Twitter Blue Tick: ब्ल्यू टिकसाठी शुल्क आकारलं तरी वाढले फेक अकाउंट; ट्विटरने मागे घेतला वादाचा ठरलेला निर्णय

काम-धंदा
भरत जाधव
Updated Nov 12, 2022 | 07:36 IST

Twitter Deal: ब्लू टिकसाठी 8 डॉलरमध्ये सबस्क्रिप्शन प्रोग्राम सुरू झाल्यापासून बनावट खात्यांची संख्या झपाट्याने वाढू लागली होती, हे पाहता कंपनीने हा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

Fake accounts on the rise despite charging a fee for blue ticks
अरे देवा! ब्ल्यू टिकसाठी शुल्क आकारलं तरी वाढले फेक अकाउंट  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • नुकताच जाहीर केलेला निळ्या टिकसाठी शुल्कचा निर्णय मागे घेतला आहे.
  • हा प्रोग्राम सुरू झाल्यानंतर बनावट खात्यांची संख्या झपाट्याने वाढू लागली होती.
  • गेल्या दोन दिवसांत फेक अकाऊंटवरून आक्षेपार्ह ट्विट

Twitter $8 Subscription Plan Suspended: गेल्या काही ट्विटर नेहमी चर्चेत राहत आहे. एकही दिवस असा नाही की ट्विटरची (Twitter) काही बातमी नाही. सुरुवातीला अनेकांना धक्का देणारे निर्णय घेतल्यामुळे एलॉन मस्क (Elon Musk) आणि ट्विटर चर्चेत आले होते. आता तेच धक्का देणारे निर्णयांनी कंपनीच्या मालकांना धक्का दिला आहे. ट्विटरने नुकताच जाहीर केलेला निळ्या टिकसाठी शुल्कचा निर्णय मागे घेतला आहे. अहवालानुसार, कंपनीने या आठवड्याच्या सुरुवातीला लॉन्च केलेला ब्लू टिकसाठी 8 डॉलरमध्ये सबस्क्रिप्शन प्रोग्राम रद्द केला आहे. कंपनीच्या एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, हा प्रोग्राम सुरू झाल्यानंतर बनावट खात्यांची संख्या झपाट्याने वाढू लागली होती, हे पाहता कंपनीने हा प्रोग्राम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्याच्या ग्राहकांना ही सुविधा अजूनही असेल. (Fake accounts on the rise despite charging a fee for blue ticks, Twitter reverses controversial decision)

अधिक वाचा  : सकाळी केलेल्या हा गाईच्या पूजेने बदलते नशीब


निर्णय का बदलावा लागला

अहवालावर विश्वास ठेवला तर, ब्लू टिक सबस्क्रिप्शन प्रोग्राम सुरू होताच बनावट खात्यांचा महापूर आला होता. कंपनीनेही आक्षेप घेतला नाही, मात्र गेल्या दोन दिवसांत फेक अकाऊंटवरून असे ट्विट केले गेले, त्यामुळे कंपनीला ते बंद करावे लागले. हे बनावट अकाउंटधारकांनी गैरसमजुतीचे ट्विट करण्यास सुरुवात केली आहे. तर काहींना अपमानास्पद ट्विट देखील केले गेले आहेत. या अकाउंटमधील काही ट्विटनुसार, एका व्यक्तीने Nintendo Inc नावाच्या प्रोफाईलवर निळ्या रंगाची टिक घेतली आणि मधले बोट दाखवत मूळ कंपनी सांगणारा सुपर मारिओचा फोटो पोस्ट केला. तसेच महाकाय फार्मा कंपनी एली लिली अँड कंपनी म्हणून सत्यापित झाल्यानंतर, एका व्यक्तीने ट्विट केले की इन्सुलिन आता विनामूल्य आहे. एवढेच नाही तर एका व्यक्तीने टेस्ला इंक. बनावट खाते तयार करून या कंपनीच्या सेफ्टी रेकॉर्डची खिल्ली उडवली. 

अधिक वाचा  : खासदार गजानन किर्तीकर बाळासाहेबांच्या शिवसेनेत

कंपनी प्रसिद्धीच्या झोतात

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांनी गेल्या दिवशी ट्विटरचे अधिग्रहण केले होते. तेव्हापासून त्यांनी घेतलेले निर्णय जगभरात चर्चेचे विषय राहिले आहेत. त्यांनी पदभार स्वीकारताच, त्यांनी सर्वप्रथम ब्लू टिकला $8 वर सबस्क्रिप्शन बेस बनवण्याची घोषणा केली. यानंतर कंपनीने टाळेबंदी सुरू केली. त्यानंतर कंपनीने हाय-प्रोफाइल खात्यांसाठी "अधिकृत" बॅज सादर केला.  

ट्विटरमधील कर्मचाऱ्यांना मिळाला नारळ 

मस्क यांनी ट्विटरमधील भारतातील सर्व कर्मचारी वर्ग हटवला आहे. ही टीम ट्विटर मोमेंट्स फीचरसाठी आशय निर्मिती करायची. तसेच कम्युनिकेशन्स, ग्लोबल कंटेंट पार्टनरशिप, सेल्स आणि जाहिरात, इंजिनीअरिंग आणि प्रोडक्ट टीमलाही बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. या टीममधील 50 टक्के कर्मचार्‍यांना कंपनीतून काढण्यात आले आहे. तर कंत्राटावर असणार्‍या काही कर्मचार्‍यांना पुन्हा कामावर ठेवण्यात आले आहे. कंपनीच्या पब्लिक पॉलिसी टीममध्ये काम करणारे यश अग्रवला यांनी ट्विट करून आपल्याला कामावरून काढून टाकण्यात आल्याचे सांगितले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी