Five years of Demonetization | पाहा नोटाबंदीचा रोख रक्कम आणि डिजिटल व्यवहारांवर काय झाला परिणाम

Five years of Demonetization | ८ नोव्हेंबर २०१६ (History of 8 November)ला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काळ्या पैशाला (Black Money)आळा घालण्यासाठी आणि काळा पैसा संपवण्यासाठी देशात ५०० आणि १,००० रुपयांच्या नोटांचे चलन (Demonetization) व्यवहारातून बाद केले होते.

Five years of Demonetization
नोटाबंदीची पाच वर्षे 
थोडं पण कामाचं
  • ८ नोव्हेंबर २०१६ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीची घोषणा केली होती
  • आरबीआयनुसार २९ ऑक्टोबरपर्यत देशात २९.१७ लाख कोटी रुपयांचे नोट चलनात होते
  • या पाच वर्षात देशातील डिजिटल व्यवहार मोठी वाढ

Demonetization | नवी दिल्ली : बरोबर पाच वर्षापूर्वी म्हणजे ८ नोव्हेंबर २०१६ (History of 8 November)ला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काळ्या पैशाला (Black Money)आळा घालण्यासाठी आणि काळा पैसा संपवण्यासाठी देशात ५०० आणि १,००० रुपयांच्या नोटांचे चलन (Demonetization) व्यवहारातून बाद केले होते. नोटाबंदीला पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. या पाच वर्षात देशात काय बदल झाले ते पाहूया. (Five years of Demonetization | What effect Demonetization did have on cash & digital transactions in country, lets see the details)
 

देशात वाढली रोख रक्कम

रिझर्व्ह बॅंकेच्या आकडेवारीनुसार चलनाच्या मूल्यानुसार ४ नोव्हेंबर २०१६ला देशात १७.७४ लाख कोटी रुपयांच्या चलनी (Notes In Circulation)नोटा वापरात होत्या. मात्र २९ ऑक्टोबर २०२१ला यापेक्षा ६४ टक्के जास्त म्हणजे २९.१७ लाख कोटी रुपयांच्या चलनी नोटा चलनात होत्या. यातून ही बाब समोर येते की नोटबंदीचा एक महत्त्वाचा उद्देश डिजिटल व्यवहारांना चालना देणे हा हेतू. मात्र त्याचबरोबर या निर्णयामुळे रोख चलनाच्या वापरावर परिणाम झाला नाही. २९ ऑक्टोबर २०२१ पर्यत चलनी नोटांचे मूल्य २,२८,९६३ कोटी रुपयांनी वाढले. तर ३० ऑक्टोबर २०२०ला चलनी नोटांचे मूल्य २६.८८ कोटी रुपये होते. ३० ऑक्टोबर २०२० ला चलनी नोटांचे वार्षिक वृद्धी ४,५७,०५९ कोटी रुपये इतकी होती.

रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या आकडेनुसार १ नोव्हेंबर २०१९ला चलनात असलेल्या चलनी नोटांची वार्षिक वृद्धी २,८४,४५१ कोटी रुपये होती. चलनातील नोटांचे मूल्य आणि संख्या यांची वार्षिक वाढ २०२०-२१ या काळात अनुक्रमे १६.८ टक्के आणि ७.२ टक्के इतकी होती. तर २०१९-२० या वर्षात नोटांचे मूल्य आणि संख्या यामधील वाढ अनुक्रमे १४.७ टक्के आणि ६.६ टक्के इतकी होती.

डिजिटल व्यवहार वाढले

दरम्यान नोटबंदीनंतर देशातील डिजिटल व्यवहारांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अनेक लोक आता डिजिटल माध्यमांद्वारे पैशांची देवाणघेवाण करत आहेत. लोक नेट बॅंकिंग, डेबिट-क्रेडिट कार्ड, गुगलपे, पेटीएम, फोन पे इत्यादी व्यासपीठांचा वापर करत आहेत. युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI)द्वारे ऑक्टोबर महिन्यात ४ अब्ज रुपयांपेक्षा जास्त रकमेचे व्यवहार झाले आहेत. हे व्यासपीठ सुरू झाल्यापासूनची ही उच्चांकी पातळी आहे. डिजिटल व्यवहारांद्वारे ऑक्टोबरमध्ये ७.७१ ट्रिलियन रुपयांचे विक्रमी देवाणघेवाण झाले.

नोटाबंदीनंतर ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा ८ नोव्हेंबर २०१६पासून वापरण्यास बंदी आली. त्यानंतर आरबीआयने ५०० रुपयांच्या नव्या नोटा आणि २,००० रुपयांच्या नोटा वापरात आणल्या. याच काळात देशात युपीआयसारखे डिजिटल व्यासपीठ पैशांच्या देवाणघेवाणीसाठी उपलब्ध झाले. आज देशभरात सर्वत्र सर्वसामान्य नागरिक युपीआयसारख्या सुविधेचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. डिजिटल तंत्रज्ञानाच्या वाढत्या विस्ताराचा परिणाम आर्थिक क्षेत्रावरदेखील झाला आहे.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी