FD Interest Rates | या बॅंका देतायेत फिक्स्ड डिपॉझिटवर सर्वाधिक व्याज

FD Interest Rates | कोणत्याही बॅंकेत (Bank)एफडीमध्ये पैसे गुंतवण्याआधी विविध बॅंकांचे एफडीवरील व्याजदर आणि ऑफर यांची तुलना करणे योग्य ठरते. कोणत्या बॅंकेत एफडीवर किती व्याजदर मिळतो आहे ते पाहूया.

FD Interest Rates
बॅंकांचे मुदतठेवीवरील व्याजदर 
थोडं पण कामाचं
  • फिक्स्ड डिपॉझिट (Fixed Deposits)हा एक सुरक्षित गुंतवणूक पर्याय
  • ज्येष्ठ नागरिक बॅंकांच्या मुदतठेवींमध्ये (Bank FD) पैसे गुंतवण्यास अधिक प्राधान्य देतात
  • छोट्या खासगी बॅंका आणि छोट्या वित्तीय बॅंका, अधिकाधिक ग्राहक आकर्षित करण्यासाठी जास्त व्याजदराच्या ऑफर देतात

FD Interest Rates | नवी दिल्ली: मुदतठेवी किंवा फिक्स्ड डिपॉझिट (Fixed Deposits)(FD)हा एक सुरक्षित गुंतवणूक पर्याय असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये लोकप्रिय आहे. आजही ज्येष्ठ नागरिक बॅंकांच्या मुदतठेवींमध्ये (Bank FD) पैसे गुंतवण्यास अधिक प्राधान्य देतात. मात्र मागील काही वर्षात मुदतठेवींवरील व्याजदरात (FD Interest Rates) मोठी घट झाली आहे. याचा परिणाम नागरिकांचा कल बदलण्याकडे होताना दिसतो आहे. कोणत्याही बॅंकेत (Bank)एफडीमध्ये पैसे गुंतवण्याआधी विविध बॅंकांचे एफडीवरील व्याजदर आणि ऑफर यांची तुलना करणे योग्य ठरते. कोणत्या बॅंकेत एफडीवर किती व्याजदर मिळतो आहे ते पाहूया. (FD Interest Rates: Check which banks are giving higher interest rate on Fixed Deposits)

विविध बॅंकांचे मुदतठेवीवरील व्याजदर-

Yes Bank- येस बॅंक ही खासगी क्षेत्रातील बॅंक आहे. येस बॅंक ज्येष्ठ नागरिकांसाठी तीन वर्षांच्या एफडीवर ७ टक्के व्याजदर देते आहे. खासगी बॅंकांमध्ये येस बॅंक सध्या सर्वाधिक व्याज देते आहे. मुदतठेवींमध्ये ३ वर्षांसाठी केलेली १ लाख रुपयांची गुंतवणूक वाढून १.२३ लाख रुपये होते.

RBL Bank - आरबीएल बॅंक ज्येष्ठ नागरिकांसाठी ३ वर्षांसाठी एफडीवर ६.८० टक्के व्याज देते आहे. १ लाख रुपयांची एफडीमधील गुंतवणूक ३ वर्षात १.२२ लाख रुपये होईल.

IndusInd Bank - इंडसइंड बॅंक ही देखील एक खासगी क्षेत्रातील बॅंक आहे. इंडसइंड बॅंक तीन वर्षांच्या मुदतठेवीर ज्येष्ठ नागरिकांना ६.५० टक्के व्याज देते आहे. १ लाख रुपयांची गुंतवणूक ३ वर्षांसाठी केल्यास वाढून १.२१ लाख रुपये होईल.

DCB Bank- डीसीबी बॅंक तीन वर्षांच्या मुदतठेवीर ज्येष्ठ नागरिकांना ६.४५ टक्के व्याज देते आहे. १ लाख रुपयांची गुंतवणूक ३ वर्षांसाठी केल्यास वाढून १.२१ लाख रुपये होईल. बॅंकेत किमान १०,००० रुपयांची एफडी करावी लागणार आहे.

IDFC First Bank - आयडीएफसी फर्स्ट बॅंक तीन वर्षांच्या मुदतठेवीर ज्येष्ठ नागरिकांना ६.२५ टक्के व्याज देते आहे. १ लाख रुपयांची गुंतवणूक ३ वर्षांसाठी केल्यास वाढून १.२० लाख रुपये होईल. बॅंकेत किमान १०,००० रुपयांची एफडी करावी लागणार आहे.

छोट्या खासगी बॅंका आणि छोट्या वित्तीय बॅंका, अधिकाधिक ग्राहक आकर्षित करण्यासाठी जास्त व्याजदराच्या ऑफर देत असतात. डिपॉझिट इन्श्युरन्स अॅंड क्रेडिट कॉर्पोरेशन (DICGC), ही आरबीआयच्या अखत्यारीतील संस्था ५ लाख रुपयांपर्यतच्या मुदतठेवींवर गॅरंटी देते.
 

जे लोक घर विकत घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी सध्या उत्तम संधी आहे. मागील दहा वर्षांच्या कालावधीचा विचार करता गृहकर्ज (Home Loan Interest Rates) सध्या सर्वात नीच्चांकी व्याजदराने म्हणजे सर्वात स्वस्त व्याजदराने उपलब्ध आहे. त्यातच सणासुदीच्या हंगामाची सुरूवात झाली आहे. त्यामुळे अनेक बॅंका आणि वित्तीय सेवा कंपन्यांनी गृहकर्जावर (Home Loan) विविध ऑफर्स बाजारात आणल्या आहेत. दुसऱ्या बाजूला बांधकाम व्यावसायिक देखील अनेक ऑफर्स ग्राहकांना देत आहेत. मागील काही काळापासून बॅंकांनी आपल्या गृहकर्जावरील व्याजदरात कपात केली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी