Cryptocurrency Prices | बिटकॉइन, इथर, शिबा इनू च्या किंमतीत घसरण, क्रिप्टोकरन्सीच्या गटांगळ्या सुरूच...

Cryptocurrency update : क्रिप्टोकरन्सी एका मोठ्या चढउतारातून मार्गक्रमण करत असताना, बिटकॉइनच्या किमतीने (Bitcoin price) आज 39,000 डॉलरच्या खाली व्यापार करून घसरणारा ट्रेंड सुरू ठेवला आहे. नोव्हेंबरमध्ये शिखर गाठल्यापासून बाजार मूल्यानुसार सर्वात मोठी डिजिटल करन्सी असलेल्या बिटकॉइनचे मूल्य सुमारे 40% कमी झाले आहे. घसरत जाणारा ट्रेंड सुरू ठेवत, बिटकॉइनची किंमत आज 9.4 टक्क्यांनी घसरत 36,436.88 डॉलरवर आली आहे. बिटकॉइन अलीकडे काहीसे स्थिरावले असले तरी या वर्षाच्या सुरुवातीपासून यामध्ये 14% पेक्षा जास

Cryptocurrency Prices
क्रिप्टोकरन्सीची दुनिया 
थोडं पण कामाचं
  • बिटकॉइन, इथरसह क्रिप्टोकरन्सीमध्ये घसरण सुरूच
  • बिटकॉइनची किंमत ३९,००० डॉलरच्या खाली
  • उच्चांकीपेक्षा बिटकॉइनचे मूल्य सुमारे 40% कमी झाले

Bitcoin Price update : नवी दिल्ली : क्रिप्टोकरन्सीची (Crytocurrency) दुनिया गुंतवणुकदारांना गोंधळात टाकते आहे. यात अनपेक्षितरित्या झपाट्याने ट्रेंड बदलताना दिसत आहेत. क्रिप्टोकरन्सी एका मोठ्या चढउतारातून मार्गक्रमण करत असताना, बिटकॉइनच्या किमतीने (Bitcoin price) आज 39,000 डॉलरच्या खाली व्यापार करून घसरणारा ट्रेंड सुरू ठेवला आहे. नोव्हेंबरमध्ये शिखर गाठल्यापासून बाजार मूल्यानुसार सर्वात मोठी डिजिटल करन्सी असलेल्या बिटकॉइनचे मूल्य सुमारे 40% कमी झाले आहे. घसरत जाणारा ट्रेंड सुरू ठेवत, बिटकॉइनची किंमत आज 9.4 टक्क्यांनी घसरत 36,436.88 डॉलरवर आली आहे. बिटकॉइन अलीकडे काहीसे स्थिरावले असले तरी या वर्षाच्या सुरुवातीपासून यामध्ये 14% पेक्षा जास्त घसरण होत त्याचे मूल्य आपल्या उच्चांकीपेक्षा खूपच खाली आले आहे. याआधी बिटकॉइनची किंमत यावर्षी विक्रमी ६९,००० डॉलरच्या पातळीवर पोचली होती. यावर्षी आतापर्यत बिटकॉइनच्या किंमतीत ९९ टक्क्यांपेक्षा जास्त तेजी दिसून आली होती. (Fall in Bitcoin, Ether, Shiba Inu prices)

इतर क्रिप्टोकरन्सीमध्येही घसरण

इतर डिजिटल चलने, इथर आणि मेम नाणी सारखीच कमी होत आहेत. इथरियम 2,593.50 डॉलरवर 12.1 टक्क्यांनी खाली आला. Binance Coin 386.64 डॉलरवर ट्रेडिंग करत होते जे 9.9% डायव्ह आहे, ते Cardano 1.14 डॉलरवर 8.6% घसरले.  सोलाना 111.59 डॉलरवर 12.4% घसरले, तर Dogecoin 0.143498 डॉलरवर 7% घसरले. शिबा इनूची 0.00002218 डॉलरवर 15.6% मोठी घसरण झाली.

बिटकॉइनची बाजारातील मूल्यात मोठी घट

दरम्यान,नोव्हेंबरपासून बिटकॉइनच्या घसरणीने त्याचे बाजारातील 600 डॉलरअब्जाहून अधिक मूल्य नष्ट झाले आहे आणि एकूण क्रिप्टो बाजारातून 1 ट्रिलियन डॉलरपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. बिटकॉइन आणि एकूण बाजार या दोन्हीसाठी टक्केवारीत बरीच मोठी घट झाली असली तरी, बेस्पोक इन्व्हेस्टमेंट ग्रुपच्या म्हणण्यानुसार, या दोघांसाठी डॉलरच्या बाबतीत ही दुसरी सर्वात मोठी घसरण आहे.

क्रिप्टोकरन्सीमधील चढउतारांकडे बोट दाखवत तज्ज्ञांनी म्हटले आहे की क्रिप्टोकरन्सी किती जोखमीची आहे आणि यात किती अनपेक्षित गोष्टी घडू शकतात याची सध्याच्या स्थितीवरून कल्पना येते. फेडरल रिझव्‍‌र्हच्या धोरणानंतर डिजिटल-अॅसेट स्पेसमध्ये क्रिप्टोकरन्सी आणि स्टॉक दोघांच्या बाबतीत एक दमदार थीम उदयास आली आहे. क्रिप्टोकरन्सीने एक वळण घेतले आहे तसेच वळण शेअर बाजारानेदेखील घेतले आहे.

क्रिप्टोकरन्सीचे नियमन

मागील काही वर्षांपासून क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) आणि डिजिटल करन्सी (Digital Currency) हा जगभरच चर्चेचा विषय झाला आहे. अनेक देश यावर काम करत आहेत. भारताच्या क्रिप्टोकरन्सीवर रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया (RBI)दीर्घ काळापासून काम करते आहे. जगभरातील अनेक देशांच्या सेंट्रल बॅंका या दिशेने काम करत आहेत. चीन, युरोप आणि इंग्लंडच्या सेंट्रल बॅंका क्रिप्टोकरन्सीच्या विविध शक्यतांवर काम करत आहेत. 

दिवसेंदिवस क्रिप्टोकरन्सी  लोकप्रिय होत चालली आहे. तरुणांचा याकडे मोठा ओढा आहे. २०२१ मध्ये क्रिप्टोकरन्सीतील गुंतवणुकीत चांगलीच वाढ झाली आहे. शेअर बाजाराएवढेच आकर्षण क्रिप्टोकरन्सीचे आहे. क्रिप्टोकरन्सीच्या गुंतवणुकदारांसाठी सरलेले वर्ष यादगार ठरले आहे. अनेक डिजिटल करन्सींनी (Digital currency) यावर्षी ७००० टक्क्यांपर्यत परतावा दिला आहे. अर्थात नियमनाच्या पातळीवर सरकार क्रिप्टोकरन्सीवर नियंत्रण आणण्यासाठी बिल आणण्याच्या तयारीत आहे. आगामी अर्थसंकल्पात क्रिप्टोकरन्सीसंदर्भात काही मार्गदर्शक सूत्रे (Guidelines for cryptocurrency) जाहीर केली जाऊ शकतात. गुंतवणुकदारांसाठी मात्र २०२१ हे वर्ष फारच लाभदायी ठरले. रिझर्व्ह बॅंकदेखील क्रिप्टोकरन्सीवर देशात नियंत्रण आणण्यासाठी आग्रही आहे. त्यादृष्टीने आरबीआय अभ्यास करते आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी