फोटाच्या वेळी मॅकीचा अॅमेझॉनमधील वाटा 4 टक्के होता. त्यांनी 2019 मध्ये मालमत्ता दान करण्याचा पवित्रा घेतला होता. तेव्हापासून तिने सुमारे 98 हजार कोटी रुपयांची संपत्ती दान केली आहे.

अधिक वाचा: Online Shopping: बिनधास्त करा ऑनलाइन शॉपिंग, 'हे' अ‍ॅप्स देतील दुप्पट डिस्काउंट

देणगीचा हिशोब वेबसाइटवर 

मॅकेन्झीने तिच्या ब्लॉग पोस्टमध्ये मोठी रक्कम दान करण्याचा दावा केला आहे. मात्र, समोर आलेल्या माहितीनुसार ही रक्कम कोणत्या परोपकारी कामांसाठी खर्च केली जाते हे स्पष्ट झालेले नाही. मॅकेन्झीकडे स्वयंसेवी संस्थांसाठी तज्ञ आणि सल्लागारांची संपूर्ण फौज आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, मॅकेझीने उघड केले होते की त्यांची टीम एक वेबसाइट तयार करत आहे. या वेबसाइटवर तिच्या सर्व देणग्यांचा संपूर्ण हिशोब दिला जाणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी