Interest rate | आयसीआयसीआय बँकेच्या मुदत ठेवींच्या व्याजदरात वाढ, पाहा नवीन दर

Fixed Deposit : खाजगी क्षेत्रातील आघाडीची बॅंक असलेल्या आयसीआयसीआय बॅंकेने (ICICI Bank) मुदतठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. आयसीआयसीआय बॅंकेने 1 वर्ष ते 10 वर्षांपर्यंतच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात (Fixed deposit interest rates) 10 बेसिस पॉइंट्सने वाढ केली आहे. 2 कोटी रुपयांच्या परंतु 5 कोटी रुपयांपेक्षा कमी असलेल्या मुदत ठेवींवर एफडीचे दर वाढवले ​​आहेत.

ICICI FD interest rate hike
आयसीआयसीआय बँकेच्या मुदत ठेवींच्या व्याजदरात वाढ 
थोडं पण कामाचं
  • 2 कोटी रुपयांच्या परंतु 5 कोटी रुपयांपेक्षा कमी असलेल्या एका ठेवींवर एफडीचे दर वाढवले ​​आहेत. ICICI बँकेचे नवे FD दर 14 एप्रिलपासून लागू होतील.
  • बँक 61 दिवसांपासून ते 90 दिवसांच्या कालावधीसाठी केलेल्या मुदत ठेवींवर 3% व्याजदर देईल.
  • बँक 1 वर्ष ते 389 दिवस आणि 390 दिवस ते 15 महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी 4.25% व्याजदर देईल.

ICICI FD interest rate hike : नवी दिल्ली : खाजगी क्षेत्रातील आघाडीची बॅंक असलेल्या आयसीआयसीआय बॅंकेने (ICICI Bank) मुदतठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. आयसीआयसीआय बॅंकेने 1 वर्ष ते 10 वर्षांपर्यंतच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात (Fixed deposit interest rates) 10 बेसिस पॉइंट्सने वाढ केली आहे. 2 कोटी रुपयांच्या परंतु 5 कोटी रुपयांपेक्षा कमी असलेल्या मुदत ठेवींवर एफडीचे दर वाढवले ​​आहेत. मागील काही महिन्यांपासून बॅंकांच्या व्याजदरात सातत्याने घट होत होती. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना एफडीमधून मिळणाऱ्या उत्पन्नात घट झाली होती. मात्र आता व्याजदरातील वाढीमुळे सर्वसामान्यांना नक्कीच दिलासा मिळणार आहे. (Fixed Deposit interest rates of ICICI bank increased, check the details)

अधिक वाचा : LIC Plan | हा आहे एलआयसीचा सुपरहिट प्लॅन! ४ वर्षांसाठी प्रीमियम भरा आणि मिळवा बंपर फायदे...

मुदतठेवींवरील नवे व्याजदर 14 एप्रिलपासून लागू 

बँक 61 दिवसांपासून ते 90 दिवसांच्या कालावधीसाठी केलेल्या मुदत ठेवींवर 3% व्याजदर देईल. ICICI बँक मागील 4.15% च्या तुलनेत 1 वर्ष ते 389 दिवस आणि 390 दिवस ते 15 महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी 4.25% व्याज दर देते आहे. 15 महिने ते 18 महिन्यांपेक्षा कमी मुदतीच्या कालावधीसाठी 4.30% व्याजदर आणि 18 महिने ते 2 वर्षांच्या मुदतीच्या कालावधीसाठी, बँक 4.40% व्याज दर देईल. मागील 4.5% च्या तुलनेत 2 वर्षे 1 दिवस ते 3 वर्षे कालावधीसाठी 4.6% दर ऑफर केला जातो.

हे सुधारित व्याजदर नवीन ठेवींसाठी आणि विद्यमान मुदत ठेवींच्या नूतनीकरणासाठी लागू होतील.

अधिक वाचा : Petrol Price Today | पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर, पाहा तुमच्या शहरातील दर

आयसीआयसीआय बॅंकेचे नवे व्याजदर-

मुदतठेवींचा कालावधी      नियमित व्याजदर                ज्येष्ठ नागरिकांचे व्याज दर
7 दिवस ते 14 दिवस         2.50%                             2.50%
15 दिवस ते 29 दिवस       2.50%                             2.50%
30 दिवस ते 45 दिवस       2.75%                             2.75%
46 दिवस ते 60 दिवस      2.75%                              2.75%
61 दिवस ते 90 दिवस       3.00%                             3.00%
91 दिवस ते 120 दिवस     3.35%                              3.35%
121 दिवस ते 150 दिवस    3.35%                              3.35%
151 दिवस ते 184 दिवस    3.35%                             3.35%
185 दिवस ते 210 दिवस    3.60%                             3.60%
211 दिवस ते 270 दिवस     3.60%                            3.60%
271 दिवस ते 289 दिवस     3.70%                             3.70%
290 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी  3.70%                           3.70%
1 वर्ष ते 389 दिवस                 4.25%                         4.25%
390 दिवस ते <15 महिने         4.25%                           4.25%
15 महिने ते 18 महिने            4.30%                            4.30%
18 महिने ते 2 वर्षे                 4.40%                             4.40%
2 वर्षे 1 दिवस ते 3 वर्षे             4.60%                           4.60%
3 वर्षे 1 दिवस ते 5 वर्षे            4.70%                            4.70%
5 वर्षे 1 दिवस ते 10 वर्षे           4.70%                           4.70%
5 वर्षे (80C FD) – कमाल ते `1.50 लाख NA NA

अधिक वाचा : Aadhaar Card Update | आले नवे अद्ययावत आधार पीव्हीसी कार्ड, नवे आधार कसे मिळेल? सोपी ऑनलाइन पद्धत...

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी