LIC IPO Latest Update : नवी दिल्ली : एलआयसीच्या आयपीओ संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अर्थ मंत्रालयाने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या प्रमुखांना कर्मचाऱ्यांशी संबंधित एक सूचना दिली आहे. अर्थ मंत्रालयाने यात म्हटले आहे की एलआयसीच्या आयपीओशी संबंधित बँकांच्या कर्मचाऱ्यांची 15 मेपर्यंत बदली करू नये. सामान्य गुंतवणुकदारांसाठी एलआयसीचा आयपीओ उद्या खुला होणार आहे. अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आर्थिक व्यवहार विभागाच्या वतीने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या प्रमुखांना एक निर्देश जारी करण्यात आला आहे. LIC हा देशातील सर्वात मोठा IPO आहे. तो 2 मे रोजी अँकर गुंतवणुकदारांसाठी खुला झाला आहे. तर आयपीओ 4 मे 2022 ला सर्वसामान्य गुंतवणुकदारांसाठी खुले होईल आणि 9 मे 2022 ला बंद होईल. (Finance Ministry instructs PSU banks to not to transfer bank employees involved in LIC IPO)
सरकारच्या वतीने, LIC च्या IPOमध्ये शेअरचा प्राईस बॅंड 902 रुपये ते 949 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली आहे. एका लॉटमध्ये 15 शेअर्स असतील. यापूर्वी 2 मे रोजी, LIC च्या IPO ला अँकर गुंतवणुकदारांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. अँकर गुंतवणुकदारांकडून 5,620 कोटी रुपयांची पूर्ण सदस्यता प्राप्त झाली आहे.
अधिक वाचा : Akshaya Tritiya | अक्षय तृतीयेला खरेदी करा फक्त 1 रुपयात सोने, जाणून घ्या काय आहे खरेदी करण्याची पद्धत?
5,620 कोटी रुपयांचे शेअर्स अँकर गुंतवणुकदारांसाठी राखीव होते. अॅंकर गुंतवणुकदारांनी हा कोटा पूर्ण केला आहे. आता हा आयपीओ बुधवारी 4 मे 2022 ला इतर गुंतवणुकदारांसाठी खुला होईल. या IPO मधून 21,000 कोटी रुपये उभारण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. IPO अंतर्गत सरकार LIC चे 22,13,74,920 शेअर्स विकते आहे.
किरकोळ गुंतवणुकदार आणि पात्र कर्मचाऱ्यांना प्रति शेअर 45 रुपये सवलत मिळेल, तर एलआयसी पॉलिसीधारकांना प्रति शेअर 60 रुपये सवलत मिळेल. कंपनीने पॉलिसीधारक, कर्मचारी आणि किरकोळ गुंतवणुकदारांच्या कोट्यासाठी प्रत्येकी 2 लाख रुपयांची गुंतवणूक मर्यादा निश्चित केली आहे. कर्मचाऱ्यांना प्रति शेअर ४५ रुपये सूट मिळेल. IPO दरम्यान किरकोळ गुंतवणूकदारांना प्रति शेअर 45 रुपयांची सूट देखील मिळेल. LIC पॉलिसीधारकांना अंतिम ऑफर किंमतीवर प्रति शेअर 60 रुपये सूट मिळेल. IPO दरम्यान, अनुक्रमे 15,81,249 समभाग आणि 2,21,37,492 समभाग कर्मचारी आणि पॉलिसीधारकांसाठी राखीव असतील.
सरकार IPO द्वारे विमा कंपनीचे 3.5 टक्के हिस्सा किंवा 22,13,74,920 शेअर्स विकणार आहे. सरकारचा एलआयसीमध्ये सध्या 100 टक्के मालकी हिस्सा आहे. तो IPO नंतर 96.50 टक्के होईल. शेअर्सचे वाटप 12 मे 2022 रोजी केले जाईल. IPO चा लॉट साइज 15 शेअर्सची बोली आहे ज्यासाठी 14,235 रुपयांची गुंतवणूक करावी लागतील. किरकोळ वैयक्तिक गुंतवणूकदार 1,99,290 रुपये खर्च करून 14 लॉट किंवा 210 शेअर्ससाठी अर्ज करू शकतात. 17 मे रोजी हा स्टॉक बीएसई आणि एनएसईवर सूचीबद्ध होण्याची शक्यता आहे.