Meta फेसबुक नाही 'मेटा', फेसबुकच्या पॅरेंट कंपनीचे नाव

फेसबुक नाही 'मेटा'. 'मेटा' हे फेसबुकच्या पॅरेंट कंपनीचे नाव म्हणून इथून पुढे वापरले जाईल, असे कंपनीचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी सांगितले.

Facebook changes parent company name to 'Meta'
फेसबुक नाही 'मेटा', फेसबुकच्या पॅरेंट कंपनीचे नाव 
थोडं पण कामाचं
  • फेसबुक नाही 'मेटा', फेसबुकच्या पॅरेंट कंपनीचे नाव
  • कॉर्पोरेट व्यवहारांच्या सोयीसाठी तसेच काही कायदेशीर प्रश्न हाताळण्यासाठी केला बदल
  • मार्क झुकेरबर्ग यांनी दिली माहिती

Facebook changes parent company name to 'Meta' नवी दिल्ली: फेसबुक नाही 'मेटा'. 'मेटा' हे फेसबुकच्या पॅरेंट कंपनीचे नाव म्हणून इथून पुढे वापरले जाईल, असे कंपनीचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी सांगितले. याआधी गूगल कंपनीने त्यांच्या पॅरेंट कंपनीचे नाव 'अल्फाबेट' असे केल्याचे ऑगस्ट २०१५ मध्ये जाहीर केले होते. कॉर्पोरेट व्यवहारांच्या सोयीसाठी तसेच काही कायदेशीर प्रश्न हाताळण्यासाठी गूगल पाठोपाठ फेसबुक कंपनीने त्यांच्या व्यवस्थापनाची नव्याने रचना केली. या प्रक्रियेचा भाग म्हणून 'मेटा' नावाने एक पॅरेंट कंपनी स्थापन केल्याचे जाहीर करण्यात आले. आता 'मेटा' कंपनीच्या अंतर्गत फेसबुक, इन्स्टाग्राम, मेसेंजर, व्हॉट्सअॅप ही उत्पादने कार्यरत राहतील.

पॅरेंट कंपनीचे नाव नवे असले तरी त्या कंपनीच्या अंतर्गत असलेल्या फेसबुक, इन्स्टाग्राम, मेसेंजर, व्हॉट्सअॅप या उत्पादनांच्या नाव, वेबसाइट, अॅप या डिजिटल स्वरुपात कोणताही बदल होणार नाही. फक्त या उत्पादनांची पॅरेंट कंपनी म्हणून आता फेसबुक कंपनीचे नाव येणार नाही, त्याऐवजी 'मेटा' हे नवे नाव जाहीर केले जाईल.

'मेटा' कंपनीचे नाव, या कंपनीचा लोगो तसेच त्याच्या कारभाराचा उद्देश याबाबत संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी सहकाऱ्यांनी सविस्तर माहिती दिली. नव्या पॅरेंट कंपनीचा निळ्या रंगाचा लोगो अनंत/अथांग हे चिन्ह दर्शवितो. याआधी पॅरेंट कंपनीचे नाव आणि मुख्य उत्पादनाचे नाव फेसबुक हे होते. फेसबुक या नावाने पॅरेंट कंपनी कार्यरत असताना निळ्या रंगाचा लाइक ही खूण दर्शविणारा लोगो हा पॅरेंट कंपनीचा लोगो म्हणून वापरात होता.

मेटा म्हणजे अशी माहिती जिच्यापर्यंत वेगवेगळ्या डिजिटल उपकरणांद्वारे पोहोचता येईल. ही माहिती किती आहे किंवा असेल याचे निश्चित प्रमाण किंवा मर्यादा अस्तित्वात नाही. या माहितीत क्षणोक्षणी भर पडत आहे आणि पडत राहील. ही भव्य संकल्पना विचारात घेऊनच पॅरेंट कंपनीचे नाव 'मेटा' असे केल्याचे मार्क झुकेरबर्ग यांनी सांगितले. नवी पॅरेंट कंपनी विविध क्षेत्रात काम करणार आहे, असे झुकेरबर्ग म्हणाला. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर थ्री डी इफेक्टद्वारे नवनव्या चमत्कृती साधणे तसेच एकाचवेळी जगातील वेगवेगळ्या ठिकाणी बसलेल्यांना एका प्रकल्पासाठी एकत्र आणणे असे अनोखे प्रयोग करणार असल्याची माहिती झुकेरबर्ग याने दिली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी