Agriculture Loan : मुंबई : कोरोना, निसर्गाची अवकृपा, कृषीमालाचा भाव यासारख्या संकटांनी शेतकरी (Farmers)कोलमडलांय. त्याला मदतीची आवश्यकता आहे. ग्रामीण भागातील अर्थचक्रच यामुळे कोलमडून गेले आहे. या पार्श्वभूमीवर आता सरकारने कर्जमाफीचा( Waiver to Agriculture loan) निर्णय घेऊन शेतकऱ्यांना मोठाच दिलासा दिला आहे. राज्यातील 33 हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय सरकारने घेतला आहे. (Farmers will get waiver for agriculture loan)
अधिक वाचा : PUC Rate hike | महाराष्ट्रातील पीयूसी चाचणी दर झाले महाग...जाणून घ्या नवीन दर
भूविकास बॅंकेच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना याचा निर्णय होणार आहे. आर्थिक संकटाने ग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना यातून मोठा दिलासा मिळणार आहे. लाभार्थी शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. महात्मा फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत (Mahatma Phule Yojana) राज्यातील हजारो शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आहे. सरकारने यासाठी केलेल्या तरतूदीतून राज्यातील शेतकऱ्यांचे 230 कोटी रुपयांचे कृषी कर्ज माफ होणार आहे. सरकारने यासाठीची यादी दिली आहे.
राज्य सरकारने महात्मा फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय 30 मार्चला घेतला आहे. मागील काही वर्षांपासून राज्यातील शेतकऱ्याला सतत नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागतो आहे. त्यामुळे कृषी कर्जाची परतफेड करणे शेतकऱ्याला शक्य झालेले नाही. कर्जाची परतफेड होत नाही तर दुसऱ्या बाजूला आर्थिक घडी बसवण्यासाठी पुन्हा नव्याने कर्ज घ्यावे लागते. अशी शेतकऱ्याची परिस्थिती आहे. यातून शेतकरी कर्जबाजारी होतो आहे. आधीच्या कर्जाची परतफेड न झाल्याने शेतकऱ्याला नवे कर्ज घेण्यासदेखील अडचणी येत आहेत. अवकाळी पावसाने शेतकऱ्याचे मोठे नुकसान केले आहे. राज्याच्या विविध भागातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. यातून शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.
अधिक वाचा : CNG Price Hike | पुण्यात सीएनजी 2.20 रुपयांनी महाग, आजपासून मोजावी लागेल एवढी किंमत...
पीएम किसान सन्मान निधीच्या (PM Kisan Samman Nidhi)सर्व 12.50 कोटी लाभार्थ्यांना सरकारकडून आणखी एक लाभ दिला जात आहे. पीएम किसान निधीचे लाभार्थी या योजनेच्या 11व्या हप्त्याची (PM Kisan Nidhi 11th Installment) वाट पाहत आहेत. हा हप्ता त्यांना एप्रिल ते जुलै दरम्यान द्यायचा आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शासनातर्फे ‘शेतकरी सहभाग प्राधान्य आमचे’हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
शेतकरी सहभाग प्राधान्य आमचे' योजनेअंतर्गत, पीएम किसान निधीच्या सर्व लाभार्थ्यांना 'किसान क्रेडिट कार्ड' (KCC) ची सुविधा दिली जाईल. यासाठी 1 मे पर्यंत विशेष ग्रामसभा आयोजित करून किसान क्रेडिट कार्ड (KCC) पासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचे अर्ज तयार करून संबंधित बँक शाखांमध्ये पाठविण्यात येत आहेत. सरकारने जारी केलेल्या सूचनांनुसार, पीएम किसान निधीच्या कोणत्याही लाभार्थीकडे 'किसान क्रेडिट कार्ड' नसल्यास ते बँकेशी संपर्क साधून अर्ज करू शकतात. अर्जासाठी, तुम्हाला निवडलेल्या कागदपत्रांसह एक घोषणापत्र देखील द्यावे लागेल.