Soap and Detergent Prices | तुमच्या खिशाला आणखी एक झटका! महाग झाले व्हील, रिन आणि लक्स साबण, पाहा किंमत

Soap and Detergent Prices | एचयुएल आणि आयटीसी या देशातील दोन मोठ्या एफएमसीजी कंपन्यांनी किंमत वाढीमागे कच्च्या मालाच्या किंमतीत झालेली वाढ हे कारण असल्याचे म्हटले आहे. एचयुएलने व्हील डिटर्जेंटच्या १ किलो पॅकेटची किंमत ३.४ टक्क्यांनी वाढवली आहे. यामुळे यात २ रुपयांची वाढ होणार आहे. तर व्हील पावडरच्या ५०० ग्रॅम पॅकेटच्या किंमतीत दोन रुपयांची वाढ केली आहे.

Soap and Detergent Prices
साबण आणि डिटर्जेंट झाले महाग 
थोडं पण कामाचं
  • साबण आणि डिटर्जंट पावडरसारख्या दैनंदिन आयुष्यात लागणाऱ्या वस्तूंच्या किंमतीतदेखील आता वाढ
  • एचयुएल आणि आयटीसी या दोन आघाडीच्या कंपन्यांनी केली वाढ
  • किंमत वाढीमागे कच्च्या मालाच्या किंमतीत झालेली वाढ हे कारण कंपन्यांकडून सांगण्यात आले

Soap and Detergent Prices | नवी दिल्ली : महागाईमुळे आधीच त्रस्त झालेल्या सर्वसामान्य माणसाला आता आणखी एक फटका बसणार आहे. साबण (Soap price) आणि डिटर्जंट पावडरसारख्या (Detergent price) दैनंदिन आयुष्यात लागणाऱ्या वस्तूंच्या किंमतीतदेखील आता वाढ झाली आहे. एचयुएल (HUL)आणि आयटीसी (ITC) या दोन आघाडीच्या कंपन्यांनी साबण आणि डिटर्जंट पावडरच्या किंमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. व्हील डिटर्जंट पावडर, रिन बार आणि लक्स साबणांच्या किंमतीत ३.४ टक्क्यांपासून ते २१.७ टक्क्यांपर्यत वाढ करण्यात आली आहे. तर आयटीसीने फायमा साबणाची किंमत १० टक्के, विवेल साबणाची किंमत ९ टक्के आणि एन्गेज डिओड्रंटच्या किंमतीत ७.६ टक्के वाढ केली आहे. (Soap and Detergent Prices: FMCG companies hike the soap & detergent prices)

कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ

समोर आलेल्या माहितीनुसार एचयुएल आणि आयटीसी या देशातील दोन मोठ्या एफएमसीजी कंपन्यांनी किंमत वाढीमागे कच्च्या मालाच्या किंमतीत झालेली वाढ हे कारण असल्याचे म्हटले आहे. एचयुएलने व्हील डिटर्जेंटच्या १ किलो पॅकेटची किंमत ३.४ टक्क्यांनी वाढवली आहे. यामुळे यात २ रुपयांची वाढ होणार आहे. तर व्हील पावडरच्या ५०० ग्रॅम पॅकेटच्या किंमतीत दोन रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे त्याची किंमत २८ रुपयांवरून वाढून ३० रुपयांवर पोचली आहे.

लक्स साबण झाला २५ रुपयांनी महाग

रिन साबणच्या २५० ग्रॅम पॅकेटची किंमत एचयुएलने वाढवून ५.८ टक्के केली आहे. तर लक्स साबणाच्या १०० ग्रॅम मल्टीपॅकची किंमत २१.७ टक्क्यांनी वाढवून २५ रुपये केली आहे. तर दुसरीकडे आयटीसीने फायमा साबणाच्या १०० ग्रॅम पॅकची किंमत १० टक्क्यांनी वाढवली आहे. याशिवाय कंपनीने विवेल साबणाच्या १०० ग्रॅम पॅकची किंमत नऊ टक्क्यांनी वाढवली आहे. कंपनीने एन्गेज डिओड्रंटच्या १५० मिलीच्या बाटलीची किंमत ७.६ टक्के आणि एन्गेज पर्फ्युमच्या १२० मिली बाटलीची किंमत ७.१ टक्क्यांनी वाढवली आहे. 

आयटीसीने म्हटले आहे की कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ झाली आहे त्यामुळे तयार उत्पादनांच्या किंमतीत वाढ करावी लागली आहे. ग्राहकांवर वाढीव किंमतींचा दबाव येणार नाही याची काळजी कंपनीने घेतली आहे. दुसऱ्या तिमाहीत हिंदूस्थान युनिलिव्हच्या निव्वळ नफ्यात ९ टक्क्यांची वाढ झाली आहे.

ऑक्टोबर महिन्यात (October)देशातील किरकोळ महागाईदरात (inflation) वाढ होत तो ४.४८ टक्क्यांवर पोचला आहे. अन्नधान्य आणि उत्पादने, मांस, मासे, साखर, खाद्यतेल, अन्न, दारू, पान, गुटखा, कपडे, पादत्राणे इत्यादी श्रेणीतील वस्तूंच्या किंमतीत ऑक्टोबर महिन्यात वाढ झाली आहे. देशातील किरकोळ किंवा रिटेल महागाई ही कन्झ्युमर प्राइस  इंडेक्स (Consumer Price Index) (CPI)द्वारे मोजली जाते. सीपीआय वाढून ४.४८ टक्क्यांवर पोचला आहे. सप्टेंबर महिन्यात कन्झ्युमर प्राइस  इंडेक्स ४.३५ टक्क्यांवर होता. भाजीपाल्याच्या किंमतीत (vegetable prices)झालेल्या मोठ्या वाढीमुळे महागाईदरात एकदम वाढ झाली आहे.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी