मुंबई : पीएम किसान समृध्दी निधाचा पुढचा म्हणजे 13 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत खातेदारांना वर्षभरात 6000 रुपये मिळतात. पण तुम्हाला माहिती आहे का की या व्यतिरिक्त आता तुम्हाला दरमहा 3 हजार रुपयेही मिळतील. यासाठी शेतकऱ्यांना पीएम किसान मानधन योजनेत थेट नोंदणी करावी लागेल. यामध्ये कोणत्याही कागदपत्रांची गरज नाही. पेन्शन योजनेसाठी लागणारे अंशदानही सन्मान निधी अंतर्गत येणाऱ्या सरकारी मदतीतून कापले जाईल. ( Farmers will get 3000 rupees per month from PM Kisan Scheme)
याचा फायदा असा होईल की दर 4 महिन्यांनी 2000 रुपयांच्या हप्त्यासोबतच 60 वर्षांनंतर शेतकऱ्यांना दरमहा 3000 रुपये मासिक पेन्शनही मिळेल. पीएम किसान सन्मान निधीच्या www.pmkisan.gov.in या वेबसाइटच्या विशेष वैशिष्ट्यांमध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे.
केंद्राच्या नरेंद्र मोदी सरकारने ही योजना सुरू केली आहे. शेतकऱ्यांशी संबंधित ही सर्वात मोठी योजना आहे आणि प्रत्येक खऱ्या शेतकऱ्याला त्याचा लाभ मिळावा यासाठी सरकार प्रयत्न करत आहे जेणेकरून शेतीवरील संकटाचा काळ संपेल. या योजनेअंतर्गत सरकार गरीब शेतकऱ्यांना वर्षातून 3 वेळा आर्थिक मदत करते. पीएम किसान सन्मान निधीमध्ये शेतकऱ्यांना 3 हप्त्यांमध्ये 6 हजार रुपयांची मदत मिळते. पीएम किसानमध्ये खाते असण्याचे अनेक फायदे आहेत.
अधिक वाचा : अभिनेत्री काजलला मिळाली होती गदर सिनेमाची ऑफर, पण 'या' कारणामुळे नाकारला सिनेमा
PM किसान मानधन योजनेबद्दल जाणून घ्या
पीएम किसान मानधन योजना ही केंद्र सरकारची योजना आहे. या अंतर्गत वयाच्या ६० वर्षांनंतर पेन्शन मिळण्याची तरतूद आहे. 18 ते 40 वर्षे वयोगटातील कोणताही शेतकरी या योजनेत सहभागी होऊ शकतो, ज्यांना वयाच्या 60 वर्षांनंतर मासिक 3000 रुपये किंवा वार्षिक 36000 रुपये पेन्शन मिळेल. यासाठीचे अंशदान दरमहा रु.55 ते रु.200 पर्यंत आहे. अंशदान हे सदस्यांच्या वयावर अवलंबून असते.