'या' कंपनीतील 12000 कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार

तब्बल 12000 कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार असल्याची माहिती समोर आली आहे. 

Representative Image
प्रातिनिधिक फोटो (Photo: iStock) 
थोडं पण कामाचं
  • तब्बल 12000 कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर संकट
  • जागतिक स्तरावर अनेक कंपन्यांत सुरू आहे नोकर कपात

Facebook employees may lose jobs: जगभरातील सर्वात मोठ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या फेसबूकच्या तब्बल 12000 कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर संकट आले आहे. रिपोर्ट्सनुसार, फेसबूकची पॅरेंट कंपनी मेटा सोशल आपल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी तब्बल 15 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याच्या तयारीत आहे. काही दिवसांपूर्वी स्नॅपचॅट, रॉबिनहूड, मायक्रोसॉफ्टसोबतच इतर कंपन्यांनी सुद्धा आपल्या कर्मचाऱ्यांची कपात केली होती. (facebook may fire 12000 employees read in marathi)

हे पण वाचा : तर चुकूनही पिऊ नका नारळ पाणी

आंतरराष्ट्रीय स्तरावर बदलेली परिस्थिती, एकूण उत्पन्न, आणि उद्दीष्ट गाठण्यात न आल्याने कंपन्यांकडून कर्मचारी कपात सुरू असल्याचं बोललं जात आहे. मेटा (Meta) कथितपणे फेसबूक (Facebook) कर्मचारी कपात करणार करु शकते. इनसायडरच्या एका रिपोर्टनुसार, वरिष्ठ अधिकारी हे कंपनीतील जे कर्मचारी चांगले प्रदर्शन करत नाहीत अशा व्यक्तींना कामावारुन काढू शकतात. पुढील काही आठवड्यांत 15 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केलं जाऊ शकतं. म्हणजेच जवळपास 12000 कर्मचाऱ्यांची नोकरी जाण्याची शक्यता आहे.

हे पण वाचा : नशीब बदलणारी तुरटी

एका कर्मचाऱ्याने इनसायडरला सांगितले की, "असे वाटते की ते पुढे जात आहेत मात्र सत्य परिस्थिती अशी आहे की, त्यांना जबरदस्तीने काढले जात आहे". फेसबूक ही सोशल नेटवर्किंगमधील दिग्गज कंपनी आहे. मात्र, या कंपनीत गेल्या अनेक महिन्यांपासून भरतीवर बंदी घालण्यात आली आहे.

मेटा शेअर्समध्ये घसरण

या वृत्तानंतर मेटाच्या शेअर्सची किंमत जवळपास 380 डॉलर्सच्या घरात पोहोचली आहे. गेल्या वर्षभरात कंपनीच्या शेअरच्या किमतीत 60 टक्क्यांनी घसरण झाली आहे. मेटाचे संस्थापक आणि सीईओ मार्क जुकरबर्ग यांनी स्पष्ट केलं आहे की, सर्व विभागातील भरती प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. तसेच लवकरच कर्मचारी कपात करण्याचाही इशारा देण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी