एप्रिल महिन्यातच उरकून टाका पैशांशी संबंधित ही कामे, अन्यथा नंतर आपल्याला येऊ शकतात समस्या

नोकरदार लोकांनी आणि व्याजातून मोठी कमाई करणाऱ्या लोकांनी एप्रिल महिन्यातच पैशांशी संबंधित अनेक कामे उरकून घ्या. असे जर आपण केले नाही तर भविष्यात त्यांच्यासमोर अनेक समस्या येऊ शकतात. जाणून घ्या तपशील.

Tax
एप्रिल महिन्यातच उरकून टाका पैशांशी संबंधित ही कामे, अन्यथा नंतर आपल्याला येऊ शकतात समस्या 

थोडं पण कामाचं

  • आयकरदात्यांकडे आहे दोन यंत्रणांमधून निवड करण्याचा पर्याय
  • फिक्स्ड डिपॉझिटमध्ये करत असाल गुंतवणूक तर हे करा
  • विनाव्याज कर जमा करण्याची शेवटची तारीख ठेवा लक्षात

मुंबई : या महिन्याच्या एक तारखेला केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (Central Board of Direct Taxes) असेसमेंट इअर (assessment year) 2020-21साठी आयकराशी संबंधित सर्व फॉर्म नोटीफाय (forms notify) केले आहेत. आपल्याकडे आयटीआर (ITR) भरण्यासाठी जुलै महिन्यापर्यंतचा अवधी आहे. मात्र आपल्यासमोर आपल्या पैशांशी (money) संबंधित अशी अनेक कामे आहेत जी या एप्रिल महिन्यातच पूर्ण करणे हितावह (beneficial) आहे. असे न केल्यास आपल्याला भविष्यात (future) समस्या (problems) येऊ शकतात. जाणून घेऊया या कामांबद्दल.

आयकरदात्यांकडे आहे दोन यंत्रणांमधून निवड करण्याचा पर्याय

आर्थिक वर्ष 2020-21पासून करदात्यांकडे जुन्या आणि नव्या करप्रणालींपैकी एकीची निवड करण्याचा पर्याय आहे. जर आपण नोकरदार असाल आणि कराच्या कक्षेत येत असेल तर याच महिन्यात आपल्या कंपनी किंवा नियोक्त्याला याची माहिती द्या की आपण कोणत्या प्रणालीअंतर्गत कर भरणार आहात. दोन्ही प्रणालींमध्ये करातली सवलतींबद्दल वेगवेगळ्या तरतुदी आहेत. आपण आपल्या गुंतवणुकीच्या आधारे आपल्यासाठी सर्वोत्तम पर्याय निवडू शकता. जर आपण आपली सध्याची प्रणालीच पुढे चालवू इच्छित असाल तर आपल्याला आपली गुंतवणूक आणि खर्चाची माहिती आपल्या कंपनीला किंवा नियोक्त्याला द्यावी लागेल. खासकरून ज्यावर आपल्याला करात सूट मिळवायची आहे त्यांची माहिती देणे महत्वाचे आहे.

फिक्स्ड डिपॉझिटमध्ये करत असाल गुंतवणूक तर हे करा

जर आपण फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करत असाल आणि आपल्यावर कर लागू असेल तर आपल्या बँकेकडे फॉर्म 15H किंवा 15H अवश्य जमा करा. आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यातच हा जमा करावा कारण जर व्याजातून मिळणारी रक्कम 40,000पेक्षा जास्त असेल तर बँकेकडून यावर टीडीएस लागू होतो. 15G आणि 15H फॉर्म क्रमश: 60 वर्षांपेक्षा कमी आणि जास्त वयाच्या लोकांसाठी सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म आहे. काही बँका ऑनलाईन हा फॉर्म भरण्याचीही सुविधा देतात.

विनाव्याज कर जमा करण्याची शेवटची तारीख ठेवा लक्षात

विवादापासून विश्वास या योजनेअंतर्गत कोणत्याही व्याजाविना कर जमा करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2021 आहे. 17 मार्च 2020 रोजी थेट विवादापासून विश्वास कायदा 2020 लागू करण्यात आला आहे. त्यामुळे जर आपल्याकडे कोणताही जुना कर थकित असेल तर या योजनेअंतर्गत कोणतेही व्याज न देता आपण तो जमा करू शकता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी