PM Kisan Nidhi 11th Installment: नवी दिल्ली : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे (PM Kisan Samman Nidhi)सर्व पात्र शेतकरी 11 व्या हप्त्यासाठी 2000 रुपयांची वाट पाहत आहेत. पीएम किसान निधीसाठी देशभरातील 12.5 कोटी शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. 11 वा हप्ता येण्यापूर्वी सरकारने ई-केवायसी करणे आवश्यक केले आहे. याआधी 31 मार्च ही अंतिम तारीख होती मात्र आता ती 31 मे पर्यंत वाढवण्यात आली आहे. 1 एप्रिल ते 31 जुलै दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात 11 वा हप्ता जमा होणार आहे. यासाठी जवळपास 80 टक्के शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केले आहे. (Farmers may get PM Kisan Nidhi 11th Installment till 31st May)
अधिक वाचा : Business Idea: हा खास व्यवसाय सुरू करा फक्त 15 हजारात ! 3 महिन्यात कमवा 4 लाख, जाणून घ्या व्यवसाय...
जवळपास 80 टक्के शेतकऱ्यांनी ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. केंद्र सरकारच्या या योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात 31 मे पर्यंत 11 वा हप्ता जमा होऊ शकतो, असा दावा सूत्रांनी केला आहे. त्यामुळे तुम्ही अद्याप ई-केवायसी केले नसेल तर ते लवकर करा.
गेल्या वर्षीच्या रेकॉर्डच्या आधारावर, यावेळी 11 वा हप्ता उशीरा आला आहे. गेल्या वर्षी एप्रिल-जुलैचा हप्ता १५ मे रोजी खात्यात जमा झाला होता. परंतु, यावेळी 31 मे पर्यंत हप्ता येणे अपेक्षित आहे. पीएम किसान योजनेंतर्गत देशभरातील 12.5 कोटीहून अधिक शेतकरी नोंदणीकृत आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या वतीने ई-केवायसी पूर्ण होणार नाही, त्यांच्या खात्यात 2000 रुपये येणार नाहीत.
अधिक वाचा : EPFO Update : पीएफखातेधारकांच्या खात्यात जमा होणार पैसे, या नंबरवर लगेच चेक करा तुमचा बॅलन्स
शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारकडून शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांची मदत दिली जाते. हे पैसे वर्षातून तीनदा 2-2 हजार रुपयांच्या हप्त्यात दिले जातात. आतापर्यंत या योजनेचे 10 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात आले आहेत. 11 वा हप्ता लवकरच येत आहे.
किसान सन्मान निधी योजनेच्या 11व्या हप्त्यासाठी सरकारने ई-केवायसी करणे आवश्यक केले आहे. ई-केवायसी करण्याची अंतिम तारीख 31 मे आहे. जर तुम्ही ई-केवायसी केले नाही तर तुमचे पैसे अडकू शकतात. आता तुम्ही घरी बसूनही ई-केवायसी करू शकता.
NIEM नुसार, पीएम किसान योजनेचा (PM Kisan yojana) दरवर्षाचा पहिला हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै दरम्यान जारी केला जातो. त्याच वेळी, दुसऱ्या हप्त्याचे पैसे 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर दरम्यान जारी केले जातात. याशिवाय तिसऱ्या हप्त्याचे पैसे १ डिसेंबर ते ३१ मार्च दरम्यान पाठवले जातात. म्हणजेच या महिन्याच्या अखेरीस शेतकऱ्यांच्या खात्यावर 11 हप्त्याचे पैसे जमा होतील.