SSC HSC Examination Fees : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांकडून होतेय अतिरिक्त शुल्काची वसुली?; शिक्षण विभागाने घेतली गंभीर दखल

SSC And HSC Examination Fees | अलीकडेच राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी तसेच पालकांनी अतिरिक्त शुल्क वसुलीबाबत नाराजी व्यक्त केली होती. अनेक ठिकाणी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांकडून परिक्षेसाठी अतिरिक्त शुल्क आकारले जात असल्याचे उघड झाले होते.

Extra fees charged from 10th-12th standard students? The Department of Education took serious decision on that
SSC HSC च्या विद्यार्थ्यांकडून होतेय अतिरिक्त शुल्काची वसुली?  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • राज्यातील शाळा आणि महाविद्यालयांनी शुल्काची पावती विद्यार्थ्यांंना देण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत.
  • अनेक ठिकाणी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांकडून परिक्षेसाठी अतिरिक्त शुल्क आकारले जात असल्याचे उघड झाले होते.
  • शिक्षण विभागाने ठरवून दिलेल्या फी पेक्षा जास्त फी वसुल केली जात असल्याने शिक्षण विभागाने कठोर भूमिका घेतली.

SSC And HSC Examination Fees | मुंबई : अलीकडेच राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी तसेच पालकांनी अतिरिक्त शुल्क वसुलीबाबत नाराजी व्यक्त केली होती. अनेक ठिकाणी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांकडून परिक्षेसाठी अतिरिक्त शुल्क आकारले जात असल्याचे उघड झाले होते. त्यामुळे राज्यातील बहुतांश शाळा वाढीव शुल्क आकारून कोट्यवधींचा भ्रष्टाचार करत असल्याची भीती व्यक्त होत आहे. यावर आता राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. यापुढे शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी भरलेल्या शुल्कांची पावती देणे बंधनकारक असल्याचे आदेश शिक्षण विभागाने शिक्षण संचालकांना दिले आहेत. (Extra fees charged from 10th-12th standard students? The Department of Education took serious decision on that).   

अधिक वाचा : वर्ल्डकप जिंकण्यावरून खेळाडूंना जज करू नका - शास्त्री

दरम्यान, लक्षणीय बाब म्हणजे राज्यातील शाळा आणि महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून किती परिक्षा फी घेतली पाहिजे? हे देखील शिक्षण विभागाने ठरवून दिले आहे. मात्र राज्यातील शिक्षण व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात मनमानी सुरू असल्याचा प्रकार समोर येत आहे. शिक्षण विभागाने ठरवून दिल्याप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्याकडून परिक्षा शुल्क साधारण ५०० रूपयांच्या घरात असावे. तरी देखील अनेक शाळा आणि महाविद्यालयांकडून त्याहून जास्त म्हणजे ८०० ते ९०० रूपये विद्यार्थ्यांकडून परिक्षा फी च्या नावाखाली वसूल केले जातात. याशिवाय या वाढीव शुल्काची कोणतीही पावती संबधित विद्यार्थ्यांना दिली जात नाही. त्यामुळे या वाढीव पैशाचा सरळ सरळ गैरवापर होत असल्याचा आरोप केला जात आहे. 

अधिक वाचा : किरीट सोमय्या ही भाजपची आयटम गर्ल - नवाब मलिक

या प्रकरणाला वाचा फुटली ती बदलापूरच्या अतुल चोबे यांच्या संबधित घडलेल्या घटनेमुळे. बदलापूरचे रहिवाशी असलेले चोबे यांनी शिक्षण विभागाकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या बाबतीत देखील असेच घडले होते. त्यांच्या मुलीकडून तिच्या महाविद्यालयाने परीक्षा शुल्क म्हणून ९१० रूपये घेतले होते आणि त्याची पावती देखील दिली नव्हती. त्यामुळे शिक्षण विभागाने यावर कठोर भूमिका घेत परिक्षा शुल्काची पावती देण्यात यावी, असे आदेश शिक्षण संचालकाला दिले आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तरीदेखील कोणत्या शाळा किंवा महाविद्यालयाने विद्यार्थ्यांची फसवणूक केली तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे देखील आदेश देण्यात आले आहेत. 

ज्या महाविद्यालयावर अतुल चोबे यांनी आरोप करून वाचा फोडली होती, त्या महाविद्यालयाचे प्रशासन प्रमुख राहुल साकटे यांनी मात्र चोबे यांचे आरोप खोटे असल्याचे सांगितले आहे. परिक्षा शुल्काची पावती देताना आमच्या क्लार्ककडून टायपिंगमध्ये चूक झाली असून ती आम्ही मान्य केली आहे. मात्र आम्ही नियमापेक्षा जास्त शुल्क घेत नसल्याची माहिती राहुल सकटे यांनी दिली. 

महाराष्ट्र राज्याच्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थी संख्येबाबत भाष्य केले तर, राज्यात दरवर्षी या दोन्ही वर्गात जवळपास ३१ ते ३२ लाख विद्यार्थी परिक्षेला बसतात. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांकडून किमान ४०० रूपये अतिरिक्त घेतले जातात, असे गृहीत धरले तर संपूर्ण राज्यातील दहावी-बारावीच्या परिक्षा शुल्कातील हा घोटाळा तब्बल १०० कोटींपेक्षा जास्त असल्याचे दिसून येते. तर दहावी आणि बारावीच्या परिक्षेत देखील भ्रष्टाचार होत असेल तर याबाबत अधिक चौकशी करायला हवी अशी मागणी जाणकार मंडळी करत आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी