Flipkart बिग दिवाली सेल १७ ऑक्टोबरपासून सुरू, स्मार्टफोनवर मिळणार बंपर डिस्काउंट

फ्लिपकार्टच्या बिग दिवाली सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, टीव्ही, अप्लायन्सेस इत्यादीवर मोठी सूट दिली जाणार आहे. या सेलमध्ये आयसीआयसी बॅंकेचे क्रेडिट कार्ड वापरणारे आणि अॅक्सिस बॅंकेच्या युजर्सना १० टक्के इन्स्टंट सूट मिळणार आहे.

Flipkart Big Diwali sale
फ्लिपकार्ट बिग दिवाली सेल 

थोडं पण कामाचं

  • सणांच्या हंगामात ई-कॉमर्स कंपन्या मोठ्या तयारीनिशी बाजारात
  • फ्लिपकार्ट आता १७ ऑक्टोबरपासून बिग दिवाली सेल सुरू करणार
  • बिग दिवाली सेल मध्ये टॅब्लेट आणि स्मार्टफोनवर ८० टक्क्यांपर्यतचा जबरदस्त डिस्काउंट दिला जाणार

नवी दिल्ली: सणासुदीच्या हंगामाच्या पार्श्वभूमीवर ई-कॉमर्स कंपन्या मोठ्या तयारीनिशी बाजारात उतरल्या आहेत. फ्लिपकार्ट (Flipkart) आणि अॅमेझॉनसारख्या (Amazon)ई-कॉमर्स कंपन्या मोठे सेल ग्राहकांसाठी बाजारात आणत आहेत. फ्लिपकार्ट आता १७ ऑक्टोबरपासून बिग दिवाली सेल (FLipkart Big Diwali sale) सुरू करणार आहे. हा सेल २३ ऑक्टोबरपर्यत असणार आहे. फ्लिपकार्टचा बिग बिलियन डेज हा सेल काही दिवसांपूर्वीच संपला आहे. अॅमेझॉनचा 'ग्रेट इंडियन फेस्टिवल' महिनाभर सुरू राहणार आहे. नवरात्र, त्यापाठोपाठ दसरा आणि मग दिवाळीसारखा मोठा सण या पार्श्वभूमीवर भारतात मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. त्यामुळेच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्या सेल आणत असतात. (Flipkart Big Diwali sale to start from 17th October)

फ्लिपकार्ट देणार ८० टक्क्यांपर्यतची सूट

फ्लिपकार्टच्या बिग दिवाली सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, टीव्ही, अप्लायन्सेस इत्यादीवर मोठी सूट दिली जाणार आहे. या सेलमध्ये आयसीआयसी बॅंकेचे क्रेडिट कार्ड वापरणारे आणि अॅक्सिस बॅंकेच्या युजर्सना १० टक्के इन्स्टंट सूट मिळणार आहे. बिग दिवाली सेल मध्ये टॅब्लेट आणि स्मार्टफोनवर ८० टक्क्यांपर्यतचा जबरदस्त डिस्काउंट दिला जाणार आहे. याशिवाय इलेक्ट्रॉनिक्स आणि अॅक्सेसरीजवरदेखील ८० टक्क्यांपर्यत डिस्काउंट ग्राहकांना दिला जाणार आहे. याचबरोबर या सेलदरम्यान रात्री १२वाजता, सकाळी ८ वाजता आणि दुपारी ४ वाजता क्रेझी डिल्स पाहायला मिळणार आहेत. इतरही उत्पादनांवर ७० टक्क्यांपर्यतची सूट मिळणार आहे. ट्राउझर आणि शर्टवर ८० टक्के, शूजवर ८० टक्के, फर्निचरवर ८५ टक्क्यापर्यतची जबरदस्त सूट ग्राहकांना मिळणार आहे.

छोट्या शहरात विस्तार

ई-कॉमर्सला आता छोट्या शहरांमधून मोठी मागणी आहे. अॅमेझॉनने दिलेल्या माहितीनुसार यंदा अॅमेझॉनच्या एकाच दिवसातील विक्रीमध्ये ६० टक्के वाढ झाली आहे. 'ग्रेट इंडियन फेस्टिवल'ची सुरूवात दणक्यात झाली आहे. यामध्ये लाखो ग्राहक अॅमेझॉनवरील छोट्या विक्रेत्यांकडून वस्तू विकत घेत आहेत. यंदा स्थानिक दुकानदारांची संख्या दुप्पटपेक्षा अधिक झाली आहे. अॅमेझॉन प्राइम सबस्क्रिप्शनला संपूर्ण भारतातून मागणी आहे. छोट्या शहरांमधील मागणी वाढली असून तीनपैकी दोन नवे प्राइम ग्राहक टिअर-२ आणि  टिअर-३ शहरांमधील आहेत.

अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टचा सेल एकाच दिवशी झाला सुरू

फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनचा आधीचा सेल एकाच दिवशी सुरू झाला होता. फ्लिपकार्टचा 'द बिग बिलियन डेज' हा सेल ३ ऑक्टोबर २०२१ला सुरू होता तर अॅमेझॉनने मात्र म्हटले आहे की त्यांचा 'ग्रेट इंडियन फेस्टिवल' हा सेल ३ ऑक्टोबरपासून सुरू होऊन दिवाळीपर्यत संपूर्ण महिनाभर सुरू राहणार आहे. अॅमेझॉनने म्हटले आहे की 'ग्रेट इंडियन फेस्टिवल'मध्ये १,००० पेक्षा जास्त नव्या उत्पादनांना लॉंच केले जाणार आहे. त्याशिवाय विविध श्रेणीतील ग्रॉसरी, फॅशन आणि ब्युटी, स्मार्टफोन, अप्लायन्सेस, टीव्ही आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने या सेलमध्ये विक्रीसाठी असणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी