ITR Filing : 31 जुलैपूर्वी भरा प्राप्तिकर विवरणपत्र...सरकार म्हणतंय मुदत वाढणार नाही

Income Tax Return : प्राप्तिकर विवरणपत्र (ITR) वेळेत दाखल करणे हे अत्यंत महत्त्वाचे आर्थिक काम असते. 2022-23 या मूल्यांकन वर्षासाठी किंवा 2021-22 आर्थिक वर्षासाठी प्राप्तिकर विवरणपत्र म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न (ITR Filing) भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2022 आहे. अशा परिस्थितीत, करपात्र उत्पन्न गटात येणाऱ्या व्यक्तीला अंतिम मुदतीपूर्वी आयटीआर दाखल करणे महत्त्वाचे ठरते. त्यातच सरकार आता आयटीआर भरण्याची अंतिम मुदत वाढवण्याच्या मनस्थितीत नाही.

ITR Filing
प्राप्तिकर विवरणपत्र  
थोडं पण कामाचं
 • करपात्र उत्पन्न गटात येणाऱ्या व्यक्तीला अंतिम मुदतीपूर्वी आयटीआर दाखल करणे महत्त्वाचे
 • 2022-23 या मूल्यांकन वर्षासाठी किंवा 2021-22 आर्थिक वर्षासाठी प्राप्तिकर विवरणपत्र म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न (ITR Filing) भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2022
 • मुदतीच्या आत प्राप्तिकर विवरणपत्र दाखल न केल्यास नंतर आयटीआर भरताना तुम्हाला दंड भरावा लागणार

ITR filing for AY 2022-23 : नवी दिल्ली : प्राप्तिकर विवरणपत्र (ITR) वेळेत दाखल करणे हे अत्यंत महत्त्वाचे आर्थिक काम असते. 2022-23 या मूल्यांकन वर्षासाठी  किंवा 2021-22 आर्थिक वर्षासाठी प्राप्तिकर विवरणपत्र म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न (ITR Filing) भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2022 आहे. अशा परिस्थितीत, करपात्र उत्पन्न गटात येणाऱ्या व्यक्तीला अंतिम मुदतीपूर्वी आयटीआर दाखल करणे महत्त्वाचे ठरते. त्यातच सरकार आता आयटीआर भरण्याची अंतिम मुदत वाढवण्याच्या मनस्थितीत नाही. त्यामुळे वेळेवर आयटीआर फाइल करा अन्यथा तुम्हाला अडचणीत येऊ शकते. मुदतीच्या आत प्राप्तिकर विवरणपत्र दाखल न केल्यास नंतर आयटीआर भरताना तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. महसूल सचिवांनी सांगितले की, सरकार प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची अंतिम मुदत वाढविण्याच्या विचारात नाही. प्राप्तिकर विवरणपत्राशी संबंधित महत्त्वाच्या बाबी जाणून घेऊया. (File your ITR before 31 July 2022, Government not in mood of extending the deadline)

अधिक वाचा : Gold-Silver Rate Today, 22 July 2022: सोन्याच्या भावात मोठी घसरण, सोन्याने गाठली नीचांकी, पाहा ताजा भाव

आयटीआर भरण्यात अडचण

तुमच्या माहितीसाठी प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची अंतिम मुदत जसजशी जवळ येत आहे, तसतसे कर रिटर्न भरण्यात गुंतलेल्या व्यावसायिक चार्टर्ड अकाउंटंटना काही अडचणी येत आहेत. त्यांचा दावा आहे की वेबसाइट (incometax.gov.in,) दिवसातून काही वेळा चांगली चालते, परंतु काही वेळा खूपच हळू होते. मात्र, शेवटची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशी रिटर्न भरणाऱ्यांची संख्याही वाढत आहे.

अधिक वाचा : Demat Account Update : शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! सेबीने केली मोठी घोषणा

प्राप्तिकर विवरणपत्र कसे भरायचे? (How to File ITR)

 1. - घरबसल्या ITR फाइल करण्यासाठी, तुम्हाला प्रथम https://eportal.incometax.gov.in/ वर जावे लागेल.
 2. -. यानंतर येथे यूजर आयडी आणि पासवर्ड द्यावा लागेल. पासवर्ड टाकल्यानंतर Continue या पर्यायावर क्लिक करा.
 3. - फाइल आयकर रिटर्न पर्यायावर क्लिक करा आणि मूल्यांकन वर्ष निवडा.
 4. -. फाइलिंगचा ऑनलाइन मोड निवडा. यानंतर ITR-1 किंवा ITR-4 फॉर्म निवडा.
 5. -. पगारदार व्यक्तीला ITR-4 फॉर्म निवडावा लागतो.
 6. -. रिटर्न फॉर्म डाउनलोड केल्यानंतर आणि भरण्याच्या प्रकारावर 139(1) निवडल्यानंतर, एक फॉर्म उघडेल ज्यामध्ये सर्व माहिती भरा.
 7. -. यानंतर दिलेल्या माहितीची पडताळणी करून ती सबमिट करा.
 8. -. फॉर्म सबमिट केल्यानंतर, त्याचा पुष्टीकरण संदेश तुमच्या मेल आयडी आणि मोबाइल नंबरवर येईल.

अधिक वाचा : House Construction Tips: स्वस्तात सुंदर घर बांधायचंय? मग विस्ताराने जाणून घ्या ही सोपी पद्धत आणि टिप्स...करा लाखोंची बचत

वेळेवर ITR दाखल केल्याने तुम्हाला बँकांकडून जलद आणि सुलभ कर्ज मंजूरी, लवकर कर परतावा आणि सरकारी निविदा लवकर मंजूरी आणि बरेच काही यांसारखे फायदे मिळतात. मात्र जर तुम्ही दिलेल्या मुदतीत प्राप्तिकर विवरणपत्र दाखल केले नाहीत तर उशीरा केलेल्या आयटीआर फाइलिंगसाठी शुल्काच्या रूपात मोठा दंड आकारला जाईल. या आठवड्याच्या सुरुवातीला, प्राप्तिकर विभागाने उघड केले की त्यांना 2022-23 या मूल्यांकन वर्षासाठी 2 कोटी पेक्षा जास्त विवरणपत्र मिळाले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी