PM Kisan Update: या नवरात्रीत शेतकऱ्यांसाठी खूशखबर! खात्यात येणार 2 हजार रुपये!

PM Kisan : केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी पीएम किसान योजना सुरू केलेली आहे याअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक लाभ दिला जातो. पीएम किसान सन्मान निधीच्या 12व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी एक खूशखबर आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर या नवरात्रीला सरकार 12व्या हप्त्याची रक्कम पाठवू शकते. नवरात्रीच्या सुरुवातीला खात्यात 2000 रुपये येतील असे सांगितले जात आहे.

PM Kisan Samman Nidhi Yojana
पीएम किसान सम्मान निधी योजना 
थोडं पण कामाचं
  • पीएम किसान योजनेचा 12 वा हफ्ता लवकरच मिळणार
  • नवरात्रीत शेतकऱ्यांना मिळणार खूशखबर
  • नवरात्रीच्या सुरुवातीला खात्यात 2000 रुपये येणार असल्याची सूत्रांची माहिती

PM Kisan 12th Installment Update : नवी दिल्ली : शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी सरकारने पीएम किसान योजना (PM Kisan) सुरू केली आहे. या योजनेद्वारे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतात. पीएम किसान सन्मान निधीच्या 12व्या हप्त्याची (PM Kisan 12th Installment) वाट पाहणाऱ्या कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी एक खूशखबर आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर या नवरात्रीला सरकार 12व्या हप्त्याची रक्कम  पाठवू शकते. नवरात्रीच्या सुरुवातीला खात्यात 2000 रुपये येतील असे सांगितले जात आहे. त्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. शेतकऱ्यांना थेट आर्थिक लाभ देण्यासाठी सरकार ही योजना राबवते. (Farmers to get 12th Installment of PM Kisan very soon)

अधिक वाचा : Disha Patani Photo: दिशा पटानी म्हणतेय "Missing My...", टायगर श्रॉफसोबत ब्रेक-अपनंतर दिशाची पोस्ट चर्चेत

हप्त्याचे पैसे या महिन्यात येऊ शकतात

समोर आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांना पीएम सन्मान निधी योजनेचा 12 वा हप्ता सप्टेंबर महिन्यातच मिळणार आहे. ३० सप्टेंबरपर्यंत हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करता येतील. याआधी, तुम्ही पीएम किसान हप्त्याची स्थिती तपासली पाहिजे. यावरून तुमच्या खात्यात 2000 रुपये येतील की नाही हे कळेल.

अधिक वाचा : PM मोदींनी 93व्या मन की बात मधून देशवासियांशी साधलेला संवाद

हप्ता मिळण्यास विलंब 

पीएम किसान योजनेत सरकारला अनेक अनियमितता आढळल्या. या अनियमिततांना आळा घालण्यासाठी सरकारने ई-केवायसी बंधनकारक केले आहे. शेतकऱ्यांकडून ई-केवायसी अपडेट करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट ठेवण्यात आली होती. मात्र शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण झाले नसल्याने मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांना बाराव्या हप्त्याचे पैसे मिळण्यास विलंब होतो आहे.

ई-केवायसी करणे आवश्यक

पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी बंधनकारक आहे. ई-केवायसीची ही अंतिम मुदत संपली आहे. मात्र त्यानंतरही ई-केवायसीची सुविधा सुरूच आहे. तुम्हाला पीएम किसान योजनेअंतर्गत पैसे मिळण्यासाठी तुम्हाला ई-केवायसी करणे आवश्यक आहे नाहीतर तुम्हाला ही रक्कम मिळणार नाही. त्यामुळे आजच पीएम किसान योजनेच्या वेबसाइटला भेट देऊन तुमचे ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा. त्यामुळे तुम्हाला मिळणारा लाभ सुरूच राहील.

अधिक वाचा : विधानसभेत मळली तंबाखू, खेळले मोबाईल गेम

शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणाऱ्यासाठी केंद्र सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. याद्वारे दरवर्षी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात एकूण 6000 रुपये जमा केले जातात. पीएम किसान ही केंद्र सरकारची 100% निधी असलेली योजना आहे. या योजनेनुसार शेतकऱ्यांना दिली जाणारी मदतीची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वर्ग केली जाते. त्याचा शेतकऱ्यांना खूप फायदा होतो. आता पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर ई-केवायसी पूर्ण करावे लागेल, नाहीतर ते पीएम किसान योजनेचा लाभ मिळण्यापासून वंचित राहू शकतात. 

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत अनेक शेतकरी तपासणीत अपात्र आढळले आहेत. या योजनेंतर्गत आतापर्यंत त्यांना दिलेली रक्कम त्यांच्याकडून वसूल केली जाणार आहे. लाभार्थ्यांची पडताळणी ही नियमितपणे केली प्रक्रिया आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी