EXCLUSIVE: पुढील वर्षी देशात 5G आणणार इंटरनेट स्पीडमध्ये क्रांती, राजन मॅथ्यू यांची मुलाखत

काम-धंदा
Updated Apr 20, 2019 | 15:43 IST | टाइम्स नाऊ हिंदी

भारतात लवकरत 5G येणार आहे. मात्र, अजूनही यूजर्सना कॉल ड्रॉप, स्लो इंटरनेट स्पीड सारख्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. वाचा सीओएआयचे महानिर्देशक राजन मॅथ्यू यांचा एक्स्क्लूझीव्ह मुलाखत...

Rajan Mathews
राजन मॅथ्यू यांची मुलाखत  |  फोटो सौजन्य: Getty Images

नवी दिल्ली: जगभरात 5G टेक्नॉलॉजीची चर्चा होत आहे. 5G ला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सतत टेस्टिंग सुरू आहे. या दरम्यान, जिथं भारतातील अनेक भागांमध्ये 4G पोहोचू शकलं नाहीय तिथं आता 5Gची चर्चा सुरू आहे. अशात भारतात 5G कधीपर्यंत लॉन्च होईल आणि यूजर्सना यासाठी किती पैसे मोजावे लागतील. याबाबत ग्राहकांपर्यंत योग्य माहिती पोहोचवण्यासाठी टाइम्स नाऊ हिंदीनं 5G, डेटा सिक्युरिटी आणि बीएसएनएल संकट अशा अनेक मुद्द्यांवर सेल्यूलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे (COAI) चे महानिर्देशक राजन एस मॅथ्यू यांच्यासोबत खास बातचित केली. जाणून घ्या या मुलाखतीबाबत...

1) भारतात 5G आणण्यासाठी कशाप्रकारे तयारी सुरू आहे?

  1. सरकारनं नुकतीच एक हायलेव्हल समिती नेमली आहे. जे भारतात 5G कसं लागू होईल, यावर लक्ष देतील. ही समिती 5G लॉन्चिंगसाठी सर्व महत्त्वाच्या पर्यायांवर काम करत आहे. ही समिती स्पेक्ट्रम, लायसंस, नेटवर्क एरियाशी निगडित अनेक विषयांवर काम करत आहे. सोबतच लायसन्सच्या क्षेत्रातही समिती महत्त्वाचं काम करत आहे. त्यामुळे जेव्हा 5G भारतात लॉन्च होईल तेव्हा सध्याच्या लायसन्स प्रक्रियेत बदल करावे लागतील. याशिवाय रेग्युलेशनच्या क्षेत्रातही काम केलं जात आहे. मुख्य गोष्ट म्हणजे स्पेक्ट्रमची किंमत, परदेशात स्पेक्ट्रमची किंमत कमी आहे मात्र भारतात असं नाही. इथे स्पेक्ट्रमची किंमत खूप जास्त आहे. या क्षेत्रात पण दूरसंचार विभाग (DoT) काम करत आहे.

2) भारतात 5G​ तंत्रज्ञान कधीपर्यंत येईल?

  1. आम्हाला आशा आहे की 2020 पर्यंत भारतात 5Gची सेवा सुरू होऊन जाईल.

3) 5G सर्व्हिस सर्वांसाठी असेल?

  1. 5G सेवा काही क्षेत्रात उपलब्ध असेल. ही 4G सारखी पॅन इंडिया लेव्हलवर नसेल. 5Gचा वापर फक्त अशाच जागी होईल, जिथं त्याची जास्त गरज असेल. आगामी 10 ते 15 वर्षांनंतर 5G हे 4G ला पूर्णपणे रिप्लेस करू शकेल.

4) याचा अर्थ 5G साठी ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागतील?

  1. 5G दोन बँडमध्ये उपलब्ध असेल. एक नॅरोबँड आणि दुसरा ब्रॉडबँड. 5Gमध्ये नेटवर्क स्लायसिंग असेल, त्यामुळं नेटवर्क आपल्या सोयीनुसार कॉन्फ्रिगेशन निवडून घेईल. म्हणजे जर कुणाला रिमोर्ट सर्जरी करायची असेल तर जास्त स्पीड हवा आणि दुसऱ्या बाजूला पाणी विभागाला फक्त पाण्याचं बील चेक करण्यासाठी वॉटर मीटर रिडिंग घ्यायचंय तशात 5Gची गरज नाही. तेव्हा त्यांना कमी स्पीड पाहिजे. दोघांसाठी स्पीड वेगवेगळी असेल आणि त्याची किंमतही वेगळी असेल.

5) गेल्या काही वर्षांमध्ये सायबर क्राईमची प्रकरणं वाढली आहेत, सरकार यावर ताबा मिळविण्यासाठी काय तयारी करत आहे?

  1. बघा, 5G ही एक इंटिग्रेटेड सिक्युरिटी सिस्टम सोबत येईल. यापूर्वी 4G बाबत काही सिक्युरिटी समस्या होती. जेव्हा 5G लॉन्च होईल, त्यापूर्वीच काही सिक्युरिटी फिचर्स नेटवर्कमध्ये उपलब्ध असतील. त्याच्या निवडीनंतर डेटा प्रोटेक्शन लॉ सरकारकडून आणला जावू शकतो. ज्यात गूगल, व्हॉट्स अॅप सारख्या कंपन्यांना ग्राहकांना त्यांचा डेटा कुठे आणि कसा वापरला जातोय, हे सांगावं लागेल. मात्र, याची १०० टक्के गॅरंटी देऊ शकत नाही. कारण सर्वात आधी ग्राहकांमध्ये जागरूक व्हायला पाहिजे. ग्राहक कंपन्यांना आपला सर्व डेटा वापरण्याचा अॅक्सेस देतात म्हणून ग्राहकांनी पहिले जागरूक होणं गरजेचं आहे.

6) बीएसएनएल बाबत अनेक प्रकारच्या गोष्टी केल्या जात आहेत, खरंच काय प्रॉब्लेम आहे?

  1. बीएसएनएल सोबत दोन समस्या आहेत. पहिली समस्या ही आहे की, सर्व दूरसंचार विभागाचे कर्मचारी आता बीएसएनएलमध्ये आले आहेत. बीएसएनएलची आर्थिक बाजू हे सांभाळू शकत नाहीय. म्हणून सरकार व्हीआरएस बाबत विचार करत आहे. तर दुसरी समस्या ही आहे की, बीएसएनएलनं स्वत: प्रायव्हेट ऑपरेटर्ससारखं स्वत:ला तयार केलेलं नाहीये. कंपनीनं आपल्या नेटवर्कला अपग्रेड केलं नाही. याचं कारण सरकारी प्रक्रिया आहे. सरकारला हे ठीक करायला हवं. बीएसएनएलसोबत पहिलेपासून असं नव्हतं. पहिले ग्राहक कंपनीवर विश्वास ठेवत होते आणि BSNLची सर्व्हिस त्यांना आवडत होती. किंमत आणि क्वॉलिटी दोन्ही बाबतीत आता बीएसएनएल प्रायव्हेट कंपन्यांसोबत स्पर्धा करू शकली नाही.

7) मात्र कॉल ड्रॉपचं काय, अनेक ग्राहकांना ही समस्या आहेच?

  1. आपण महत्त्वाचा मुद्दा उचलला. ट्रायनं भारतात कॉल ड्रॉपच्या समस्येचा सामना करण्यासाठी खूप कडक पाऊलं उचलली आहेत. अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये असं नाहीय. त्यांना इतके कडक नियम नसतात. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे सर्व कंपन्यांना आपलं स्केल साध्य करत आहेत. खरंतर समस्या ही टॉवरची आहे. वेगवेगळ्या भागात नियम वेगवेगळे आहेत. जर आपण दिल्लीतील अशा भागात आहात जिथं टॉवर लावण्याची परवानगी नाही मिळत, तिथं आपल्याला कॉल ड्रॉपची समस्या उद्भवणारच. जर आपण दुसऱ्या भागात गेलात जिथं टॉवर आहे तिथं आपल्याला ही समस्या येणार नाही. ग्राहकांची तक्रार योग्य आहे पण आपण ऍव्हरेज पाहिला तर कंपन्या आपलं टार्गेट पूर्ण करत आहे.

8) मग ते लोक कोण आहेत, जे कॉल ड्रॉपची तक्रार करत आहेत?

  1. बघा, कॉल ड्रॉपची समस्या या गोष्टीवर अवलंबून आहे की आपण कोणत्या भागात राहता. आपण आम्हाला सेल टॉवर लावण्याची परवानगी द्या, आम्ही तुमची ही समस्या दूर करू. आम्ही कोणत्या रेसिडेंशिअल भागात टॉवर लावायला गेलो तर सोसायटी त्याची परवानगी देत नाही. लोकं म्हणतात यानं कॅन्सर होतो, पण प्रत्यक्षात असं नाहीये. मात्र काही लोक असे आहेत की जे अशी समस्या निर्माण करतात. यानंतर मग आपल्याला चांगली क्वॉलिटी कशी मिळू शकणार. जर तुम्ही आम्हाला टॉवर लावू देणार नाही, तर आम्ही चांगली सुविधा कशी देऊ शकू.

9) हीच समस्या इंटरनेट स्पीडच्या बाबतीतही आहे?

  1. इथं आपल्याला एक गोष्ट समजून घ्यावी लागेल जर आपण कोणत्या राऊटरसोबत जोडले गेले आहात, तर आपल्याला चांगला स्पीड मिळेल. जेव्हा यूजर्सची संख्या वाढेल तेव्हा स्पीड कमी होणं साहाजिक आहे. व्हॉईस कॉलिंगमध्ये नेटवर्क दुसऱ्या प्रकारे काम करतं, तर डेटा यूजमध्ये त्याची काम करण्याची पद्धत बदलते. यूजर्सची संख्या वाढल्यास नेटवर्कचा एरिया कमी होतो. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण फक्त व्हॉईसचा वापर करत होतो, तेव्हा आपण किती वेळ फोनवर बोलत होतो. मात्र, डेटा वापर करण्यासाठी काही सीमा नाहीये. कोणताही यूजर अचानक एचडी व्हिडिओ स्ट्रिमिंग करायला लागला, तर त्याचा परिणाम इतर ठिकाणी पडणं साहाजिक आहे.

10) नुकतंच काही कंपन्यांनी मिनिमम रिचार्जचं ओझं ग्राहकांवर वाढवलं आहे, जेव्हा की त्यांनी आपल्या सर्व्हिसच्या सुरूवातीला लाईफ टाईम इनकमिंगची ऑफर देत ग्राहक जोडले होते?

  1. मला असं वाटतं की, जेव्हा कोणती कंपनी आपलं प्रॉडक्ट विकत असते तेव्हा सामान्यपणे काही असे नियम असतात, ज्याअंतर्गत कंपन्या काही मोठं घडल्यास या नियमांमध्ये बदल करू शकते. जर आपण नियम नीट वाचले तर आपल्याला हे सर्व कळून येईल. या कंपन्यांनी असंच केलं. कंपनीनं सिम कार्डसोबत जे लाईफ टाईम इनकमिंगचं वचन दिलं होतं ते फक्त व्हॉईससाठी होतं. मात्र, जर आपण डेटा वापरत असाल तर आपल्याला यासाठी रिचार्ज करावंच लागेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
EXCLUSIVE: पुढील वर्षी देशात 5G आणणार इंटरनेट स्पीडमध्ये क्रांती, राजन मॅथ्यू यांची मुलाखत Description: भारतात लवकरत 5G येणार आहे. मात्र, अजूनही यूजर्सना कॉल ड्रॉप, स्लो इंटरनेट स्पीड सारख्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. वाचा सीओएआयचे महानिर्देशक राजन मॅथ्यू यांचा एक्स्क्लूझीव्ह मुलाखत...
Loading...
Loading...
Loading...