PM Kisan Samman Nidhi Yojana : नवी दिल्ली : देशभरातील 12.5 कोटी लाभार्थी पीएम किसान सन्मान निधीच्या 11व्या हप्त्याच्या (PM Kisan Samman Nidhi Yojana 11th installment) प्रतीक्षेत आहेत. 11व्या हप्त्यासाठी सरकारने ई-केवायसी करणे आवश्यक केले आहे. या हप्त्याची रिलीज वेळ एप्रिल ते जुलै दरम्यान आहे. मात्र प्रसार माध्यमांमधून आलेल्या समोर आलेल्या माहितीनुसार पात्र शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी केंद्र सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजनेची (PM Kisan Samman Nidhi Yojana)सुरूवात केली आहे. (Farmers to get 11th installment of PM Kisan very soon, eKYC is mandatory for it)
शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी शासनाकडून शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये दिले जातात. हे पैसे दरवर्षी प्रत्येकी 2,000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये दिले जातात. आतापर्यंत या योजनेचे 10 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात आले आहेत.
अधिक वाचा : 7th Pay Commission | पगारवाढीसाठी येणार नवीन योजना! यापुढे या आधारे वाढणार सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन...
प्रसार माध्यमांमधून समोर आलेल्या माहितीनुसार असे सांगण्यात येते आहे की 11व्या हप्त्याचे पैसे सरकार 14-15 मे च्या सुमारास हस्तांतरित करू शकते. यापूर्वी 2021 मध्येही 15 मे रोजीच खात्यांवर पैसे पाठवण्यात आले होते. अनेक राज्य सरकारांनी पात्र शेतकऱ्यांच्या हस्तांतरणाच्या विनंतीवर (RFT) स्वाक्षरीही केली आहे. RTF म्हणजे तुमचे पैसे हस्तांतरित करण्याची विनंती राज्य सरकारकडून करण्यात आली आहे.
11 व्या हप्त्यापूर्वी ई-केवायसी करणे आवश्यक आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 11व्या हप्त्यासाठी सरकारने ई-केवायसी करणे आवश्यक केले आहे. ई-केवायसी करण्याची अंतिम तारीख ३१ मे पर्यंत वाढवण्यात आली आहे. जर तुम्ही ई-केवायसी केले नाही तर तुमचे पैसे अडकू शकतात. शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन सरकारने pmkisan.gov.in वर केवायसीची प्रक्रिया पुन्हा सुरू केली आहे. आता तुम्ही घरबसल्या ई-केवायसी करू शकता.
अधिक वाचा : Petrol Diesel Price Today | पेट्रोल स्वस्त झाले की महाग? पटापट चेक करा नवे दर
तुमच्या हप्त्यावरील अपडेट तपासण्यासाठी तुम्हाला तुमचे पीएम किसान खाते तपासावे लागेल. तुम्हाला तुमच्या PM किसान खात्यामध्ये 11व्या हप्त्यासाठी राज्याने स्वाक्षरी केलेले Rft दिसल्यास, 11वा हप्ता तुमच्या खात्यात लवकरच येणार आहे.
'शेतकरी सहभाग प्राधान्य आमचे' योजनेअंतर्गत, पीएम किसान निधीच्या सर्व लाभार्थ्यांना 'किसान क्रेडिट कार्ड' (KCC) ची सुविधा दिली जाईल. यासाठी 1 मे पर्यंत विशेष ग्रामसभा आयोजित करून किसान क्रेडिट कार्ड (KCC) पासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचे अर्ज तयार करून संबंधित बँक शाखांमध्ये पाठविण्यात येत आहेत. सरकारने जारी केलेल्या सूचनांनुसार, पीएम किसान निधीच्या कोणत्याही लाभार्थीकडे 'किसान क्रेडिट कार्ड' नसल्यास ते बँकेशी संपर्क साधून अर्ज करू शकतात. अर्जासाठी, तुमच्या कागदपत्रांसह एक घोषणापत्र द्यावे लागेल.