Alert : गेल्या आर्थिक वर्षासाठी (Assessment Year) इन्कम टॅक्स फाईल (ITR File) करण्यासाठी आज म्हणजेच 31 जुलै हा अखेरचा दिवस (Last day) आहे. आजचा दिवस संपेपर्यंत इन्कम टॅक्स फाईल करता येणार आहे. ही मुदत वाढवली जाणार नाही, असं इन्कम टॅक्स विभागाकडून वारंवार सांगण्यात आलं आहे. मात्र तरीही अनेकांनी आपला आयकर फाईल करण्याची प्रक्रिया अद्याप पूर्ण केलेली नाही. 31 जुलैपर्यंत इन्कम टॅक्स फाईल केला नाही, त्यापुढे या कामासाठी दंड भरावा लागणार आहे. त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही. आज दिवसभरात कधीही तुम्ही इन्कम टॅक्स फाईल करू शकता. त्यासाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रं आणि तपशील जवळ घेऊन तुम्ही लॉग-इन केलंत, तर काही मिनिटांतच ही प्रक्रिया तुम्ही पूर्ण करू शकाल.
इन्कम टॅक्स फाईल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी तुम्हाला काही महत्त्वाचे कागदपत्रं जवळ घेऊन बसणं सोयीचं जाईल. त्यामध्ये फॉर्म 16 किंवा फॉर्म 16A, 26AS मधील टीडीएसचे तपशील, ॲन्युअल इन्फर्मेशन स्टेटमेंट, कॅपिटल गेनबबातचं स्टेटमेंट ही कागदपत्रं आवश्यक आहेत. यापैकी जी कागदपत्रं लागू असतील, ती जवळ ठेवा. तुमचा आयकर फाईल करण्यासाठी आवश्यक असणारे सर्व तपशील त्यामध्ये असतात. त्याशिवाय तुमचं पॅन कार्ड, आधार कार्ड नंबर, गुंतवणुकीचे तपशील आणि बँक अकाउंट तपशील तुमच्यापाशी तयार ठेवा. ही सगळी तयारी झाली की मग इन्कम टॅक्स फाईल करण्याची प्रक्रिया सुरू करा.
अधिक वाचा - EPFO Update: लाखो पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी, ईपीएफओने सुरू केली नवी सुविधा
शनिवारी रात्री साडेआठ वाजेपर्यंत केवळ 5 कोटीपेक्षा अधिक लोकांनी इन्कम टॅक्स फाईल केला आहे. ही संख्या कमी असून अनेकांनी अजून टॅक्स फाईल केलेला नाही. तुम्हीही त्यापैकीच असाल तर उशीर न करता वेळेत टॅक्स फाईल करा.