Indian Railways Update : कोईंबतूर : भारतीय रेल्वेच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा सुरू झाला आहे. देशातील पहिली खासगी ट्रेन (First private train) कोईंबतूर येथून धावली आणि रेल्वेमधील एका नव्या अध्यायाला सुरूवात झाली. देशातील या पहिल्या खासगी ट्रेनला सुरू करणाऱ्या कंपनीचे नाव साऊथ स्टार रेल (South Star Rail) असे आहे. साउथ स्टार रेल , ही ट्रेन चालवणारी कंपनी, मार्टिन सॅंटियागो यांच्या नेतृत्वात आहे जे सध्या सक्तवसूल संचालनालय म्हणजेच ईडीच्या रडारवर आहेत. त्यांचे तमिळनाडूमधील राजकीय नेत्यांशी जवळचे संबंध आहेत. भारत गौरव योजनेंतर्गत (Bharat Gaurav Scheme),भारतातील पहिली खाजगी ट्रेनची , मंगळवार, 14 जून रोजी संध्याकाळी 6 वाजता तामिळनाडूच्या कोईम्बतूर नॉर्थ स्टेशन (Coimbatore) ते महाराष्ट्रातील साईनगर शिर्डी (Shirdi) अशी पहिली सेवा सुरू झाली. ही गाडी गुरुवार, 16 जून रोजी सकाळी 7.25 वाजता शिर्डीला पोचेल. तर ही ट्रेन रविवार, 19 जून रोजी कोईम्बतूरला परतेल. (First private train in India runs between Coimbatore to Shirdi station)
अधिक वाचा : Federal Reserve : अमेरिकी फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात 0.75 टक्क्यांनी वाढ, 28 वर्षांतील सर्वात मोठी वाढ
"भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा प्रचार करत" रेल्वे मंत्रालयाने या ट्रेनच्या पहिल्या प्रवासाची घोषणा करताना काही फोटो आपल्या ट्विटर हँडलवर ट्विट केले आहेत. त्यात ट्विट करण्यात आले आहे की, "भारत गौरव योजनेंतर्गत पहिला नोंदणीकृत सेवा देणारा आणि कोईम्बतूर उत्तर ते साईनगर शिर्डी (sic) या पहिल्या सेवेचे ऑपरेशन सुरू करणारा दक्षिण रेल्वे हा पहिला झोन बनला आहे."
अधिक वाचा : NPS: एनपीएसच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! आता मिळणार ही जबरदस्त सुविधा, विस्ताराने जाणून घ्या