PM Kisan | शेतकऱ्यांसाठी खूशखबर! आता ६,००० रुपयांबरोबर मिळणार ३६,००० रुपयांचा लाभ, पाहा कसे

Farmer Pension : शेतकऱ्यांना (Farmers)या योजनेअंतर्गत दरमहा ३,००० रुपये मिळू शकतात. यासाठी त्यांना कोणतेही कागदपत्रे द्यावी लागणार नाहीत. पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना २,००० रुपयांचे तीन हफ्ते असे वर्षाकाठी एकूण ६,००० रुपये मिळतात. अलीकडेच पीएम किसान योजनेचा १०वा हफ्तादेखील शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक ३६,००० रुपयांचा लाभ मिळू शकतो.

PM Kisan Man Dhan Yojna
पीएम किसान मन धन योजना 
थोडं पण कामाचं
 • शेतकऱ्यांना मिळणार पेन्शनचा लाभ
 • शेतकऱ्यांना साहाय्य करण्यासाठी सुरू केली योजना
 • पीएम किसान मानधन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळेल दरवर्षी ३६,००० रुपयांचा लाभ

PM Kisan Man Dhan Yojna: नवी दिल्ली : पीएम किसान सम्मान निधी योजनेच्या (PM Kisan Samman Nidhi)लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्यांना (Farmers)या योजनेअंतर्गत दरमहा ३,००० रुपये मिळू शकतात. यासाठी त्यांना कोणतेही कागदपत्रे द्यावी लागणार नाहीत. पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना २,००० रुपयांचे तीन हफ्ते असे वर्षाकाठी एकूण ६,००० रुपये मिळतात. अलीकडेच पीएम किसान योजनेचा १०वा हफ्तादेखील शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक ३६,००० रुपयांचा लाभ मिळू शकतो. हा लाभ कसा मिळणार ते जाणून घेऊया. (Farmers to get benefitted with annually Rs 36,000 along with Rs 6,000, Check how)

पीएम किसान मानधन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळेल ३६,००० रुपयांचा लाभ

पीएम किसान मानधन योजनेअंतर्गत (PM Kisan Man dhan Yojna Benefits)शेतकऱ्यांना दर महिन्याला पेन्शन दिली जाते. या योजनेअंतर्गत ६० वर्षाच्या वयानंतर दर महिन्याला ३,००० रुपये म्हणजे दर वर्षाला ३६,००० रुपयांचे पेन्शन शेतकऱ्यांना दिले जाते. गॅरंटीड पेन्शनचा हा लाभ पीएम किसान मानधन योजनेत किरकोळ रक्कम जमा करून कसा घेता येतो ते पाहूया.

आवश्यक कागदपत्रे

केंद्र सरकारकडून चालवण्यात येत असलेल्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रांची आवश्यकता पडेल. यात आधार कार्ड, बॅंक खात्याची माहिती इत्यादीचा समावेश आहे. मात्र जर तुम्ही पीएम किसान सम्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल तर कोणत्याही अतिरिक्त कागदपत्राची आवश्यकता असणार नाही. या योजनेत १८ वर्षांपासून ते ४० वर्षांपर्यतच्या वयाचे शेतकरी गुंतवणूक करू शकतात. या योजनेत वयानुसार गुंतवणुकीची रक्कम निश्चित करण्यात आली आहे.

पीएम किसान मानधन योजनेचा लाभ कोणाला मिळेल?

 1. या योजनेचा लाभ १८ ते ४० वर्षे वयाचा कोणताही शेतकरी घेऊ शकतो.
 2. यासाठी कमाल २ हेक्टर शेतीयोग्य जमीन असली पाहिजे. किमान जमिनीची अट नाही.
 3. या योजनेत शेतकऱ्यांना किमान २० वर्षे आणि कमाल ४० वर्षांपर्यत दरमहा ५५ रुपयांपासून २०० रुपयांपर्यतची गुंतवणूक करावी लागेल. ही रक्कम शेतकऱ्याच्या वयावर अवलंबून आहे.
 4. १८ वर्षे वय असताना या योजनेशी जोडल्या जाणाऱ्या शेतकऱ्याला दरमहा फक्त ५५ रुपये जमा करावे लागतील.
 5. जर एखादा शेतकरी वयाच्या ३० वर्षी या योजनेशी जोडला गेला तर त्याला दरमहा ११० रुपये जमा करावे लागतील.
 6. जर शेतकऱ्याचे वय ४० वर्षे असेल तर त्याला दरमहा २०० रुपये जमा करावे लागतील.

पैसै जमा झाले नसल्यास पुढील क्रमांकावर तक्रार करा किंवा त्याचबरोबर पीएमकिसानच्या ईमेल आयडीवर संपर्क करा

 1. पीएम किसान टोल फ्री नंबर : 18001155266
 2. पीएम किसान हेल्पलाइन नंबर : 155261
 3. पीएम किसान लैंडलाइन नंबर : 011—23381092, 23382401
 4. पीएम किसानची नवीन हेल्पलाइन : 011-24300606
 5. पीएम किसानची आणखी एक हेल्पलाइन  : 0120-6025109
 6. ई-मेल आईडी: pmkisan-ict@gov.in

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी