Tesla Manufacturing Plant in India : नवी दिल्ली : टेस्लाचा उत्पादन प्रकल्प (Tesla Manufacturing Plant)भारतात सुरू होण्यासंदर्भात जोरदार चर्चा सुरू असतानाच इलॉन मस्क (Elon Musk)यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आधी भारतात टेस्लाच्या कारची (Tesla Car)विक्री आणि सेवा पुरवण्यास परवानगी द्यावी त्यानंतरच भारतात उत्पादक प्रकल्प सुरू करण्यावर विचार करता येईल, असे ट्विट इलॉन मस्कने केले आहे. भारतात आपली वाहने विकण्यासाठी आयात शुल्कात कपात करण्याची मागणी करणारी अमेरिकन इलेक्ट्रिक कार (Electric Car) निर्माता कंपनी टेस्ला आपल्या कारची देशात प्रथम विक्री आणि सेवा करण्याची परवानगी दिल्याशिवाय स्थानिक पातळीवर आपली उत्पादने तयार करणार नाही, असे कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी इलॉन मस्क यांनी म्हटले आहे. (First allow us to sell Tesla cars, then we will start manufacturing unit, says Elon Musk)
टेस्ला भारतात उत्पादन प्रकल्प स्थापन करण्याबाबत विचारणा करणाऱ्या युजरला केलेल्या ट्विटमध्ये, ते म्हणाले, “टेस्ला अशा कोणत्याही ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग प्लांट लावणार नाही जिथे आम्हाला आधी कार विकण्याची आणि सेवा देण्याची परवानगी नाही.” गेल्या महिन्यात, केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले होते की जर टेस्ला भारतात इलेक्ट्रिक वाहने तयार करण्यास तयार असेल तर 'काही अडचण नाही' परंतु कंपनीने चीनमधून कार आयात करू नये.
अधिक वाचा : ATM Facts : एटीएम पिन फक्त 4 अंकी का असतो, याचा कधी विचार केला आहे? कारण ऐकून वाटेल आश्चर्य...
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये, मस्क म्हणाले होते की टेस्ला देशात प्रथम आयात केलेल्या वाहनांसह यशस्वी झाल्यास भारतात उत्पादन युनिट स्थापन करू शकते. ते म्हणाले होते की टेस्ला आपली वाहने भारतात लॉन्च करू इच्छित आहे “परंतु जगातील कोणत्याही मोठ्या देशापेक्षा आयात शुल्क सर्वात जास्त आहे!” सध्या, भारत CIF (किंमत, विमा आणि मालवाहतूक) सह 40,000 डॉलरपेक्षा जास्त किंमत असलेल्या आणि पूर्णपणे आयात केलेल्या कारवर 100 टक्के आयात शुल्क लावतो. त्या रकमेपेक्षा कमी किंमत असलेल्या कारवर 60 टक्के आयातशुल्क लावतो.
अधिक वाचा : Bank Account Holders : सर्व बँक खातेदारांसाठी मोठी बातमी, 4 लाखांचे नुकसान टाळण्यासाठी लगेच करा हे काम...
याआधी ट्विटरवरील बनावट अकाऊंटसंदर्भात मस्क यांनी ट्विट केले होते. टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क (Elon Musk)यांनी ट्विटरच्या युजर्सना (Twitter Users)सावधगिरीचा इशारा दिला होता. मस्कने म्हटले होते की ट्विटरमधील "अल्गोरिदम" अशा प्रकारे हाताळले जात आहेत की ते युजर्सच्या लक्षात येत नाहीत. मस्क यांनी ट्विटरवर ट्विट (Musk Tweet) करत म्हटले आहे की, "ट्विटरवरील तुम्हाला अल्गोरिदमद्वारे अशा प्रकारे हाताळले जात आहे की तुम्हाला कळत नाही.'' मस्कच्या ट्विटरसंदर्भातील या ट्विटची आता जोरदार चर्चा झाली होती. आधीच ट्विटरबरोबरचा सौदा इलॉन मस्कने स्थगित केल्यामुळे आता मस्क ट्विटरसंदर्भात कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.